Wheat sakal
संपादकीय

अन्नदाता नि जगाचा त्राता

युक्रेन आणि रशिया युद्ध थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. या युद्धामुळे उरल्यासुरल्या जगाची ही आर्थिक गणिते कोलमडली. काही देशांची अन्नान्नदशा झाली.

मुकुंद वेताळ

युक्रेन आणि रशिया युद्ध थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. या युद्धामुळे उरल्यासुरल्या जगाची ही आर्थिक गणिते कोलमडली. काही देशांची अन्नान्नदशा झाली.

चांगल्या कृषिउत्पादनामुळे भारत अनेक देशांचा अन्नदाता ठरला आहे. आता सरकारने इथली निर्यातबंदी उठवावी आणि शेतीमाल निर्यातीला चालना द्यावी. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळेल. उत्पन्नाचे नवेनवे विक्रम प्रस्थापित होतील.

युक्रेन आणि रशिया युद्ध थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. या युद्धामुळे उरल्यासुरल्या जगाची ही आर्थिक गणिते कोलमडली. काही देशांची अन्नान्नदशा झाली. पाकिस्तानसारख्या देशाची ‘दुष्काळात तेरावा...’ अशी स्थिती झाली. ब्रिटनसारख्या देशातले मॉल रिकामे पडले. युक्रेन आणि रशिया प्रथम क्रमांकांचे गहू उत्पादक आणि जगाला गहू निर्यात करणारे देश; त्यामुळे गव्हाचा पुरवठा एकदमच घटला. ‘नाटो’ सदस्यदेशांनी रशियावर अनेक निर्बंध लादल्याने त्यांच्याकडील तेल आणि नैसर्गिक वायुवरही निर्यातबंदी आली. साहजिकच छोट्या-मोठ्या देशांवर ‘ओपेक’कडून चढ्या दराने तेल घ्यायची वेळ ओढवली.

गव्हाची टंचाई निर्माण झाल्याने युरोपीय देशात पावांसाठी रांगा लागल्या. त्यांच्यापुढे पर्याय उरला नाही. नाईलाजाने सकल विश्व भारताकडे आशाळभूतपणे एक वैश्विक अन्नदाता म्हणून पाहू लागले. सद्यःस्थितीत भारत देश देशांतर्गत अन्नधान्याचा पुरवठा करून अवशिष्ट अन्नधान्यातून थोडेथोडक्या नव्हे तर तब्बल ८४ देशांना अन्नधान्याची निर्यात करतो. युद्ध सुरू होताच भारताने ही निर्यात ताबडतोब थांबविली. कदाचित देशहित लक्षात घेऊन सावधगिरीने उचललेले पाऊल असावे. तरीही मित्रदेशांना औदार्य दाखवत भारताने इजिप्तसारख्या देशाला मोठ्या प्रमाणात गव्हाची निर्यात केली आहे. टंचाईग्रस्त येमेनला गव्हाचा पुरवठा केल्याने कृतज्ञता म्हणून या देशाने संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरून भारताचे आभार मानले. एवढेच काय पाकिस्तानधार्जिण्या तुर्कस्तानला त्यांच्या आपत्कालीन स्थितीत कशी आणि किती मदत केली हे सर्वश्रुत आहे. कित्येक देश अन्नधान्याची मागणी करीत हात जोडून प्रतीक्षेत आहेत. ही यादी भली मोठी आहे.

२०२३ हे चालू वर्ष आपण ‘भरड धान्यवर्ष’ म्हणून साजरी करत आहोत. ही भारतासाठी भूषणवाह बाब आहे. भारतीय संस्कृती सण समारंभ आणि त्या सण समारंभात राज्याराज्यांत बनविण्यात येणाऱ्या त्या पदार्थांचे वैविध्य पहाता ऋतुनिहाय अन्नसेवनाच्या इथल्या पारंपारिक प्रथा प्राकृतिक आणि निरामय मानवी जीवनासाठी उपयुक्त आहेत, हे पिझ्झा- बर्गर खाणाऱ्या भौतिक जगाच्या लक्षात येत आहे. आता ते त्यांच्या खानपान सवयी बदलू पाहात आहेत. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत जशी अन्नधान्याची मागणी वाढत आहे, तशी तयार पदार्थांची प्रचंड मागणी वाढत आहे.

...तर नवचैतन्य येईल

खरंतर या कृषिप्रधान देशाच्या प्रगतीच्या दरात शेतीमालाच्या निर्यातीचा मोठा वाटा आहे. भारताच्या एकूण भूभागापैकी फक्त ४७.७ टक्के इतका भूभाग शेतीयोग्य आहे. राजाराज्यांतील भौगोलिक स्थिती वेगवेगळी आहे. कुठे चेरापुंजीसारख्या ठिकाणी पडणाऱ्या पावसाचा जागतिक विक्रम होतो आणि राजस्थानसारखा भाग पर्जन्यछायेत येतो. बंगाल आणि ईशान्येकडील राज्यात भाताचे आडमाप पीक येते. कमी पावसाच्या प्रदेशात तूर, मूग, मटकी, कुळीथ, उडीद, वाटाणा अशी कडधान्ये पिकविली जातात.

ज्वारी, गहू, नाचणी अशी तृणधान्ये पिकवत सूर्यफूल, भुईमूग, सोयाबीन, तीळ, जवस, कारळा, मोहरी यासाठी सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करत आमचा कृषक सद्यस्थितीत तरी जागतिक उच्चांक प्रस्थापित करीत आहे. श्वेतक्रांतीअंतर्गत दुधाचा महापूर आला. हरितक्रांती अंतर्गत फलोत्पादनाला बरकत आली. बासमती तांदूळ आणि हापूस आंबा उत्पादनात भारत जगात अव्वल आहे. इराणसारख्या देशाला प्रत्येक कृषी वर्षात दहा लाख मेट्रिक टन बासमती निर्यात होतो. सकल अरब देश फळभाज्यांसाठी आणि पालेभाज्यांसाठी भारतावर अवलंबून आहेत.

पंजाब, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र ही गहूत्पादक राज्ये आहेत. तरीही साखर गाळपातही अग्रगण्य आहेत. इथला टोमॅटो कांदा, कापूस, तूर यांच्या विक्रमी उत्पादनाने बाजारभाव कोसळणे नित्याचेच झाले आहे. भाव मिळण्यासाठी आंदोलने होतात आणि कांदा टोमॅटो रस्त्यावर फेकून दिला जातो. शेजारील दयनीय अवस्थेतील पाकिस्तानच्या लोकांना भारताचा हेवा वाटू लागतो. आणि ते म्हणू लागतात,‘काश हम भी इंडिया मे होते...’. २५० रुपये किलो आटा घेण्यासाठी हजारोंच्या संख्येतील रांगा पाहून त्यांना आपली मोफत धान्य योजना आठवते.

भारताने इथली निर्यातबंदी उठवावी आणि शेतीमालनिर्यात व्हावी त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळेल. त्यांच्यात नवचैतन्य निर्माण होईल आणि उत्पन्नाचे नवेनवे विक्रम प्रस्थापित होतील. भारताच्या शिरपेचात ‘वैश्विक अन्नदाता’ म्हणून आणखी एक मानाचा तुरा मिरवला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT