zen technologies hits new 52 week high share price surges 70 percent know details  Sakal
Share Market

Multibagger Stock Tips: 'या' संरक्षण क्षेत्रातील कंपनीच्या शेअरमुळे गुंतवणूकदारांची झाली चांदी; आणखी तेजीचा अंदाज

Multibagger Stock Tips: गेल्या काही दिवसांपासून या कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने वाढ होत आहे.

शिल्पा गुजर

Share Market Investment Tips : झेन टेक्नॉलॉजीज (Zen Technologies) ही स्मॉल कॅप कंपनी असून तिचे मार्केट कॅप 2,530 कोटी आहे. कंपनी सेन्सर आणि सिम्युलेटर टेक्नोलॉजीवर आधारित डिफेन्स ट्रेनिंग सिस्टीमच्या स्वदेशी डिझाइन, विकास आणि उत्पादनाच्या व्यवसायात आहे.

एंटी-ड्रोन टेकनिक आणि डिफेंस ट्रेनिंग सोल्यूशन्स देणाऱ्या देशातील आघाडीच्या कंपन्यांपैकी ही एक आहे. गेल्या काही दिवसांपासून या कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने वाढ होत आहे. सध्या हे शेअर्स 325.80 रुपयांवर आहेत, जी गेल्या एका वर्षातील नवीन उच्चांक आहे.

या वर्षाच्या सुरुवातीपासून या कंपनीच्या शेअर्समध्ये 70% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. तर गेल्या 5 वर्षात या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 168.98% इतका मल्टीबॅगर परतावा दिला आहे.

सशस्त्र दलांकडून 127 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाल्यानंतर झेन टेक्नॉलॉजीजच्या शेअर्समध्ये तेजी आली आहे. 31 डिसेंबरपर्यंत कंपनीकडे 404.44 कोटीची ऑर्डर बुक होती.

भारत सरकार आता सशस्त्र दलांमध्ये सिम्युलेटरचा वापर करत असल्याचे झेन टेक्नॉलॉजीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अशोक अटलुरी म्हणाले. यातून खूप पैसे वाचणार आहेत शिवाय ट्रेनिंग व्हॅल्यूही वाढणार आहे. तसेच आपल्या सैनिकांना युद्धासाठी तयार करण्यास मदत होईल.

झेन टेक्नॉलॉजीजचा डिसेंबर तिमाही निकाल चांगले होते. कंपनीने या तिमाहीत 11.94 कोटीचा नफा नोंदवला आहे, तर मागील वर्षी याच तिमाहीत 0.22 कोटींचा तोटा झाला होता. डिसेंबर तिमाहीत कंपनीची विक्रीही जवळपास तीन पटीने वाढून 52.48 कोटी झाली आहे, जी मागील वर्षीच्या तिमाहीत 16.26 कोटी होती.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

CSK vs PBKS Live: चेन्नई सुपर किंग्स 'घरी'पण हरले! पंजाब किंग्सचे फलंदाज चेपॉकवर बरसले, श्रेयसचा संघ IPL 2026 Point Table मध्ये अव्वल

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

SCROLL FOR NEXT