upcoming ipo 5 on sme platform share market know details Sakal
Share Market

Upcoming 5 IPO : बाजारात येणार सात ‘आयपीओ’; पाच ‘एसएमई’ कंपन्या उभारणार ३०० कोटी

भारतीय शेअर बाजारात पुढील आठवड्यात सात ‘आयपीओ’ दाखल होणार असून, गुंतवणूकदारांना विविध क्षेत्रांतील कंपन्यांमध्ये गुंतवणुकीची संधी उपलब्ध होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News : भारतीय शेअर बाजारात पुढील आठवड्यात सात ‘आयपीओ’ दाखल होणार असून, गुंतवणूकदारांना विविध क्षेत्रांतील कंपन्यांमध्ये गुंतवणुकीची संधी उपलब्ध होणार आहे. यामध्ये दोन मेनबोर्ड म्हणजे मुख्य श्रेणीत दाखल होणारे ‘आयपीओ’ असून, इतर पाच ‘आयपीओ’ ‘एसएमई’ प्लॅटफॉर्मवर दाखल होणार आहेत.

दोन मुख्य ‘आयपीओ’मध्ये पॉप्युलर व्हेइकल्स आणि क्रिस्टल इंटिग्रेटेड यांचा समावेश आहे. ‘एसएमई’ श्रेणीतील ‘आयपीओ’मध्ये ईपीसी, सिग्नोरिया क्रिएशन्स, रॉयल सेन्स, एव्हीपी इन्फ्राकॉन आणि केपी ग्रीन इंजिनिअरिंग या कंपन्यांचा समावेश आहे. ‘एसएमई’ प्लॅटफॉर्मवर दाखल होणाऱ्या या पाच कंपन्यांना ३०० कोटी रुपयांच्या निधीची अपेक्षा आहे.

पॉप्युलर व्हेइकल्स अँड सर्व्हिसेस लि. चा ‘आयपीओ’ मंगळवारी (ता. १२) खुला होणार असून, तो १४ मार्च रोजी बंद होईल. कंपनी या ‘आयपीओ’द्वारे ६०५ कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे. क्रिस्टल इंटिग्रेटेड लि. चा ‘आयपीओ’ गुरुवारी (ता.१४) खुला होणार असून, तो १८ मार्च रोजी बंद होईल.

‘ईपीसी’चा ‘आयपीओ’ सोमवारी (ता. ११) खुला होईल आणि १३ मार्च रोजी बंद होईल. यात प्रति शेअर ७१ ते ७५ रुपये किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. ‘एव्हीपी इन्फ्राकॉन’चा ‘आयपीओ’ १३ मार्च रोजी खुला होईल आणि १५ मार्च रोजी बंद होईल. रॉयल सेन्स आणि सिग्नोरिया क्रिएशन हे ‘आयपीओ’ मंगळवारी (ता. १२) खुले होतील आणि १४ मार्च रोजी बंद होतील.

सिग्नोरिया क्रिएशनच्या ‘आयपीओ’साठी प्रति शेअर ६१ ते ६५ रुपये किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे, तर रॉयल सेन्ससाठी प्रति शेअर ६८ रुपये किंमत निश्चित करण्यात आली आहे.

केपी ग्रीन इंजिनिअरिंगचा ‘आयपीओ’ १५ मार्च रोजी खुला होईल आणि १९ मार्च रोजी बंद होईल. प्रति शेअर १३७ ते १४४ रुपये किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. कंपनी या इश्यूद्वारे १९० कोटी रुपयांचे भांडवल उभारण्याचा विचार करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Disha Patani house firing : पाचवा आरोपी एन्काउंटरमध्ये जखमी; पोलिसांना गयावया करत म्हणू लागला...

EPFO Update: 'पीएफ'ची सगळी माहिती एका क्लिकवर; काय आहे Passbook Lite?

Kannad News : शहीदांच्या ८५ वर्षीय आई-वडिलांना दोन तासांत न्याय; तहसीलदारांची संवेदनशील भूमिका

Most Dangerous Room in the House: स्वयंपाकघर किंवा गॅरेज नाही, तर हृदयरोगतज्ज्ञांच्या मते घरातील ही खोली आहे आरोग्याच्या दृष्टिने अधिक धोकादायक

Latest Marathi News Updates: कोथरूड गोळीबारप्रकरणी घायवळ गँगच्या ५ जणांना पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT