Mrunalini-Chitale 
संपादकीय

पहाटपावलं : आनंदघन दसरा

मृणालिनी चितळे

शेतातील हिरवाई. शरद ऋतूतील सौहार्द. झेंडूच्या माळा. नवरात्रीचा नंदादीप. पराक्रमाच्या पताका. रावणवधाचा जल्लोष. सीमोल्लंघनाची परंपरा. साडेतीन मुहूर्तांतील एक दिवस. दुर्गादेवीचा उत्सव. पाटीपूजन... दसरा शब्द उच्चारला की हे सारं एका क्षणात डोळ्यांसमोर येतं. पाटीपूजन शब्द लिहिताना आपोआप आठवले शाळेतले दिवस. आदल्या दिवशी पाटीवर कोळसा उगाळून ती काळी कुळकुळीत करण्यासाठी आम्हा मुलांत चढाओढ लागायची. तिच्यावर मग आकड्यांची सरस्वती रेखाटायची. एखाद्याच्या घरी बऱ्यापैकी चित्रकला असलेले बहीण-भाऊ असले की त्याच्या पाटीवर हातात वीणा घेऊन मोरावर बसलेली सरस्वती झळकायची. कॉलर ताठ करून फिरायला तेवढंही निमित्त पुरायचं. त्या दिवशी दप्तरात फक्त पाटी, गूळ-खोबरं, आपट्याची पानं आणि झेंडूची फुलं असायची. पाटीपूजन झाल्यावर दप्तरातील सोनं लुटून घरी यायचं. आजकालच्या मुलांना यातील गंमत कळायची शक्‍यता कमीच. कारण, बहुसंख्य शाळांमधून पाटी बाद झालेली आहे. आज मुलांजवळ पाटी नाही. त्यामुळे कोळसा उगाळून ती काळीशार करण्यातला निर्भेळ आनंदही.

पूर्वी दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी सोनं लुटायला बाहेर पडायची पद्धत होती. फक्त आपल्या वाड्यातील नाहीत, तर संपूर्ण गल्लीतील आजी-आजोबा वाट पाहत असायचे. हातावर लिमलेटची गोळी किंवा खडीसाखर मिळायची. आजकाल अनेकजण पर्यावरणाचा विचार करून आपट्याची पानं सोनं म्हणून लुटत नाहीत. ही गोष्ट नक्कीच स्वागतार्ह आहे, पण सोनं लुटण्याच्या निमित्तानं घरोघर जाणं, साधी तोंडओळख असली तरी बेदिक्कत जाणं, मुलांना जाऊ देणं अनेकांना पटत नाही. कुणाकडेही फोन केल्याशिवाय जाणं आपल्या शिष्टाचारात बसत नाही. पण, त्यामुळे असे अकस्मात भेटीचे आणि त्यातून मिळणाऱ्या आनंदाचे प्रसंग आपल्या आणि आपल्या मुलांच्या हातून निसटत चालले आहेत काय? आयुष्याला आलेल्या अफाट वेगामुळे आखीव-रेखीव जगणं, स्वत:चा वेळ आणि पैसा मोजूनमापून खर्च करणं ही आपली जीवनशैली बनली आहे. रोजच्या दिनक्रमात त्याला पर्याय नाही, हे मी समजू शकते, पण एखाद्या दिवशी स्वत:ला सैल सोडणं, आपल्या नात्यागोत्यातील ज्येष्ठ व्यक्तींना भेटणं किंवा त्या पलीकडं जाऊन वृद्धाश्रम वा अनाथाश्रमातल्या मुलांच्या भेटीगाठी घेणं सहज शक्‍य होऊ शकतं. दसऱ्याचं निमित्त साधून सीमोल्लंघन करायला आपण काही राजे नाही. परंतु, आपल्या रोजच्या जगण्याच्या आपणच घालून घेतलेल्या सीमारेषा ओलांडून आनंदाचे क्षण शोधणं, एक दिवस तरी आनंदघन होऊन जगणं, बरसणं आणि आनंदाचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोचवणं हे एक शुभकार्य ठरू शकतं आणि त्याची सुरवात करायला दसऱ्यासारखा दुसरा कोणता शुभ दिवस असणार आहे?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT