parimal dhawalikar 
संपादकीय

यूथटॉक : मराठी हेच आपलं अवजार

परिमल ढवळीकर

प्रत्येक भाषेला एक संस्कृती असते. ती केवळ संवादाचे माध्यम नसते, तर भाषकाशी तिचं जैविक नातं असतं. मराठीलाही एक विशिष्ट संस्कृती आहे. कोणतीही भाषा ही समाजव्यवहाराचे साधन, त्या व्यवहाराचा अंगभूत भाग असल्यामुळे त्या त्या भाषिक समाजाच्या परंपरेचा व संस्कृतीचा ठसा तिच्यावर पडत असतो. या दृष्टीने मराठी भाषेची आजची स्थिती व तिच्यातला शब्दसंग्रह हा मराठी समाजाच्या विशिष्ट परंपरेचा आणि इतिहासक्रमाचाच परिपाक असल्याचं म्हणता येईल. मराठीची संस्कृती ती हीच. ही संस्कृती वाढावी, फुलावी, रुजावी यासाठी शालेय स्तरापासून प्रयत्न होणं गरजेचं आहे. इंग्रजीचा वरचष्मा असल्याबद्दल आपल्याकडे खंत व्यक्त होत असते. एकविसाव्या शतकातली ज्ञानभाषा इंग्रजी झाली आहे, हे तसं आता सर्वमान्य झालं आहे. भाषा जेव्हा ज्ञानभाषा होते, तेव्हाच ती खऱ्या अर्थाने समृद्ध होते. इंग्रजी तशी होती आणि आहे. तशी होण्यासाठी अनेक शास्त्रांवर मान्यता मिळवणारी ग्रंथनिर्मिती व्हावी लागते. मराठीसारख्या भाषेचं जतन करण्यासाठी केवळ अस्मिता उपयोगाची नाही.

भाषेची श्रीमंती तिच्यातील शब्दसंख्या, शब्दसौंदर्य आणि सामर्थ्यावर अवलंबून असते. इंग्रजीमधील शब्द मराठीत आता सर्रास वापरले जात आहेत. पण ‘पॉलिसी पॅरॅलेसिस’सारख्या शब्दांचा वापर ‘धोरण लकवा’ म्हणून केला, तर अर्थाकलन तातडीनं होतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुतांश लिखाण इंग्रजीत केलं असलं, तरी त्यांनी अस्सल आणि प्रभावी मराठीतही लिखाण केलं आहे. ‘हिंदू धर्मसमीक्षा’, ‘वैदिक संस्कृती’ यांसारखे संदर्भग्रंथ लिहिणाऱ्या तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींनी संस्कृतमधून हे साहित्य मराठी भाषेत आणलं. लोकमान्यांच्या ‘गीतारहस्या’त इंग्रजीचा आढळ होणार नाही. अशी कितीएक उदाहरणं द्यावीत. विनोबांना दहा ते बारा मराठी भाषा येत होत्या. त्यांनी त्याची सरमिसळ कधी होऊ दिली नाही.
भाषेच्या संवर्धनासाठी ती भाषा सक्षम आणि लवचिक असणं गरजेचं असतं. सामाजिक व्यवहाराच्या सर्व क्षेत्रांत तिचा प्रवेश व्हायला हवा. आजचं युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात इंग्रजीचा बोलबाला आहे. त्यामुळे इंग्रजीचा वरचष्मा असणं स्वाभाविक आहे. जागतिकीकरणामुळे सेवा क्षेत्रात तांत्रिक भाषेची गरज जास्त भासत आहे. त्यामुळे या क्षेत्रात मराठी माणसांनी येऊन प्रगतीबरोबर मराठीचा प्रसार केला पाहिजे.

मराठी भाषेच्या भवितव्यासाठी इंग्रजी व इतर माध्यमांच्या शाळेत मराठी शिकवण्याची सक्ती करावी, यासाठी साहित्यिक, मराठीचे प्राध्यापक, साहित्य संस्था व अन्य धुरीणांनी खूपच मनावर घेतलं आहे. कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिवस हा ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणून साजरा करताना उत्सवी मराठीजनांचं दर्शन घडत असतं. तथापि, मराठी भाषेचं भवितव्य उज्ज्वल असावं, यासाठी नेमकं काय करायला हवं, या संदर्भात ठोस असं काहीच हाती लागत नाही.
मराठी लोकांमध्ये एक प्रकारची न्यूनगंडाची भावना असते. त्यामुळे आपण इंग्रजी वापरून वरच्या वर्गात गेल्याचं समाधान मिळत असावं. हे नेमकं काय ते कळत नाही. यापैकी अनेकांना तर धड मराठी येत नाही व इंग्रजीही नाही, अशी अवस्था असते. हे सगळं आपण टाळू शकतो. राज्यातल्या सर्वच प्राथमिक/माध्यमिक शाळांमध्ये मराठी शिकवली गेली, तर भाषेला चांगले दिवस येतील. मराठीतून शिक्षण हे मराठीच्या संवर्धनासाठी महत्त्वाचं आहे. मराठी भाषा शिकण्यापासून मोठा वर्ग वंचित राहिला, तर या चर्चेला काही अर्थ उरणार नाही. त्याकरिता किमान दहावीपर्यंत मराठीचं शिक्षण गुणवत्तापूर्ण मिळेल, असं पाहिलं पाहिजे.

मराठी माध्यमात शिकलेले लोक मराठी टिकवतील, ही कल्पना जशी चुकीची आहे, तशीच इंग्रजी माध्यमात शिकलेले लोक मराठी बुडवतील, असंही समजण्याचं कारण नाही. ‘मराठी विरुद्ध इंग्रजी माध्यम’ हा वाद घालत न बसता मराठी माध्यमांत पहिलीपासून चांगलं इंग्रजी शिकवण्याची आणि प्रत्येक इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पहिलीपासून दर्जेदार मराठी शिकवणं ही काळाची गरज आहे. तरुणाईचा प्रतिनिधी म्हणून मला असं वाटतं, की आपापल्या मराठी बोलीभाषेत बोलायला कुणाही मराठी तरुणाला लाज वाटणार नाही. त्यासाठी मराठी काल-परवा कशी होती याची तटस्थपणे जाणीव करून घ्यायला हवी. कारण तेच आपलं अवजार आहे, हेच आपलं संचित आहे. त्याला छान जपावं, प्रसंगी गोंजारावं, इतकंच.
(लेखक बार्शीस्थित लेखक व लघुउद्योजक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: अहिल्यानगरमध्ये मोठा अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल झाले, ९ वाहनांना धडक दिली अन्...; भीषण घटना

Paralysis Warning Signs : पॅरालिसिसचा झटका येण्याआधी शरीरात दिसतात 'हे' 2 बदल; चुकूनही करू नका दुर्लक्ष, नाहीतर जीव गमवाल

Pooja Khedkar: पुजा खेडकर कुटुंबाचा नवा वाद! नवी मुंबईतील अपहरणकर्ता पुण्यातील घरी आढळला, पोलिसांचा तपास सुरू...

Latest Marathi News Updates: तासगांव तालुक्यातील पेड गावात बिबट्या कोंबड्या खायला गेला आणि खुराड्यात अडकला

Dhule News : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे बोगस डॉक्टरांवर कारवाईचे आदेश

SCROLL FOR NEXT