Vardhman Special Steels esakal
Share Market

Vardhman Special Steels : या शेअर्सचा तगडा रिटर्न, आता कंपनीकडून बोनस शेअर्सची घोषणा?

कंपनी 12 एप्रिलला बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक घेणार आहे, ज्यात बोनस शेअर्सबाबत विचार होणार आहे

सकाळ डिजिटल टीम

Vardhman Special Steels : वर्धमान स्पेशल स्टील्स (Vardhman Special Steels) कंपनीच्या शेअर्सने त्यांच्या गुंतवणुकदारांना कधीही निराश केलेले नाही. कंपनीची मार्केट व्हॅल्यू 1,732 कोटी रुपये आहे. ही कंपनी लोखंड आणि पोलाद उत्पादने बनवण्याच्या व्यवसायात आहे. मंगळवारी त्यांचे शेअर्स 3 टक्क्यांहून अधिक वाढून 428.1 रुपयांवर पोहोचले, जी गेल्या एका वर्षातील नवीन सर्वोच्च पातळी आहे. कंपनी 12 एप्रिलला बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक घेणार आहे, ज्यात बोनस शेअर्सबाबत विचार होणार आहे.

गेल्या 3 वर्षात कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 947% इतका मल्टीबॅगर परतावा दिला आहे. सुमारे 3 वर्षांपूर्वी वर्धमान स्पेशल स्टील्सचा भाव 40.9 रुपयांवर होता, जो आता 428 रुपयांवर पोहोचला आहे. 2023 च्या सुरुवातीपासून आतापर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 37.16% वाढ झाली आहे. आणि गेल्या एका वर्षात, त्याने आपल्या गुंतवणूकदारांना 62.58% चा मजबूत परतावा दिला आहे. (Share Market)

साधारणपणे, एखादी कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना प्रोत्साहन म्हणून बोनस शेअर्स जारी करते. या बोनस शेअरचे प्रमाण कंपनीचे बोर्ड ठरवते. बोनस शेअर्स अंतर्गत 3 महत्त्वाच्या तारखा आहेत, अर्थात रेकॉर्ड डेट, एक्स डेट तारीख आणि इश्यू डेट आहेत. याचा अर्थ असा की बोनस शेअर्स फक्त रेकॉर्ड तारखेनुसार कंपनीचे शेअर्स घेतलेल्यांना दिले जातात, तर एक्स-बोनस डेट ही तारीख सामान्यतः रेकॉर्ड तारखेच्या एक दिवस आधी असते. बोनस शेअर्ससाठी पात्र होण्यासाठी, गुंतवणूकदाराने कंपनीचा स्टॉक एक्स-डेटच्या किमान एक किंवा दोन दिवस आधी घेतला असणे आवश्यक आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्कॉर्पिओला आग लागून एकाच कुटुंबातील चौघांचा अंत, मृतांमध्ये ZP सदस्यासह २ माजी सरपंचाचा समावेश

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगेंची पत्रकार परिषद! 30 मे पासून आमरण उपोषण

Badlapur Crime: बदलापुरात वडिलांच्या मित्रानेच १६ वर्षीय मुलीचा केला विनयभंग, मोबाईल चार्जिंगसाठी घरी आला अन्...

Deepali Sayyad Claims : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’वरून खळबळ! दिपाली सय्यदला धमक्या, “ते नाव घेतलं तर सर्व काही संपेल...”

Kolhapur Student Death Case : बाबा दुप्पट फायदा मिळणार आहेत, पैसे पाठवा..., मुलीचे शेवटचे शब्द, कुटुंबीयांनी नाकारलं विद्यार्थिनीने नको ते केलं

SCROLL FOR NEXT