nura al matrooshi 
संपादकीय

‘नाम’मुद्रा : अरब तरुणीला गगन ठेंगणे

दुबईच्या राजाच्या मुलीने घरातून पलायन केल्याची घटना साधारण तीनेक वर्षांपूर्वी चर्चेत आली होती.

जयवंत चव्हाण

थेट राजघराण्यातील मुलीने असे केल्याने चर्चा स्वाभाविक होतीच. मग तो कसा सोन्याचा पिंजरा होता वगैरे मुद्दे पुढे आले... प्रश्न आंतरराष्ट्रीय ठरला. तेव्हा नेहमीप्रमाणेच संयुक्त अरब आमिरातीतील (‘यूएई’) महिलांचे अधिकार, दमनशाही यावर चर्चाही झडल्या; परंतु परिस्थिती बदलत आहे, असे म्हणावे लागेल. नुकतीच संयुक्त अरब अमिरातीचे पंतप्रधान, दुबईचे राजे शेख मोहंमद बिन रशीद अल मख्तूम यांनी अंतराळ मोहिमेसाठी एका मुलीची निवड केली आहे. नुरा अल मत्रोशी असे तिचे नाव. अंतराळ सफरीवर जाणारी ही पहिली अरब महिला ठरणार आहे.

नुरा अल मत्रोशी ही २७ वर्षीय तरुणी शारजामधली आहे. ती मेकॅनिकल इंजिनिअर आहे. विज्ञान विषयात पदवी घेतल्यानंतर तिने फिनलंड आणि सेऊलमध्ये उच्च शिक्षण घेतले. त्यानंतर २०१६पासून ती ‘यूएई’च्या नॅशनल पेट्रोलियम कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये इंजिनियर म्हणून काम करीत आहे. २०११ मध्ये अॅमस्टरडॅम येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये तिने ‘यूएई’ला पहिले स्थान मिळवून दिले होते. अंतराळाबाबत नुराला लहानपणापासून आकर्षण होते. अंतराळ मोहिमांबाबत तिला नेहमी उत्सुकता असायची. आता तर तिला तो अनुभवही घेता येणार आहे.

नुराच्या अंतराळ सफरीच्या निवडीचा प्रवास तसा सोपा नव्हता. त्यासाठी सुमारे चार हजारांवर अर्ज सरकारकडे आले होते. त्यातही १२०० महिला होत्या, हे विशेष. २०१८मधील अर्जांपेक्षा मुलींचे २५० अर्ज जास्त होते. कठीण परीक्षेनंतर नुरा आणि मोहंमद मुल्ला यांची निवड झाली आहे. दोघांचे आता रीतसर प्रशिक्षण होईल. ‘यूएई’च्या मोहंमद बिन रशीद स्पेस सेंटरमध्ये त्यांना प्राथमिक बाबींचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर नासाच्या ह्यूस्टनमधील ‘जॉन्सन स्पेस सेंटर’ला त्यांचे तीस महिन्यांचे प्रशिक्षण होईल. मोहंमद बिन रशीद स्पेस सेंटरची ही दुसरी तुकडी आहे. यंदा एखाद्या महिलेची निवड होईल, असे या सेंटरचे प्रमुख सालेम अल मरी यांना वाटत होतेच. तसे झालेही. महिला नेहमीच काहीतरी वेगळे काम करतात. त्यामुळे नुराच्या आकांक्षांना येथे अथांग विश्व आहे, असा विश्वास अल मरी यांना वाटतो. येथील स्पेस सेंटरमध्येही सुमारे ४२ टक्के महिला कार्यरत आहेत. त्यातही अंतराळ मोहिमेच्या महत्त्वाच्या प्रकल्पात ७० टक्के; तर मंगळ मोहिमेच्या प्रकल्पात ३४ टक्के महिलांचा सहभाग आहे.

मुळात अंतराळ हा विषय पूर्वीपासून पुरुष मक्तेदारीचा मानला जातो. त्यामुळे आतापर्यंत जगभरातून ५६६ जण अंतराळात गेले. त्यात महिला फक्त ६५ आहेत. त्यामुळे या क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा, अशी खुद्द राजे शेख मोहंमद बिन रशीद अल मख्तूम यांचीच इच्छा आहे. नुराच्या पदचिन्हावर ‘यूएई’तील अनेक पावले पडतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

१९६३ मध्ये जगातील पहिली महिला, रशियाची व्हॅलेंटिना तेरेश्‍कोवा अंतराळ मोहिमेवर गेली होती. अरबी महिलेला आता ही संधी मिळते आहे... हे बदलाचे सुचिन्ह आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Fadnavis: मुख्यमंत्र्यांसमोर शस्त्र ठेवून मओवादी नेता भूपती शरण येणार? ६० सहकाऱ्यांसह शरणागती, १० कोटींचं होतं बक्षीस

Ajinkya Rahane: 5-6 वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या खेळाडूंनी निवड समितीत असावं, नाहीतर...; रहाणेचा रोख कोणाकडे?

Ravi Sharma: शंभर कोटींचा टर्नओव्हर सांगणारे रवी शर्मा नेमके कोण? 6 लाखांची जीएसटी अन् रोल्स रॉयसचं स्वप्न

महाठग सापडला! रत्नागिरीतील तरुण मुंबईत आला, जीवनसाथी ॲपवर अविवाहित ‘पीएसआय’ असल्याची नोंदणी केली, ५० ते ६० मुला-मुलींशी संपर्क, फोनवर बोलायचा अन्‌...

Latest Marathi News Live Update: पोलिसाची गाडी बेकाबू, प्रवाशी रिक्षासह दोन दुचाकींना उडवले

SCROLL FOR NEXT