Stock Market Crash Sakal
Share Market

Share Market Analysis: जगभरातील शेअर बाजार का कोसळत आहेत? यामागची प्रमुख पाच कारणे कोणती?

Share Market Crash Today: अपोलो हॉस्पिटल्स आणि सन फार्मा हे निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले आहेत तर मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, हिंदाल्को, टायटन कंपनी आणि टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण झाली आहे.

राहुल शेळके

Stock Market Crash: जागतिक अस्थिरतेमुळे भारतीय शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली आहे. सेन्सेक्स 1,310.47 अंकांनी किंवा 1.62 टक्क्यांच्या घसरणीसह 79,670 च्या आसपास आणि निफ्टी 404.40 अंकांनी किंवा 1.64 टक्क्यांच्या घसरणीसह 24,310 च्या आसपास व्यवहार करत आहे. आज 2368 शेअर्स घसरले तर 154 शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही.

अपोलो हॉस्पिटल्स आणि सन फार्मा हे निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले आहेत तर मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, हिंदाल्को, टायटन कंपनी आणि टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण झाली आहे. आज शेअर बाजारात मोठी घसरण होण्यास कारणीभूत असलेल्या प्रमुख घटकांवर एक नजर टाकूया.

1. अमेरिका आर्थिक मंदीत जाण्याची भीती

अमेरिका आर्थिक मंदीत जाण्याची भीती वाढली आहे. कारण मंदी दर्शविणारा Sahm रिसेशन इंडिकेटर 0.5 बिंदूंच्या वर दिसत आहे. हे मंदीच्या शक्यतेचे लक्षण आहे. जुलै महिन्यात अमेरिकेत नवीन नोकऱ्यांच्या भरतीत मोठी घट झाली आहे.

गेल्या वर्षीच्या मासिक सरासरी 2,15,000 नोकऱ्यांच्या तुलनेत या कालावधीत केवळ 1,14,000 नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या. शिवाय, बेरोजगारीचा दर 4.3 टक्क्यांवर पोहोचला आहे, जो ऑक्टोबर 2021 नंतरचा उच्चांक आहे. त्यामुळे शुक्रवारी अमेरिकन बाजार तोंडघशी पडले. शेअर बाजारासाठी हा दिवस 2020 नंतरचा सर्वात वाईट दिवस होता.

2. बँक ऑफ जपानचे चलनविषयक धोरण

केवळ यूएस मार्केट्सच मंदीत नाहीत, तर जपानचा निक्केई 225 देखील संघर्ष करत आहे. बँक ऑफ जपानने बुधवारी आपला व्याजदर वाढवला. या वाढीमुळे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत जपानी येनचे मूल्य आणखी वाढले आहे.

3. इराण-इस्रायल तणाव

मध्यपूर्वेत तणाव वाढत आहे. इराण, हमास आणि हिजबुल्लाहने इस्रायलने हमास प्रमुख आणि हिजबुल्लाच्या लष्करी प्रमुखाच्या हत्येचा बदला घेण्याची शपथ घेतली आहे. मध्य पूर्वेतील संघर्षामुळे तेलाच्या किमती वाढतील. मात्र मागणीअभावी तेलाच्या किमती सध्या 8 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आहेत. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती या युद्धामुळे वाढण्याची शक्यता आहे.

4. पहिल्या तिमाहीचे कमकुवत निकाल

मोतीलाल ओसवाल यांच्या मते, कंपन्यांमध्ये चांगले करार न होणे, उष्णतेची लाट आणि मंदावलेली मागणी यामुळे जूनमध्ये संपलेल्या तिमाहीचे निकाल कमकुवत आहेत. या कालावधीत आतापर्यंतचे निकाल वार्षिक आधारावर सुमारे 10% कमी आहेत.

निफ्टी 50 मध्ये समाविष्ट असलेल्या 30 कंपन्यांनी आतापर्यंत त्यांचे निकाल जाहीर केले आहेत त्यांच्या कमाईत सरासरी वार्षिक 0.7 टक्के वाढ झाली आहे. पण नफ्यात 9.4 टक्क्यांची तिमाही घट झाली आहे. जागतिक घसरणीमुळे एकूण कामगिरीवर नकारात्मक परिणाम झाला आहे.

HDFC बँक, टाटा मोटर्स, ICICI बँक, मारुती आणि TCS सारख्या प्रमुख कंपन्यांनी निफ्टी 50 च्या एकूण कामगिरीला पाठिंबा दिला.

5. नजीकच्या भविष्यात नवीन ट्रिगर्सचा अभाव

आता गुंतवणूकदार बाजाराच्या भविष्यातील वाटचालीचा अंदाज घेण्यासाठी निकालांचा हंगाम, बजेट आणि यूएस फेडरल रिझर्व्हकडे पाहत होते. एकदा या सर्व घटना पूर्ण झाल्या की, बाजारामध्ये नवीन ट्रिगर्स नसतात जे अपट्रेंडमध्ये भर घालू शकतात.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

Raj Thackeray: जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, राज ठाकरेंकडून भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांवर टीका

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT