Dhing Tang Sakal media
editorial-articles

ढिंग टांग : सात वरस!

नमोजीभाई सात-सात दाण्यांचे वाटे घालत त्यांना बोलावत आहेत.

ब्रिटिश नंदी

स्थळ : ७, लोककल्याण मार्ग, न्यू डेल्ही.

काळ : अर्थात सात वर्षे उलटलेला!

पात्रे : दोनच...पण सात जणांना भारी!

सकाळची वेळ आहे. हिर्वळीवर उन्हे उतरुन भगवी होत चालली आहेत. गर्द झाडांमध्ये चुकार कोकिळ कुहूकुहू करत आहे. बंगल्याच्या पायऱ्यांवर आहेत. नमोजीभाई, आणि दुसरे मोटाभाई. समोर मोजून सात आढ्यतेखोर मोर संशयी नजरेने बघत उभे आहेत. नमोजीभाई सात-सात दाण्यांचे वाटे घालत त्यांना बोलावत आहेत. मोर ढिम्म हलत नाहीत. अब आगे...

नमोजीभाई : (चिडून) क्रितघ्न, कूपमंडूक, कपटी!!

मोटाभाई : (दचकून) मने शुं कह्यु?

नमोजीभाई : (हताशपणे) आ दिल्लीवाळा मोर! एटला दाणापाणी आपुं छुं, पण एना नखरा तो जुओ!

मोटाभाई : (विनम्रपणे) खबर छे! लातों के मोर, बातों से नही मानेगें, नमोजीभाई! आ दिल्लीना नथी, कोंग्रेसना मोर छे!!

नमोजीभाई : (विचारात पडत) तो पछी शुं करवानुं?

मोटाभाई : (दातओठ खात) हातात दांडका घेऊन मोरांच्या मागे जायचं, आणि पाछळथी-

नमोजीभाई : (हात झटकून) एऊ ना करवाय!! आपडा लोकतंत्र छे! आपडा देश स्वतंत्र थया, त्यारे सात वरस झ्याला! खबर छे ने?

मोटाभाई : (भक्तिभावाने) चोक्कस! सात वरस कसा गेला समझला पण नाय! शुं मज्जानुं दिवस हतु... (भावविभोर होत्साते गाणे गुणगुणत) जाने कहां गए वो दिन, जो कहते थे तेरी याद में, नजरों को हम बिछाएंगे...!

नमोजीभाई : (सुरात सूर मिसळून) मेरे कदम जहां पडे, सजदे किए मेरे यारनें... (इथे मोर सामूहिकरित्या प्राणांतिक दचकतात. लांब जाऊन उभे राहतात.)

मोटाभाई : (समाधानाने) सात वरसमधी आपण देशाचा मोडु...माने चेहरा...एकदमशी बदलून टाकला! (बोटे मोडत) स्वच्छता अभियान, उज्वला गेस योजना, प्रधानसेवक आवास योजना, सरदार पटेलसाबना स्टेच्यू, सेंट्रल विस्टा, किसानलोगांच्या बेंक खात्यात डायरेक्ट पैसा ट्रान्सफर, पछी राम मंदिरना झमेला निपटला! कश्मीरमध्ये त्रसणसोसित्तर कलमच्या बोऱ्या वाजवला! वाहवा!!

नमोजीभाई : (आठवण करुन देत) ते युरियाच्या काम ऱ्हायला! युरियाला लाइम कोटिंग केला होता ते?

मोटाभाई : (काही न कळूनही-) हां हां, आठवला!

नमोजीभाई : (स्वत: बोटे मोडत) पछी मॅड इन इंडिया, स्किल इंडिया, पढो इंडिया, बेटी बचाव, छोडो मंगळयान, पाडो चंद्रयान, उडो राफालयान, इंटरनेशनल योगा डे...हुश्श! लिस्ट तो खतम थतीज नथी!!

मोटाभाई : (सुपरभक्तिभावाने ओथंबत) तुमच्या सगळा सक्सेस स्टोरी सांगायच्या ठरवला तर, आगळ सात वरस काय, सात जनम पण कमती पडणार!

नमोजीभाई : (खुश होत) मोदी हैं तो मुमकिन है मोटाभाई! आव आव आव...अरे, आव ने गधेडाऽऽ... (वाक्य मोरांना उद्देशून होते हे कळायला मोटाभाईंना थोडा वेळ लागतो.)

मोटाभाई : (घाबरत विषय काढत) बंगालमधी त्रण सीटउप्परथी आपडी पार्टी सितत्तर सीटउप्पर गई! आ पण एकप्रकारे सक्सेस स्टोरीच छे!

नमोजीभाई : (सुस्कारा टाकत) ...त्यां मोदी है तो मुश्किल छे!

...दोघेही खांदे पाडून बसतात. ‘मोदी हैं तो मुश्किल है’ हे शब्द वातावरण उदास करतात. मग उभयतांचा पुरेसा अपमान झाला आहे, असे समजून सातही मोर पिसारे फुलवून नाचू लागतात.

निष्कर्ष : भारतीय राजकारणात परस्पर अपमानाचा आनंद निर्भेळ असतो, बाकी सारे तृणमूल असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Wari: कोरडिये काष्ठी अंकुर फुटले, येणे येथे जाले विठोबाचे; संतश्रेष्ठ भानुदास महाराजांनी पांडुरंगास हंपीतून आणले पंढरपूरला

Pune News : माता न तू वैरीनी! ३.५ लाखांसाठी ४० दिवसांच्या चिमुकली विकले...पुण्यातील धक्कादायक प्रकार

Thackeray Brothers : ठाकरे बंधू एकत्र आले, पण; कोल्हापुरात शिवसेना -मनसेचे मनोमिलन हेच मोठे आव्हान

Ashadhi Ekadashi 2025 : ऑस्ट्रेलियातील साधकांकडून वारीची साधना, माउलींच्या पालखी सोहळ्यात पूर्ण केली पायी वाटचाल; दोघे करणार परतवारी

Gahininath Maharaj: महाराष्ट्राची दक्षिण काशी असलेल्या पंढरपुरात सरकारने संतपिट स्थापन करावे : गहिनीनाथ महाराज

SCROLL FOR NEXT