dhing tang
dhing tang 
संपादकीय

अमेठी का डंका..! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी

बेटा : (उत्साहाने एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण...मम्मा, आयॅम बॅक!
मम्मामॅडम : (थंडपणाने) हं!..गुड मॉर्निंग!!
बेटा : (हातातली प्रवासी बॅग ठेवत) भलतीच धावपळ झाली! पण काम फत्ते करून आलो!!
मम्मामॅडम : (काळजीच्या सुरात) आता कुठलं काम फत्ते करुन आलास? एखादं काम फत्ते केलंस की माझ्याकडे आपल्याच पक्षाच्या लोकांची रीघ लागते, म्हणून विचारतेय!!
बेटा : (सहजपणाने खुर्चीत बसून पाय हलवत) दुबईला जाऊन आलो ना! आता फिकीर नाही!!
मम्मामॅडम : (नाराजीनं) दुबईला? ही काय शॉपिंगची वेळ आहे का बेटा? तुला फिकीर कशी नाही? दिवस बदलत चाललेत!!
बेटा : (अभिमानानं) तीन-तीन राज्यांत आपल्या पक्षाचे मुख्यमंत्री बसवणारा नेता मीच आहे! आणि यूपीतही आपलाच सीएम असेल...लिहून ठेव!
मम्मामॅडम : (सुस्कारा सोडत) सगळं इतकं सोपं नसतं बेटा! बंगालच्या ममतादींना तू पीएम झालेला नको आहेस! यूपीच्या बेहेनजींनीही ऐनवेळी घात केलाय! तुझा तो तिथला सायकलवाला मित्र...कोण तो? काय बरं त्याचं नाव...
बेटा : (पाय हलवत) ओह...यू मीन अक्‍कीभैय्या!! त्याच्या सायकलवरुन तर हिंडलो होतो मागल्या खेपेला! आठवतंय ना?
मम्मामॅडम : (कळवळून) पुन्हा ती सायकल आणि तुझ्या खाट सभांची आठवण नको करुन देऊस! (आवराआवर करत) एकदा तुझं सगळं मार्गी लागलं की मी पूर्ण निवृत्त व्हायला मोकळी!! तोवर मलाच कितीतरी गोष्टी बघाव्या लागणार, असं दिसतंय! इलेक्‍शन तोंडावर आलेलं बघून कितीतरी नेते अपेक्षेनं रांग लावून उभे असतात! काय उत्तर देणार?
बेटा : (डोळे मिटून) डोण्ट वरी मम्मा...रांगा आता दोनच ठिकाणी लागतील! औरंगझेब रोडवर आणि दुसरी लोधी इस्टेटच्या घराशी! अब तुम्हे कोई भी तंग नहीं करेगा!
मम्मामॅडम : (आश्‍चर्यानं) अस्सं?..कसं काय बुवा?
बेटा : (विजयी मुद्रेने) ते एक टॉप सीक्रेट आहे! तुम्हाला कोणालाही जमलं नाही, ते मी एका दुबई ट्रिपमध्ये करून दाखवलं!
मम्मामॅडम : (अचंब्यानं) अच्छा?
बेटा : (दुर्लक्ष करत)...दुबईहून सरळ विमान पकडून मी न्यूयॉर्कला जाऊन आलो!
मम्मामॅडम : (आश्‍चर्याचा धक्‍का बसून) डोण्ट टेल मी!! एकदम न्यूयॉर्कला?
बेटा : (मान डोलावत) तिथं मी माझं ब्रह्मास्त्र ठेवलं होतं!
मम्मामॅडम : (घाईघाईनं) असं कोड्यात बोलू नकोस बेटा! नीट काय ते सांग! तुला बरं वाटत नाहीए का?
बेटा : (ताडकन उठून उभे राहात फिल्मी स्टाइलमध्ये) मैं ठीक हूं मम्मा...और इस देश को भी ठीक करने जा रहा हूं! मेरे विरोधकोंको भी ठिकाने लगाने जा रहा हूं! अब न रहेगी कमल पार्टी, न रहेगी ममतादी...और न रहेगा बुवा-भतीजे का डर!! एकाच अस्त्रात मी सगळ्यांना गारद करणार आहे! एकदा येऊ दे ते भारतात!!
मम्मामॅडम : (खुर्चीत बसत) कधी येणार तुझं अस्त्र? की त्या मोदीजींच्या राफेल विमानासारखं अजूनही अधांतरीच!!
बेटा : (खुदकन हसत) अस्त्राचं नाव आहे...आपली प्रियंकादीदी!! ती न्यूयॉर्कला होती, तिला स्वच्छ सांगून आलो, ‘‘दीदी, रिश्‍ते को याद रखना...भाई के इज्जत का सवाल है!! चलो, दिल्ली!! फेब्रुवारीत ती येत्येय! आल्या आल्या मी तिला यूपीत पाठवणार आहे! अमेठी का डंका, बेटी प्रियंका!!
मम्मामॅडम : (अविश्‍वासानं) दीदी पॉलिटिक्‍समध्ये यायला तयार झाली? काय सांगतोस काय? तुझ्या तोंडात साखर पडो!!
बेटा : (चतुर चेहरा करत) आता सांग, आहे का कुणाचा आवाज? म्हणतात ना, सौ सुनार की एक लुहार की...क्‍यों सही है ना?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT