संपादकीय

ढिंग टांग : हौसफुल्ल!

ब्रिटिश नंदी

चाहत्यांची गर्दी होत गेली अनावर...
प्रसन्न फुलांच्या अजगरी हाराने
मढवलेल्या महानायकाच्या 
तीन मजली कटआऊटवर
रिक्‍त होत होते दुधाचे हंडे,
सुरू होता मंत्रघोष अव्याहत
महानायकाच्या दीर्घ आयुष्याचा.
प्रसिद्ध फुलांच्या सुगंधाने
घटकाभरात मढून गेले
अवघे थिएटर...सारेच आवार.
हेलिकॉप्टरमधून करण्यात आली
टनावारी लाल पंखुड्यांची 
समारंभपूर्वक पुष्पवृष्टी
टाळ्यांच्या कडकडाटात
प्रदर्शन घटिका समीप येत होती...

बॉक्‍स ऑफिसच्या खिडक्‍यांसमोरील
रांगा होत गेल्या अधीर...
बंद खिडक्‍यांची कवाडे उघडल्यावर
पहिल्यांदा आपला हात हातोहात
घुसवून यशस्वी होणाऱ्या
रसिकांसाठी फुटत होत्या
शिट्या आणि टाळ्यांच्या लाह्या.
‘ब्राव्हो, ब्राव्हो!’ च्या आरोळ्या.
एकच धडपडाट. 
मध्येच घुसणाऱ्या आगंतुकांच्या
पाठीवर पडले धबके,
शिव्यांची लाखोली, 
लाथांचा यथेच्छ मारा,
...आणि त्या अफाट कल्लोळात
अचानक बंद झाली खिडकी.
शेजारील ॲडव्हान्स बुकिंगच्या
खिडकीत एरव्ही दात कोरत
बसलेल्या कार्कुनाला आला भाव.
पेढीवरल्या शिराळशेटजीचा.
तिकिटांचा गठ्ठा समोरच्या
कडप्प्यावर हापटत तो ओरडला :
‘‘एक को एकही मिलेगा! 
गडबड नै करनेका!’’ वगैरे.
त्याच्या समोरच्या चिंचोळ्या गजांच्या
कोनाड्यात घुसत होते
एकाच वेळी अनेक हात,
एकमेकांना ढकलत, बुकलत
चुरगळलेल्या नोटांचे बोळे फेकत
मरणप्राय ईर्षेने झुंजणाऱ्या
बहाद्दर चाहत्यांच्या हातात
शांतपणे एकच शिक्‍केबाज तिकिट
देऊन पुढल्या हातातील नोटेचा बोळा
स्वीकारणाऱ्या ठप्पेबाज कार्कुनाच्या
चेहऱ्यावर चढले होते सूर्यतेज.

...इतक्‍यात सटकन बंद झाले
ओसंडणारे बॉक्‍स ऑफिस आणि
गर्दीत उमटला चित्कार. सुस्कारे.
हताशेचे शिवराळ सपकारे वगैरे.
इतस्तत: पांगणाऱ्या चाहत्यांच्या गर्दीत
फिरु लागली एक ओळखीची कुजबूज.
पचास का सौ...पचास का सौ...
पचास का सौ...पचास का सौ...
कुजबुजकेंद्राभोवती आशाळभूतांची
उगीचच खिसेचाचपणी. वाटाघाटी.
एकमेकांच्या खिशातून निघू लागल्या
वाढीव खर्चाच्या काळ्या नोटा.

कोपऱ्यातील चहाच्या टपरीवर
चहा पीत दुर्लक्षाचे कर्तव्य निभावणाऱ्या
पोलिसांकडे ओळखीचा हात दाखवत
फाटक्‍या शरीरयष्टीच्या ब्लॅकवाल्याने
प्यांटीच्या चोरखिशातील तिकिटांचा गड्डा
काढून मोजले आपले प्रॉफिट...
हप्त्यांचा हिशेब.
भाईचा वाटा...आणि बरेच काही.

खेळ सुरु होण्याआधीचा हा खेळ
उत्सुकतेने पाहणाऱ्या एका
हौशी (आणि कफल्लक) चाहत्याच्या
खांद्यावर हात टाकत अखेर
ब्लॅकवाला म्हणाला : ‘‘प्यारे,
इसीको पालिटिक्‍स कहते है,
इसीकोइच पालिटिक्‍स कहते है!’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railway : नवरात्रोत्सवापासून ते दिवाळीपर्यंत... 'या' राज्यात धावणार विशेष गाड्या; 6,000 गाड्यांचं नियोजन, पाहा रेल्वेचं वेळापत्रक

Women Health: पाळी, गरोदरपणा आणि रजोनिवृत्तीचा स्त्रियांच्या आतड्यांवर परिणाम; वाचा डॉ. राकेश पटेल यांचे सविस्तर मार्गदर्शन

Gemini AI Photo Trend: जगातील नेत्यांसोबत हायपर-रिअ‍ॅलिस्टिक फोटो तयार करा! जाणून घ्या सोप्या स्टेप्स...

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजना बंद होणार नाही: मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही

SIP Top 5 Mistakes: SIP मध्ये गुंतवणूक करताय? या 5 चुका टाळा, नाहीतर रिटर्न्स मिळण्याऐवजी नुकसान होऊ शकतं

SCROLL FOR NEXT