Mrunalini-Chitale 
संपादकीय

पहाटपावलं : जात्या, तू ईसवरा....

मृणालिनी चितळे

लोकसाहित्यातील ओव्या वाचत असताना एक विलक्षण नातं नजरेत भरलं; ते म्हणजे बाईचं जात्याशी असलेलं नातं. पिठाची गिरणी येण्याआधी ‘धान्य दळणं’ हा स्त्रीच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. जात्यावर दळताना कष्टाचा भार हलका होण्यासाठी ओव्या म्हणणं स्वाभाविकपणे घडायचं. म्हणूनच ती म्हणते,

जात्याची भरली पाळू, बोटांनी फोडू न्हायी
मालन जाऊबाई, मुक्‍यानं दळू न्हायी
एक एक ववी, लाखाला ग घ्यावी
अशी सये आवडीनं, जीवाभावानं ग गावी.

स्त्रियांनी ओव्या रचल्या, त्या बहुतेक वेळा दळणकांडण, सडासारवण अशी नित्याची नि कष्टाची कामं करताना. या ओव्या एकीनं दुसरीच्या हातात, फुलांची ओंजळ रीती करावी इतक्‍या सहजपणे हस्तांतर होत गेल्या. जात्यावरच्या ओव्यांमधून निसर्ग, ईश्वर या गोष्टींविषयी तिच्या लेखी असलेलं महत्त्व नि त्याच वेळी अशी कामं करताना तिला पडणारे कष्ट याचं वर्णन करताना ती म्हणते,

जात्या तू ईसवरा, तू तं डोंगरीचा ऋषी
खोलते तुझ्यापाशी, माझ्या हुरुदाच्या राशी
जात्या ईसवरा, नको मला तू जड जाऊ
मायबाईच्या दुधाचं, किती तुला मी बळ लावू

आपल्या लोकसंस्कृतीत जात्याला दिलेलं महत्त्व फक्त स्त्रियांचं भावविश्व आणि ओव्या यांच्यापुरतं सीमित झालेलं नव्हतं; तर संपूर्ण समाजानं त्याला समृद्धीचं प्रतीक मानलं होतं. लग्न-मुंजीसारख्या मंगलकार्यात त्याची पूजा केली जायची. ताशा-वाजंत्रीच्या तालात हळद दळून मुहूर्त केला जायचा.

तेव्हा उत्स्फूर्तपणे ती ओवी रचते,
बंधूच्या लगीनाचा, मुहूर्त केला जात्या
वाजंत्री वाजत्याती, मायबाईच्या गं जोत्या

अशा ओव्या वाचल्या की जातं नि जातेसंस्कृती डोळ्यांसमोर येते. झुंजुमुंजू वेळ. चौसोपी वाडा. अंगण. तुळस. ओटी. माजघर. कणग्या. स्वयंपाकघर. कोपऱ्यातील चूल. उकळणारं दूध. गाईगुरांचा गोठा. शेणाचा वास. जात्याची घरघर. बांगड्यांचा किणकिणाट नि ओठातून उमटणारी ओवी. जातं शहरातूनच नाही, तर बहुतांश खेड्यापाड्यांतूनही हद्दपार झालं आहे. आजच्या पिढीला ते चित्रातून दाखवलं तरी ते ओढताना पडणारे कष्ट कळणार नाहीत.

कदाचित जात्यावरच्या ओव्यांमधून झरणारी उत्कटताही त्यांच्यापर्यंत पोचणार नाही. आज जातं नाही म्हणून बाईचे कष्ट कमी झाले आहेत असं नाही. नवे ताण. नवीन जबाबदाऱ्या. कष्टांचा वेगळा प्रकार. हे सारं पेलताना तिच्याजवळ उरलेला नाही तो जात्यासारख्या निर्जीव गोष्टींवर जीव लावण्याइतका पुरेसा वेळ नि त्याच्याशी हितगुज करण्याचा भाबडेपणा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: हा व्हिडिओ खास आहे... नातं रक्ताचं नव्हतं, पण... जंगलात वाजली शहनाई, CRPF जवानांनी निभावलं वधूच्या भावाचं कर्तव्य

Ashadhi Wari 2025 : बंधुभेटीच्या सोहळ्याने अवघे वैष्णव भावुक; संत ज्ञानेश्वर महाराज-संत सोपानदेवांच्या भेटीचा सोहळा अनुभवण्यासाठी गर्दी

Satara Crime : धोमच्या चोरीप्रकरणी एकास अटक; नवनाथ दत्त मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास

Public Health Corruption: आरोग्य खात्यात साहित्य खरेदीत गैरव्यवहार; आमदार डाॅ. राहुल पाटील यांचा विधानसभेमध्ये आरोप

Latest Maharashtra News Updates : अमित शहांचा आज पुणे दौरा, वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT