Swami-Vardanand-Bharti 
संपादकीय

सात्त्विक विचारांचा प्रसारक

प्रवीण दीक्षित

आयुष्यभर व्याख्यान, कीर्तनांद्वारे सदाचाराचा प्रसार करणारे भाषातज्ज्ञ, कवी व तत्त्वज्ञ प्रा. अनंतराव आठवले ऊर्फ स्वामी वरदानंद भारती यांची आज (ता. १ सप्टेंबर) जन्मशताब्दी. त्यानिमित्त

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्वामी वरदानंद भारती व पूर्वाश्रमातील प्रा. अनंतराव आठवले यांची आज (ता. १ सप्टेंबर) जन्मशताब्दी आहे. आई-वडिलांनंतर माझ्या जीवनावर जास्तीतजास्त कोणाचा प्रभाव असेल तर तो स्वामीजींचा; ज्यांना आम्ही प्रेमाने ‘आप्पा’ म्हणत असू. पुण्यातील प्रसिद्ध ‘आयुर्वेद रसशाळा’ इथे ते प्राचार्य होते व त्यांचे खासगी ग्रंथालय आमच्या शेजारच्या खोलीमध्ये होते. प्राचार्यपदाची धुरा सांभाळत असताना ग्रंथालयाची ती खोली देखभाल करण्यासाठी त्यांनी आमच्याकडे सुपूर्त केली होती. जमिनीपासून छतापर्यंत सर्व खोलीत काचेची दारे असलेली लाकडी कपाटे होती. त्यात विवेकानंदांच्या वाङ्‌मयाचे खंड इथपासून ‘जंगलचा राजा टारझन’चे सर्व भाग अशी विविध विषयांवरील शेकडो पुस्तके होती. इयत्ता दुसरीत असूनही हरि नारायण आपटे यांचे ‘उषःकाल’ हे पुस्तक मी प्रथम तिथेच वाचले होते.

सखोल व्यासंग
राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, पाश्‍चिमात्य दार्शनिकसारख्या अनेक विषयांचे सखोल वाचन व त्याचा समर्पक अभ्यास हे आप्पांच्या भाषणांचा, कीर्तनांचा, लिखाणांचा गाभा होता. ‘मी म्हणजे माझा देह नसून, माझे वाङ्‌मय आहे’ हे त्यांचे उद्‌गार किती सार्थ आहेत हे त्यांचा ग्रंथसंभार पाहून वारंवार जाणवत राहते.जवळजवळ सहा फूट उंची, धोतर, तपकिरी रंगाचा गळाबंद कोट, काळी टोपी व तेजस्वी मुद्रा अशा आप्पांकडे पाहिल्यावर त्यांची कोणावरही ताबडतोब छाप पडत असे. प्राचार्य असताना फोर्ड मोटारीतून प्रवास करणारे आप्पा तितक्‍याच सहजपणे प्राचार्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर सायकलवर प्रवास करताना आनंदी व समाधानी असत. नूतन मराठी विद्यालयातील ‘महाभारताचे वास्तव दर्शन’ यावरील त्यांची अत्यंत तर्कशुद्ध भाषणे असोत, अथवा अधिक महिन्यानिमित्त खुन्यामुरलीधर देवळाच्या परिसरातील त्यांची रसाळ कीर्तने असोत, हजारो रसिक मंत्रमुग्ध होऊन श्रवणानंद घेत असत. संत दासगणु महाराज यांचा वरदहस्त त्यांच्या ऐहिक व आध्यात्मिक जीवनाला परिसस्पर्श करीत असे.

वाङ्‌मयाचा अमूल्य ठेवा
आप्पांची ‘अनुवाद ज्ञानेश्‍वरी’, ‘मनोबोध’, ‘कृष्णरसामृतकथा’, ‘भगवान श्रीकृष्ण एक दर्शन’, ‘उपनिषदार्थ कौमुदी’ अशी अनेक पुस्तके हजारो लोकांच्या नित्य वाचनात आहेत व त्यातून जीवन आनंदी समाधानी, यशस्वी करण्याचे साधन त्यांना सापडले आहे. जुलै २००२ मधील आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरूपौर्णिमा या दिवशी स्वामीजींचा मुक्काम पुण्यात होता व ‘यशदा’चा प्रभारी महासंचालक म्हणून माझी नेमणूकही पुण्यात होती. माझ्या आग्रहावरून स्वामीजींनी माझ्या निवासस्थानी येण्याचे मान्य केले. एका बाजूला नुकताच उगवलेला चंद्र पूर्ण तेजाने तळपत  होता आणि दुसऱ्या बाजूस स्वामींची ‘यतिपूजा’ करण्याचे सौभाग्य मी आणि माझी पत्नी अरुंधती यांना मिळाले.

नांदेड येथील गोरटे, तसेच पंढरपूर येथील दामोदराश्रम व पुण्यातील नंदनंदन या ठिकाणी त्यांचे वास्तव्य होते; परंतु ते मात्र उत्तरकाशी येथील गंगेच्या किनाऱ्यावरील त्यांच्या मठीतच अत्यंत आनंदात असत. स्वेच्छेने याच ठिकाणी संजीवन समाधी घेऊन त्यांनी स्वतःला अमर केले. त्यांच्या वाङ्‌मयाचा, त्यांच्या कीर्तनांचा थोडासा ठेवा  www.santkavidasganu.org या संकेतस्थळाच्या माध्यमाने भाविकांना उपलब्ध आहे. 
(लेखक राज्याचे निवृत्त पोलिस महासंचालक आहेत.)

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT