dhing tang sakal media
संपादकीय

ढिंग टांग : मरणचित्रे!

ठकठक करते दारावरती अज्ञाताची निगूढ मूठ जो येतो, तो परतचि जातो, हेच खरे, अन बाकी झूठ

ब्रिटिश नंदी

ठकठक करते दारावरती

अज्ञाताची निगूढ मूठ

जो येतो, तो परतचि जातो,

हेच खरे, अन बाकी झूठ

क्षणार्ध आहे, क्षणैक होते,

क्षणभंगुर हे क्षणभर जगणे

कशास त्या आयुष्य म्हणावे

कशास त्याचे गावे गाणे

देहामधुनि सुटला प्राण

दग्ध विषारी युक्त हवा

विळख्यावरती विळखे दोन

मरण पवित्रा रोज नवा

अज्ञाताच्या तारेवर

तलवारीच्या धारेवर

चक्राच्या त्या आरेवर

कुणी लोंबते, कुणी चिरफळते,

कुणि गरगर ते अव्याहत

अमंगळाचा मुहुरत आहे,

चेटकिणींची ही पंगत

घुबड पोचले नदिकाठावर

तेथ उगाळत बसे दगड

खंगुनि सत्वर मरेल जग हे,

म्हणे मनाशी, यश रगड!

विषार भरला वातावरणी

श्वास कोंडतो खालीवर

बघता बघता विझू लागले

हेच दिव्यांचे भव्य नगर

माणुसकीच्या माळावर

वणवा फिरतो वाऱ्यावर

राख उसळते खडकावर

अस्तित्त्वाच्या आकांताला

सैराटाची ठिणगीजोड

मरतानाही जिभल्या चाटे

हीच जित्याची आहे खोड

मरण कांडते नियती येथे

नश्वरतेची शुष्क कुडी

मृतदेहांच्या वस्तीमध्ये

जितेजागते देशधडी

पळे निघाली, घटका जाती

तास वाजतो ठणाठणा

क्षणाक्षणाला जीव निघाले

प्रस्थानाला दणादणा

मरणगावच्या वेशीवर

जथे थांबले घटकाभर

एका श्वासाचे अंतर

अरे, अनंता, वेशीवरती

तुझ्या अब्रूचे धिंडवडे

तुझ्याच लटिक्या महतीचा हा

खास पुरावा दृष्टी पडे

ठकठक करते दारावरती

अज्ञाताची निगूढ मूठ

जो येतो, तो परतचि जातो,

हेच खरे, अन बाकी झूठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif and Samarjit Ghatge: “शत्रूचा शत्रू तो आपला मित्र”, हसन मुश्रीफ, समरजित घाटगे यांची एकत्र खुर्ची, कागलचे राजकारण बदलणार!

Sangli Leopard: सांगलीत बिबट्याचा वावर; पायाचे ठसे सापडले पण प्रशासनाची कारवाई कुठे अडकली?

मी अशा व्यक्तीबरोबर राहू शकत नाही... टॉक्सिक रिलेशनशिपबद्दल ऋता दुर्गुळेने मांडलं मत; म्हणते, 'तो कितीही...'

Vasant Hankare: पोरांनाही रडवलं! वसंत हंकारेंनी स्वीकारलं चॅलेंज; म्हणाले, तू लाव कितीही ताकद...

Winter Low Water Intake Risks: हिवाळ्यात किती पाणी प्यायलं पाहिजे? प्रमाण कमी झाल्यास मेंदूसह शरीरावर होतात 'हे' परिणाम

SCROLL FOR NEXT