Preventing global warming weather update environment gmi Sakal
संपादकीय

तापमानवाढ अशी रोखावी...

ऐंशीच्या दशकात जागतिक वार्षिक सरासरी तापमानवाढ जाणवायला लागली. लोकांना त्याची जाणीव जशी व्हायला लागली तसतसे माध्यमातून चर्चा व पर्यावरणाशी संबंधित सेवाभावी संस्थांनी या विषयाची मोठ्या प्रमाणात दखल घेण्यास सुरूवात केली.

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. व्यंकटराव घोरपडे

ऐंशीच्या दशकात जागतिक वार्षिक सरासरी तापमानवाढ जाणवायला लागली. लोकांना त्याची जाणीव जशी व्हायला लागली तसतसे माध्यमातून चर्चा व पर्यावरणाशी संबंधित सेवाभावी संस्थांनी या विषयाची मोठ्या प्रमाणात दखल घेण्यास सुरूवात केली. प्रसारमाध्यमांना देखील हा विषय महत्त्वाचा वाटला; मग एकूणच जागतिक स्तरावर याची चर्चा सुरू झाली.

२०२३ हे वर्ष सर्वाधिक उष्ण ठरल्याचे आणि सरासरी १.४५ अंश सेल्सिअस तापमानवाढ नोंदवल्याचे आपण पाहिले. एकूणच निसर्गात होणाऱ्या हे बदल ज्या वेगाने घडत आहेत त्याचा विचार केल्यास सन २१००मध्ये जागतिक तापमानवाढ ही एकूण दीड अंश सेल्सिअसने वाढेल, असे गृहित धरून एकूणच उपाययोजनांबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.

तापमानवाढीसाठी कारणीभूत असणाऱ्या मिथेन उत्सर्जनाबाबत जागतिक स्तरावर ग्लोबल मिथेन इनिशिएटिव्ह (जीएमआय) या संस्थेमार्फत कोळसा खाणी, शेती आणि कचरा व्यवस्थापनातून व इतर क्षेत्रातील मिथेन उत्सर्जन कमी करण्यासाठी सरकारी उद्योग व सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून काम सुरू आहे.

अनेक देशांना मिथेन उत्सर्जन कमी करण्याचे प्रकल्प विकसित करणे, त्यासाठी तांत्रिक व कौशल्य आधारित मदत करत आहे. त्याचबरोबर युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्वेक्शन ऑन क्लायमेट चेंज (यूएनएफसीसीसी), द क्लायमेट अँड क्लीन एअर कोएलिशन (सीसीएसी), द मिथेन टू मार्केट पार्टनरशिप (एमटूएम) अशा जागतिक स्तरावरील इतर संस्थाही अशा प्रकल्पांना प्रोत्साहन व पाठिंबा देत असतात.

आपल्या देशातही नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज (एनएपीसीसी) अशी सर्वसमावेशक योजना आहे. ती भारतातील हवामान बदलास तोंड देण्यासह मिथेन उत्सर्जन रोखण्यासाठी इतर योजना आखते. कचरा व्यवस्थापनासाठी सुधारित पायाभूत सुविधा पुरविण्यावर भर देण्यात येत आहे.

नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम (एनसीएपी) या संस्थेद्वारे भारतातील मोठ्या शहरातील वायू प्रदूषणाबाबत नियंत्रण ठेवण्यात येत आहे. त्यामध्ये मिथेन वायूसह इतर प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत.

सुधारित पशुधन व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करण्यासाठी निरनिराळ्या माध्यमातून विविध संगणकीय प्रणालीद्वारे समतोल आहाराबाबत मार्गदर्शन करणे, त्याचबरोबर मिथेनचा मोठ्या प्रमाणात ऊर्जास्त्रोत म्हणून वापर करण्यासाठी बायोगॅस सयंत्र उभे करून त्यांना मदत देण्यात येत आहे.

वैयक्तिक पशुपालकांनी देखील आपल्या जनावरांना संतुलित पोषण आहारासह निरनिराळ्या बाबींचा समावेश हा पशू आहारात केला पाहिजे. विशेषतः मूरघासाचा वापर वाढवला पाहिजे. सोबत चिंचेच्या बियाचा चुरा, ओट या चाऱ्याचा मुरघास आणि वाळलेला सकस चारा हे देखील मिथेन उत्सर्जन कमी करण्यासाठी मदत करतात, असे आढळले आहे.

भारतीय कृषी अनुसंधान परिषदेंतर्गत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲनिमल न्यूट्रिशन अँड फिजिओलॉजी, बंगळूर (एनआयएएनपी) यांनी ‘हरित धारा’ नावाचे पूरक खाद्य तयार केले आहे. साधारण ५०० ग्रॅम मोठ्या जनावरांना आणि २५० ग्रॅम चार महिन्यांवरील लहान जनावरांना (चार महिन्याच्या आतील जनावरांना देत नाहीत) हे पूरक खाद्य देऊन तितकेच पशुखाद्य कमी करून १७ ते २० टक्के मिथेन उत्सर्जन कमी करता येते.

सोबत दूध उत्पादनातही वाढ होते. या आणि अशा अनेक पशुखाद्य पूरकांवर संशोधन सुरू आहे. यथावकाश ते योग्य पद्धतीने उपलब्ध होतील. त्यांचा वापर फायदेशीर ठरेल. प्रभावी खत व्यवस्थापनातून कंपोस्ट खड्ड्यात खतनिर्मिती व त्याचा नियमित वापर केल्यास मिथेन उत्सर्जन कमी करता येऊ शकते.

गोठ्यातील वायुविजनाकडे देखील लक्ष देणे आवश्यक आहे. सोबत पशुपालकांचे नियमित प्रबोधन आणि प्रशिक्षणही फायदेशीर ठरेल. सोबत शाळेतील अभ्यासक्रमात अशा विषयांचा समावेश येत्या काळात करावा लागेल.

वैयक्तिक पातळीवर देखील सर्वसामान्य जनतेला कचरा व्यवस्थापन व सौर, पवन आणि जलविद्युत यांसारख्या ऊर्जास्त्रोतांचा वापर वाढवण्यासोबत एलईडी बल्ब वापरणे, एअर कंडिशनरचा वापर कमी करणे व वापरात नसताना विद्युत उपकरणे बंद ठेवणे यांसह वृक्ष लागवड, सोबत सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवल्यास मोठ्या प्रमाणात जागतिक तापमानवाढ कमी करण्यासाठी निश्चितच मदत होऊ शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK, Asia Cup: भारतानं हस्तांदोलन टाळलं, पण पाकिस्तानची कारवाई आपल्याच अधिकाऱ्यावर; पदावरूनच केलं बडतर्फ

Latest Marathi News Updates :मुसळधार पावसामुळे सोलापूरकरांचे हाल, नागरिकांच्या घरात शिरलं ड्रेनेजचं पाणी

Saurabh Bharadwaj Challenge SuryaKumar Yadav : ‘आप’चे नेते सौरभ भारद्वाज यांचं सूर्यकुमार यादवला चॅलेंज अन् टोमणेही मारले!

Bathing Tips for Good Health: स्वच्छतेसोबत आरोग्यही जपा – आंघोळ करताना फॉलो करा या महत्त्वाच्या टिप्स!

Jalgaon Crime : जळगावमध्ये 'गँगवार', राज शाळेजवळ तरुणावर कोयता, चॉपरने हल्ला

SCROLL FOR NEXT