Water Supply sakal
संपादकीय

कर्बमुक्तीच्या पाऊलवाटा : पाणीबचत ही ऊर्जाबचतही

पाणी बचतीचे महत्त्व जाणून पुढील काळात त्याला मर्यादित संसाधन या दृष्टीने आपल्याला पहावे लागेल अथवा, इंधनाप्रमाणेच अधिक किंमत पाण्याला मोजावी लागणार आहे.

प्रकाश मेढेकर

पाणी बचतीचे महत्त्व जाणून पुढील काळात त्याला मर्यादित संसाधन या दृष्टीने आपल्याला पहावे लागेल अथवा, इंधनाप्रमाणेच अधिक किंमत पाण्याला मोजावी लागणार आहे.

पाणी बचतीचे महत्त्व जाणून पुढील काळात त्याला मर्यादित संसाधन या दृष्टीने आपल्याला पहावे लागेल अथवा, इंधनाप्रमाणेच अधिक किंमत पाण्याला मोजावी लागणार आहे. पाण्याचे शुद्धीकरण, निर्जंतुकीकरण आणि वाहतुकीसाठी मोठया प्रमाणात उर्जेची गरज असते. पाण्याची बचत केली असता ऊर्जेची बचत घडून वातावरणातील कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल . त्यामुळे पाण्याचा प्रत्येक थेंबाचा योग्य वापर आपण केला पाहिजे .पाण्याचा वापर, पुनर्वापर, शुद्धीकरण, भूजलपातळी, नैसर्गिक स्तोत्रांचे जतन, पाण्याची साठवण, पाणी बचत करणाऱ्या उपकरणांचा वापर, वृक्षारोपण, वनीकरण, जैववैविध्यता, रेन वॉटर हार्वेस्टिंग इ. गोष्टीं पर्यावरण संतुलनासाठी आजच्या काळात महत्वाच्या बनल्या आहेत.

कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी नुसती झाडे लावून चालणार नाही तर, त्यांना जगवण्याचे प्रमाणिक प्रयत्न करावे लागतील. पाण्याची गळती अथवा चोरी, अनधिकृत नळजोड, भूजलाचा अत्याधिक उपसा, पाण्याचे प्रदूषण या गोष्टींवर स्थानिक प्रशासनाचे नियंत्रण असणे तितकेच महत्वाचे आहे . पाण्याची वाढती गरज भागवण्यासाठी सांडपाण्याचे शुद्धीकरण करून त्याचा पुनर्वापर करण्याची वेळ आता आली आहे. सिंगापूरमध्ये सांडपाण्याचे १०० टक्के शुद्धीकरण करून पिण्यासाठी त्याचा वापर होत आहे.

बांधकाम क्षेत्रातील ‘ग्रीन बिल्डिंग’ संकल्पनेत पाण्याचा योग्य वापर, पुनर्वापर, ऊर्जा आणि पाण्याची बचत यांना प्राधान्य दिले आहे. पाणी बचतीसाठी बांधकाम क्षेत्रात सध्या रेडिमीक्स मॉर्टर, जिप्सम प्लास्टर, प्रिकास्ट तंत्रज्ञान, मॉड्यूलर क्युरिंग, काँक्रीट अॅडमिक्शर यांचा वापर होत आहे. भूजलाची पातळी वाढवणाऱ्या सच्छिद्र काँक्रीटने सुद्धा बांधकामात पदार्पण केले आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि सच्छिद्र काँक्रीटने भूजल पातळीत वाढ होऊन वृक्षसंपदेची वृद्धी होईल आणि वातावरणातील कर्ब उत्सर्जन कमी होण्यास मदत घडेल.

देशातील ७० टक्के वीजनिर्मिती कोळश्याच्या वापर असणाऱ्या औष्णिक पद्धतीने होते. या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर ऊर्जा आणि पाण्याचा वापर होत असतो . यावेळी पाण्याचे बाष्पीभवन होऊन उष्णता निर्माण होते. ही उष्णता शोषण्यासाठी याठिकाणी असणाऱ्या कूलिंग टॉवरला पाण्याऐवजी एअरकुल्ड कंडिशनरचा वापर आपल्याला करावा लागेल. आखाती देशात समुद्राचे खारे पाणी डी सॅलिनेशन तंत्रज्ञानाचा वापर करून पिण्यासाठी गोडे केले जाते. अशा प्लान्टमधून एकाचवेळी वीजनिर्मिती आणि पाण्याचे शुद्धीकरण केले जाते. त्यामुळे उर्जेची मोठ्या प्रमाणावर बचत होते.

राष्ट्रीय भवन निर्माण संहितेनुसार आपल्याला दररोज दरडोई १३५ लिटर पाण्याची आवश्यकता असते . यापैकी घरातील स्वच्छतागृहात सर्वाधिक ९० लिटर पाण्याचा वापर आपण करत असतो. अशा ठिकाणी पारंपरिक उपकरणांएवजी पांणी बचत करणाऱ्या उपकरणांचा पर्याय निवडला असता अंदाजे २० टक्के पाण्याची बचत होते . प्रगत देशात पाणी बचत करणाऱ्या उपकरणांची निर्मिती आणि वापर करण्याचे बंधन असते. देशातील लीड, टेरी, ग्रिहा, इंडियन प्लम्बिंग असोसिएशन, इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल, इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ प्लम्बिंग अॅन्ड मेकॅनिकल ऑफिशियल अशा संस्था पाणी बचतीसाठीचे उपक्रम सातत्याने करत असतात. पाणी आणि ऊर्जा बचतीचे महत्त्व जाणण्यासाठी अशा उपक्रमांत लोकसहभागाची आवश्यकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE: what a throw! पाकिस्तानी खेळाडूने अम्पायरला चेंडू फेकून मारला, वसीम अक्रमने केलं कौतुक! सोशल मीडियावर ट्रोल

Kharadi Traffic : खराडी-हडपसर रस्त्यावर बेशिस्त पार्किंग, वाहतूक कोंडी व अपघाताची शक्यता; नागरिकांची कारवाईची मागणी

Handshake Controversy Timeline : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची टप्प्याटप्प्याने कशी नाचक्की होत गेली ते वाचा... Andy Pycroft प्रकरण त्यांच्यावरच कसं उलटलं?

Latest Maharashtra News Updates : लासलगावमध्ये एकतर्फी प्रेमाच्या संशयातून तरुणावर कोयत्याने हल्ला...

Family Travel Tips: फॅमिलीसोबत प्रवासात निघालात? डिहायड्रेशनपासून बचावासाठी ही फळं सोबत ठेवा!

SCROLL FOR NEXT