South Indian Bank sakal
Share Market

South Indian Bank : साऊथ इंडियन बँकेच्या शेअर्समध्ये घसरण...

बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काही कारणास्तव पुन्हा जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे.

शिल्पा गुजर

South Indian Bank : साऊथ इंडियन बँकेच्या (South Indian Bank) शेअर्समध्ये सध्या घसरण दिसून येत आहे. नुकताच हा शेअर 17 टक्क्यांनी घसरुन 14.45 रुपयांवर गेला. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काही कारणास्तव पुन्हा जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे.

त्याने पुन्हा नियुक्तीची ऑफर नाकारल्यानंतर कंपनीच्या शेअर्सना मोठा फटका बसला. या घसरणीसह, शेअर नोव्हेंबर 2022 नंतरच्या नीचांकी पातळीवर व्यवहार करत आहे. (why South Indian Bank shares falled share market news update)

बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मुरली रामकृष्णन यांचा कार्यकाळ 30 सप्टेंबर 2023 पर्यंत आहे. वैयक्तिक कारणांमुळे/कौटुंबिक परिस्थितीमुळे त्यांची पुनर्नियुक्ती न करण्याची विनंती त्यांनी बँकेच्या संचालक मंडळाला केली.

बँकेच्या संचालक मंडळाने 28 मार्च 2023 रोजी झालेल्या बैठकीत मुरली रामकृष्णन यांच्या या विनंतीचा विचार केल्याचे साऊथ इंडियन बँकेने एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटले आहे. बोर्डाने स्थापन केलेली शोध समिती एमडी आणि सीईओ पदासाठी योग्य उमेदवाराचा शोध घेईल असे बँकेने म्हटले आहे.

साऊथ इंडियन बँकेच्या शेअर्समध्ये सध्या घसरण दिसूने येत असली तरी त्यांनी लाँग टर्ममध्ये आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. गेल्या एका महिन्यात त्याचे शेअर्स 14 टक्क्यांनी घसरले आहेत.

त्याच वेळी, या स्टॉकने गेल्या 6 महिन्यांत 52% परतावा दिला आहे. इतकेच नाही तर गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांनी 91 टक्के इतका मोठा नफा कमावला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS : पथूम निसंका पहिला शतकवीर! श्रीलंका Super 8s मध्ये, ऑस्ट्रेलियाचे नशीब 'आयर्लंड'च्या हाती; जाणून घ्या समीकरण

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरु शकते धोकादायक, 'हे' उपाय करा नाहीतर होईल मोठी हानी!

Muhammad Yunus Resigns : मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागारपदाचा दिला राजीनामा!

Mani Shankar Aiyar : ‘’मी गांधीवादी, नेहरूवादी, राजीववादी आहे, पण राहुलवादी नाही’’ ; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर थेटच बोलले..!

Pune Shivjayanti : रस्त्याच्या कामामुळे शिवजयंती मिरवणूक मार्गात बदल; महापौरांचे आदेश

SCROLL FOR NEXT