A saving angel after a snakebite sakal
संपादकीय

सर्पदंशानंतर वाचविणारा देवदूत

सर्पदंश जीवघेणा मानला जातो. त्यावर तातडीने उपचार केले तर नागरिकाला जीवदान मिळते. ग्रामीण भागात काही ठिकाणी आजही पारंपरिक पद्धतीने उपचार केले जातात, मात्र त्यात हमी देता येत नाही. शहरी भागात आधुनिक पद्धतीने उपचार केले जातात.

सकाळ वृत्तसेवा

सर्पदंश जीवघेणा मानला जातो. त्यावर तातडीने उपचार केले तर नागरिकाला जीवदान मिळते. ग्रामीण भागात काही ठिकाणी आजही पारंपरिक पद्धतीने उपचार केले जातात, मात्र त्यात हमी देता येत नाही. शहरी भागात आधुनिक पद्धतीने उपचार केले जातात. नारायणगावचे डॉ. सदानंद राऊत हे आतापर्यंत सर्पदंश झालेल्या लोकांसाठी ‘देवदूत’ ठरले आहेत. त्यांनी आतापर्यंत १२ हजारांपेक्षा अधिक आदिवासी व शेतकऱ्यांना उपचारातून जीवदान दिले आहे.

संतोष खुटवड, पुणे

पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील रहिवासी व जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्य डॉ. सदानंद राऊत हे ३०-३५ वर्षांपासून घोणस, फुरसे, पटेरी मण्यार, कोब्रा यांसारखे अनेक विषारी साप चावल्याने होणारे मृत्यू आटोक्यात आणण्याच्या यज्ञामध्ये जनजागृती, व्याख्याने, माहितीपट आदींच्या समिधा पदरमोड करून समर्पित करीत आहेत.

जुन्नर तालुक्यात उंब्रज येथे धरणग्रस्त कुटुंबात जन्मलेल्या डॉ. राऊत यांनी जिद्द, चिकाटीच्या जोरावर आर्थिक परिस्थितीवर मात करीत पुणे येथील बी. जे. मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस व पुढे केईएम हॉस्पिटलमधून एमडी मेडिसिन या पदवीला गवसणी घातली. जहाँगीर तसेच के. ई. एम. रुग्णालयातील अनुभव पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात व्हावा यासाठी त्यांनी नारायणगाव ही कर्मभूमी निवडली अन् गरीब रुग्णांची सेवा करण्याचा वसा हाती घेतला.

रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून १९९४ मध्ये विघ्नहर नर्सिंग होमद्वारे गरजूंवर मोफत उपचार करण्यास प्रारंभ केला. सर्पदंश उपचार व विष-विज्ञान संशोधन केंद्र स्थापन करून अनेकांना जीवदान दिले. पूर्वी सर्पदंश झालेल्या व्यक्तीला गावातील मंदिरात ठेवले जायचे. साप बिनविषारी असला तर प्राण वाचायचा मात्र विषारी असेल तर उपचारांअभावी मृत्यू व्हायचा. असे प्रकार थांबण्यासाठी त्यांनी गावोगावी जाऊन जनजागृती केली व प्रतिकूल परिस्थितीत राज्यभरात अंधश्रद्धा असलेल्या भागात जाऊन जनजागृती केली व सर्पदंशामुळे होणारे अनेकांचे प्राण वाचविले. डॉ. राऊत यांनी केलेल्या विधायक कार्यामुळे अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविले आहे.

जनजागृतीद्वारे उभारली चळवळ

पुणे, सातारा, कोल्हापूर या तीन जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळा आणि वसतिगृहातील शिक्षक व विद्यार्थांना प्रशिक्षण देऊन, विषारी तसेच बिनविषारी सापांविषयी जनजागृती केली आहे. सर्पदंश व त्यावरील प्रथमोपचार, सापांविषयीचे गैरसमज, अंधश्रद्धा, सापांपासून आपले संरक्षण याद्वारे डॉ. राऊत यांनी राज्यभरातील ग्रामीण तसेच आदिवासी भागांतील शाळा, महाविद्यालये तसेच घाटावर जाऊन जनजागृतीद्वारे चळवळ उभारली. जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, पारनेर आणि संगमनेर तालुक्यातील गरीब आणि आदिवासी रुग्णांसाठी डॉ. राऊत यांचे रुग्णालय ‘लाइफलाइन’ बनले आहे. अतिगंभीर रुग्णांवर अवघड शस्रक्रिया केल्या आहेत.

ऑस्ट्रेलिया, ऑक्सफर्ड येथेही प्रबोधन

विघ्नहर मेडिकल फाउंडेशनद्वारे राऊत दाम्पत्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिरांद्वारे गेल्या ३५ वर्षांमध्ये नगर, पुणे जिल्ह्यांतील ग्रामीण भागातील २ लाख ५० हजार नागरिकांना वैद्यकीय लाभ मिळवून दिला आहे. डॉ. राऊत हे सर्पदंश या विषयाचा वैद्यकीय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, नेपाळ आणि अबुधाबी येथेही सर्पदंशाबाबत प्रबोधन केले आहे. कोलकता, बंगळूर, आसाम, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हैदराबाद येथे व्याख्याने दिली आहेत.

‘शून्य सर्पदंश मृत्यू दर प्रकल्प’

महाराष्ट्रात राबविलेल्या ‘शून्य सर्पदंश मृत्यू दर प्रकल्पा’मुळे अनेकांचे प्राण वाचवून अपंगत्व व मूत्रपिंड निकामी होण्याचे प्रमाण घटविले आहे. सामाजिक जाणीवेतून गरजूंवर मोफत उपचाराला प्राधान्य देत डॉ. राऊत यांनी निःस्वार्थीपणे वैद्यकीय सेवेचा वस्तुपाठ ठेवला आहे.

विशेष म्हणजे सिंगापूर येथे १९ ते २५ मे दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘शून्य सर्पदंश मृत्यू दर प्रकल्प’व ‘गरोदरपणातील सर्पदंश व उपचार’यावर व्याख्यान देण्यासाठी डॉ. सदानंद राऊत व त्यांच्या पत्नी डॉ. पल्लवी यांना आमंत्रित केले आहे.

असे राबवितात अभियान

  • देशभरातील १०,००० पेक्षा अधिक वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण.

  • शेतकऱ्यांमध्ये सर्पदंश जागरूकता व प्रतिबंध करण्यासाठी ५०० पेक्षा अधिक व्याख्याने.

  • देशभरात २० हजारांपेक्षा डॉक्टर्स, वैद्यकीय विद्यार्थ्यांना सर्पदंशाबाबत व्याख्याने.

  • पुणे जिल्ह्यातील ३५०० हून अधिक आशा वर्करला प्रशिक्षण.

  • मिशन इम्पॉसिबल माहितीपटाची निर्मिती.

सामाजिक कार्याचा वसा

  • कोरोना काळात रुग्णांना सल्ला तसेच बेड मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न.

  • सांगली व कोल्हापूर जिल्हा, पूरग्रस्तांसाठी मदत व मदत शिबिर. (ऑगस्ट २०१९)

  • केरळ येथे अतिवृष्टीग्रस्तांसाठी वैद्यकीय मदत व सर्पदंश लस वितरित.

  • माळीण दुर्घटनेच्या आपत्तीत कार्य.

  • गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत पुरविणे.

  • कुपोषण रोखण्यासाठी तपासणी आणि जागरूकता कार्यक्रम.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : नाशिक जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलंबित

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT