Yatra Online IPO to open on September 15  Sakal
Share Market

Yatra Online IPO: 15 सप्टेंबरला खुला होतोय यात्रा ऑनलाइनचा आयपीओ, गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या संपूर्ण माहिती

Yatra Online IPO: आयपीओ 15 सप्टेंबरला सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल आणि 20 सप्टेंबरला बंद होईल.

राहुल शेळके

Yatra Online IPO: ट्रॅव्हलटेक स्टार्टअप यात्रा ऑनलाइनने (Yatra Online) आपल्या आयपीओचा प्राईस बँड निश्चित केला आहे. कंपनीने यासाठी 135-142 रुपये प्रति शेअरचा प्राइस बँड ठेवला आहे.

हा आयपीओ 15 सप्टेंबरला सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल आणि 20 सप्टेंबरला बंद होईल. त्याच वेळी, अँकर गुंतवणूकदारांसाठी हा इश्यू एक दिवस आधी म्हणजेच 14 सप्टेंबरला खुला होईल. कंपनीला आयपीओच्या माध्यमातून 775 कोटी उभे करायचे आहेत.

या आयपीओ अंतर्गत 602 कोटीचे फ्रेश इक्विटी शेअर्स जारी केले जातील. याशिवाय, कंपनीचे प्रमोटर आणि विद्यमान भागधारकांद्वारे ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत 1.218 कोटी शेअर्स विकले जातील. अप्पर प्राइस बँडवर एकूण इश्यू साईज 775 कोटी आहे, तर फर्मचे मूल्य 2230 कोटी आहे.

ओएफएसचा भाग म्हणून, प्रमोटर टीएचसीएल ट्रॅव्हल होल्डिंग सायप्रस 17.5 लाख शेअर्स विकणार आहे, तर गुंतवणूकदार पंडारा ट्रस्ट - स्कीम I ओएफएसद्वारे आपले संपूर्ण 4,31,360 शेअर्स विकून कंपनीतून बाहेर पडण्याची योजना आखत आहे.

सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर गुंतवणूकदारांना शेअर्सचे वाटप 25 सप्टेंबरला होईल. तर, इक्विटी शेअर्स 26 सप्टेंबरला गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यांमध्ये जमा केले जातील. कंपनी 29 सप्टेंबरला एक्सचेंजेसवर लिस्ट होईल.

यात्रा ऑनलाइन कॉर्पोरेट ग्राहकांच्या संख्येच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठी कॉर्पोरेट ट्रॅव्हल सर्व्हिस प्रोव्हायडर असल्याचा दावा करते. या व्यतिरिक्त, आर्थिक वर्ष 2023 साठी एकूण बुकिंग महसूल आणि ऑपरेटिंग कमाईच्या बाबतीत ही प्रमुख ओटीएमधील (ऑनलाइन ट्रॅव्हल एजन्सी) भारतातील तिसरी सर्वात मोठी ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनी आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

IND vs ENG 2nd Test: इंग्लंडच्या खेळाडूने रिषभ पंतला दाखवलं 'आमिष'; आपल्या पठ्ठ्याने काय उत्तर दिले पाहा, Viral Video

SCROLL FOR NEXT