Sonali-Navangul
Sonali-Navangul 
संपादकीय

पहाटपावलं : सलमाचा ‘संसर्ग’

सोनाली नवांगुळ

‘दी कोअर ऑफ मॅन्स स्पिरिट कम्स फ्रॉम न्यू एक्‍सपिरिअन्सेस’ असं वाक्‍य आलं ‘इनटू द वाइल्ड’मध्ये नि ताबडतोब आठवली सलमा. परवाच मिठी मारता आली होती, या मजबूत बाईला. ती कवी, लेखक, राजकीय व्यवस्थांमध्ये सक्रिय. आपल्या अनुभवाचं गाठोडं नि त्यातून डोकावणाऱ्या सर्वतऱ्हेच्या इच्छा लिहून-बोलून दाखवण्याचं धाडस कमावलेली. अनुभवांनी जळत-उजळत गेलेली. तिचं गाव नि समाज बायका-मुलींबद्दल इतका कठोर नि कर्मठ, की मुलगी वयात आली की तिचं उंबऱ्याबाहेर पडणं बंद व्हायचं. त्यात सलमानं मैत्रिणीबरोबर पाहिला सिनेमा. त्यावर तर बंदी होती. झालं.

सलमा कोंडली गेली घरात. पाळी झाली की उजवून टाकायचं नात्यातल्या थोराड पुरुषाबरोबर, या रिवाजाला तिनं विरोध केला. कोंडून घेतलं स्वत:ला, तब्बल नऊ वर्षं! उंबऱ्याबाहेर जाण्याचा जिथं प्रश्‍नच नाही, तिथं अनुभवांमधलं नवेपण कुठून येणार? पण, सलमा शोधत राहिली. तिच्या खोलीला हिरव्या रंगाची खिडकी होती. फारशी वर्दळ नसलेल्या रस्त्यावर उघडणारी. बाहेरच्या जगाशी तिला जोडणारा हा झरोका. मैत्रिणीबरोबर करायची कुजबूज, खेळ, रोजच्या जगण्यातली हताशा, स्त्रीच्या दडपलेल्या इच्छा, तिचं खासगी लैंगिक जग नि त्याबद्दलच्या कल्पना, अंधविश्‍वास, जाती-जमातींमधले ताणतणाव, धार्मिक नैतिकतेच्या कल्पनेतून कुटुंबा-कुटुंबांमधल्या मैत्रीची होणारी वाताहत नि या सगळ्यात जगण्यासाठी दिलासे कसे शोधावेत, याची असीम उत्सुकता. सलमा एका खिडकीतून सारं जोखत राहिली. 

खासगी पुरुषसत्ताक जगात बंडाची छोटी छोटी निशाणी फडकवणाऱ्या सर्वसाधारण साक्षर-निरक्षर स्त्रिया सलमाच्या कविता-कादंबरीतून बोलत राहिल्या. नवऱ्याचं रूप आवडलं नाही म्हणून त्याला तलाक देणारी सुंदर, सुबुद्ध फिरदौस सलमानं चितारलीय तिच्या कादंबरीत. गावानं वाळित टाकलं म्हणून फिरदौस मात्र स्वत:ला अंधारात नाही लोटत. संध्याकाळच्या मंद वाऱ्यात ती गच्चीवर जाते, मोगरा हुंगते. पण, फुलं माळायला बंदी. तेव्हा ती तिच्या लांबसडक केसांच्या अंबाड्याच्या आत फुलं ठेवते नि इच्छा पुरी करते. सलमानं कथात्मक साहित्यात लिहिलेल्या या बायका तिच्या खऱ्या आयुष्यात कुठंना कुठं भेटलेल्या. त्यातून ती स्वत:ला जोडत राहिली. लपूनछपून लिहिलेल्या पहिल्या काव्यसंग्रहाला पुरस्कार मिळाल्यावर सलमाचं म्हणजे रूकय्याचं लेखकपण उजेडात आलं. त्यातून हल्ले झाले, आरोप झाले, बंदी लादली गेली, तरी तिनं पर्वा केली नाही. आयुष्यातील दबावांच्या तपशिलांना निरखत, त्याची रांगोळी घालत, उधळत ती लिहीत राहिली आहे. या अनुभवसंसर्गातून खूप मुली आपलं हरितद्रव्य शोषायला उंबरठ्याबाहेर पडल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT