Zen Technologies esakal
Share Market

Zen Technologies च्या शेअर्सचा उच्चांक, एका महिन्यात 35% रिटर्न...

एअरोस्पेस आणि डिफेन्स व्यवसायात गुंतलेल्या या कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या एका महिन्यात जवळपास 35 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Zen Technologies Shares : झेन टेक्नॉलॉजीजच्या (Zen Technologies) शेअर्समध्ये मंगळवारी इंट्रा-डे ट्रेडमध्ये 4 टक्क्यांपर्यंत वाढ दिसून आली. नंतर तो एनएसईवर 2.65% वाढून 258 रुपये प्रति शेअरवर बंद झाला. शेअरने 261.75 रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला. एअरोस्पेस आणि डिफेन्स व्यवसायात गुंतलेल्या या कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या एका महिन्यात जवळपास 35 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी, गेल्या 5 दिवसांतच तो 20 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

तिमाही निकाल

कंपनीचे आर्थिक वर्ष 2023 च्या तिसऱ्या तिमाही निकाल दमदार आहेत. या काळात कंपनीचा कंसोलिडेटेड प्रॉफिट आफ्टर टॅक्स (PAT) 11.94 कोटी रुपये होता. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला 0.22 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. कंपनीची विक्री 16.26 कोटींवरून तिप्पटीने वाढून 52.48 कोटी झाली. त्याच वेळी एबिटदा मार्जिन आर्थिक वर्ष 2022 च्या तिसऱ्या तिमाही मध्ये 11.19 टक्क्यांवरून 34.27 टक्क्यांपर्यंत वाढली.

कंपनीला येत्या काळात मोठ्या ऑर्डरची अपेक्षा आहे. याशिवाय, सरकारकडून करण्यात येत असलेल्या खरेदीतून कंपनीला आणखी काही मोठ्या ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. 31 डिसेंबर 2022 पर्यंत झेन टेक्नॉलॉजीजची ऑर्डर बुक 404.44 कोटी होती.

झेन टेक्नॉलॉजीज सेन्सर आणि सिम्युलेटर टेक्नोलॉजीवर आधारित डिफेन्स ट्रेनिंग सिस्टमचे स्वदेशी डिझाइन, डेव्हलपमेंट आणि उत्पादनात गुंतलेली आहे. ही कंपनी संरक्षण मंत्रालय (सशस्त्र दल), सुरक्षा दल पोलीस आणि निमलष्करी दलांना डिफेन्स ट्रेनिंग सोल्यूशन्स देते. कंपनी लँड बेस्ड मिलिट्री ट्रेनिंग सिम्युलेटर, ड्रायव्हिंग सिम्युलेटर, लाईव्ह रेंज इक्विपमेंट आणि एन्ट्री ड्रोन सिस्टम तयार करते.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Harbour Line: मुंबईकरांचा खोळंबा! हार्बर लाईनवरील Up-Down दोन्ही मार्ग बंद; हजारो प्रवासी स्टेशनवर अडकले

Pune Railway Station: पुणे स्थानकावर रविवारी ‘मेगाब्लॉक’; पुणे-दौंड लोहमार्गावरील कामासाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय

Jalgaon MPSC Exam : जळगावात MPSC परीक्षेसाठी कडक सुरक्षा, लागू झाली 'ही' नियमावली; कॉपीमुक्त अभियानासाठी प्रशासन ॲक्शन मोडमध्ये!

Shocking : भारतीय क्रीडाविश्वात शोककळा... आशियाई सुवर्णपदक विजेत्या जसपाल राणा यांचे निधन, घडवलेत मनू भाकरसह अनेक खेळाडू

Latest Marathi News Live Update : हार्बर लाईनवरील रेल्वे वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT