Bonus Share Sakal
Share Market

Bonus Share: 'ही' कंपनी देणार मोफत शेअर्स, गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना दिला 200% पेक्षा जास्त परतावा

Bonus Share: कंपनीच्या शेअर्सनी गेल्या एक वर्षात गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.

राहुल शेळके

Share Market News : बांधकाम व्यवसाय करणाऱ्या विवांता इंडस्ट्रीज लिमिटेडने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्ससह लाभांश देण्याची घोषणा केली आहे. विवांता इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअर्समध्ये महिनाभरापासून मोठी घसरण होत आहे. परंतु कंपनीच्या शेअर्सनी गेल्या एक वर्षात गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.

प्रत्येक 4 शेअर्ससाठी 1 शेअर मोफत दिला जाईल

विवांता इंडस्ट्रीज लिमिटेडने माहिती दिली की कंपनीच्या संचालक मंडळाने 1:4 च्या प्रमाणात बोनस शेअर्स देण्यास मान्यता दिली आहे. म्हणजेच, यानुसार, गुंतवणूकदारांना प्रत्येक 4 विद्यमान इक्विटी शेअर्समागे 1 नवीन शेअर मिळेल.

यासोबतच कंपनीने 31 मार्च 2023 रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी 3 टक्के लाभांश देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने बोनस शेअर्स आणि अंतिम लाभांशासाठी 5 सप्टेंबर 2023 ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे.

एका वर्षात 200% पेक्षा जास्त परतावा दिला

कंपनीने गेल्या एक वर्षाच्या कालावधीत गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. एका वर्षाच्या कालावधीत हा शेअर सुमारे 215.88 टक्क्यांनी वाढला आहे. विवांता इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​शेअर सलग 13व्या दिवशी लोअर सर्किटवर गेल्यानंतर आता सुधारत आहेत.

शुक्रवारी बाजार बंद होईपर्यंत विवांता इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअर्समध्ये 5.37 टक्क्यांनी वाढ झाली. कंपनीचा 52 आठवड्यांचा विक्रमी उच्चांक 8.66 रुपये आहे आणि 52 आठवड्यांचा नीचांक 1.52 रुपये आहे.

कंपनीचे उत्पन्न तिमाही आधारावर वाढले

गेल्या वर्षी जून तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न 0.12 कोटी रुपये होते. जे यावर्षी वाढून 14.08 कोटी रुपये झाले. तर गेल्या आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत कंपनीचा खर्च 0.08 कोटी रुपये होता, जो या वर्षाच्या जून तिमाहीत वाढून 13.75 कोटी रुपये झाला आहे.

अशाप्रकारे मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षीच्या जून तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 33 लाखांपर्यंत वाढला आहे. त्याचवेळी, या वर्षाच्या सुरुवातीपासून या कंपनीच्या शेअर्समध्ये 150.98 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT