Dhing Tang Sakal Media
editorial-articles

ढिंग टांग : आषाढाच्या पहिल्या दिवशी…!

ब्रिटिश नंदी

आषाढाच्या पहिल्या दिवशी

नभात मेघांचा कोलाहल

भिजून ओल्या कौलारांवर

रेघ धुराची, धूसर सावळ

आषाढाच्या पहिल्या दिवशी

कुंद नभाची उत्सुक गाणी

ज्येष्ठाच्या धाकात वावरे

सृष्टी सांगते मौन कहाणी

आषाढाच्या पहिल्या दिवशी

सृष्टी उघडते दार कवाड

उंबरठ्यावर उभा रांगडा

हसतो आणिक दुष्ट लबाड

आषाढाच्या पहिल्या दिवशी

धसमुसळ्याची अधीर बात

युध्दभूमिचा कुणी शिपाई

जणू परतला लई दिसात

आषाढाच्या पहिल्या दिवशी

जलमेघांची वरती वर्दळ

आणि भूमिवर इथे खालती

आतुरतेचा मादक दर्वळ

आषाढाच्या पहिल्या दिवशी

मृद्गंधाची तिसरी लाट

सुगंध लेवुनी सृष्टी सजते

पैठणीचा अन हिरवा थाट

आषाढाच्या पहिल्या दिवशी

वीज घनातच साकळते

आणि अनावर धुंदीमध्ये

वृक्षफांदीवर कोसळते

आषाढाच्या पहिल्या दिवशी

वाऱ्यावरती डुलतो माड

दिवसाढवळ्या दिवे लावुनी

अरे साजणा, उजेड पाड

आषाढाच्या पहिल्या दिवशी

चिखल जाहला हिरवागार

पशापशाने बीज मागते

रुजण्यासाठी शेतशिवार

आषाढाच्या पहिल्या दिवशी

सरीवर सर, सरीवर सर

काम सोडुनि उगाच बसले

खोळंब्याचे एक शहर

आषाढाच्या पहिल्या दिवशी

भल्या पहाटे मुरते ओल

आणि वीजेच्या तारांवरती

पाऊसपक्ष्याचे हिंदोल

आषाढाच्या पहिल्या दिवशी

घोंघवणारी आखाडमाशी

चहात बुडुनि घोळ घालते

स्वत: जातसे जिवानिशी

आषाढाच्या पहिल्या दिवशी

खिडकीमध्ये कोळिष्टक

साळुंक्यांची नुसती कलकल

आणि सदाचे खडाष्टक

आषाढाच्या पहिल्या दिवशी

घननीळाचे स्मित हल्लक

निळेसावळे हसून म्हणतो :

‘‘अजून आहे श्रीशिल्लक!’’

आषाढाच्या पहिल्या दिवशी

निळ्या धरेला निळीच बाधा

मल्हाराच्या सुरावटीवर

वसुंधरेची होते राधा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BSF Success Story: शेतकरी आई-वडिलांच्या कष्टांचे चीज; मुलाची सीमा सुरक्षा दलात निवड, डोळ्यातून आनंदाश्रू, मित्रांनी उधळला गुलाल!

लहान सावित्री ठरतेय प्रेक्षकांची लाडकी, तक्षा शेट्टीच्या अभिनयाचं कौतुक

Latest Marathi Live Update: परांड्यात दारु उधार न दिल्याने बियरशॉपी चालकाला बेदम मारहाण

Mohan Bhagwat:...तर दहा-बारा वर्षांत जातिभेद संपुष्टात येईल: सरसंघचालक डॉ. मोहन भागवत; छत्रपती संभाजीनगरात प्रबुद्ध नागरिकांशी संवाद!

Stay Warm Without Heater: हीटर न वापरता थंडी म्हणा बाय बाय; घरच्या घरी करा हे 5 स्मार्ट उपाय

SCROLL FOR NEXT