Rajinder Singh Dhatt Royal Indian Army Service Corps Physical Training Instructor sakal
संपादकीय

१०१ वर्षांचा ‘सैनिक’: दुसऱ्या महायुद्धात गाजवला होता पराक्रम, इंग्लंडच्या पंतप्रधानांकडून कौतुक

दुसऱ्या महायुद्धात लढलेल्या व सध्या हयात असलेल्या शीख सैनिकांपैकी एक असलेले राजिंदरसिंग गेल्या शतकाचे साक्षीदारही आहेत आणि आपल्या वाट्याला आलेल्या भूमिकेला शतप्रतिशत न्याय देत काम करीत राहणारे कर्मयोगीही आहेत.

गणाधीश प्रभुदेसाई

दुसऱ्या महायुद्धात लढलेल्या व सध्या हयात असलेल्या शीख सैनिकांपैकी एक असलेले राजिंदरसिंग गेल्या शतकाचे साक्षीदारही आहेत आणि आपल्या वाट्याला आलेल्या भूमिकेला शतप्रतिशत न्याय देत काम करीत राहणारे कर्मयोगीही आहेत.

- गणाधीश प्रभुदेसाई

काही माणसं एखादी गोष्ट करायचे मनात ठरवतात आणि ती पूर्ण करण्यासाठी जिद्दीने कार्य करतात. हे करताना कधीच त्यांचे वय आडवे येत नाही. हे सिद्ध केलं आहे राजिंदरसिंग धट्ट यांनी. दुसऱ्या महायुद्धात लढलेल्या व सध्या हयात असलेल्या शीख सैनिकांपैकी एक असलेले राजिंदरसिंग गेल्या शतकाचे साक्षीदारही आहेत आणि आपल्या वाट्याला आलेल्या भूमिकेला शतप्रतिशत न्याय देत काम करीत राहणारे कर्मयोगीही आहेत.

निवृत्तीनंतरही माजी सैनिकांसाठी अखंड कार्य करीत राहिलेला हा खराखुरा ‘लढवय्या’. त्यांना ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी ‘१० डाऊनिंग स्ट्रीट’ येथे नुकत्याच झालेल्या ‘युके-इंडिया वीक रिसेप्शन’मध्ये ‘पॉइंट्स ऑफ लाइट’ सन्मानाने गौरविले.

१०१ वर्षांचे धट्ट यांना त्यांच्या सेवेबद्दल आणि त्यांनी स्थापन केलेल्या ‘अनडिव्हाईडेड इंडियन एक्स-सर्व्हिसमेन्स असोसिएशन’ च्या कार्यासाठी हा सन्मान मिळाला आहे. १९६३ पासून दक्षिण-पश्चिम लंडनमध्ये राहणारे धट्ट यांचा जन्म १९२१ मध्ये फाळणीपूर्वीच्या भारतात झाला होता. त्यांनी ब्रिटिश वसाहतकाळात युद्धाचा अनुभव घेतला आहे.

‘ज्या संघटनेसाठी मी कार्य करत आहे, त्याचे महत्त्व जाणून एवढा मोठा सन्मान केल्याबद्दल धट्ट यांना सुनक यांचे आभार मानले आहेत. आपल्या समुदायासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तीला हा सन्मान दिला जातो.

१९९० मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांनी अशा प्रकारची संकल्पना मांडली व तिथे अशा प्रकारे सात हजारांहून जास्त व्यक्तींना गौरविण्यात आले आहे. नंतर ब्रिटनमध्येही एप्रिल २०१४पासून असाच उपक्रम राबविण्यात येत आहे. तेव्हापासून पंतप्रधानांनी शेकडो प्रेरणादायी स्वयंसेवी व्यक्तींना ‘पॉइंट्स ऑफ लाइट’ने सन्मानित केलेले आहे.

यावेळी हा सन्मान राजिंदरसिंग धट्ट यांना मिळाला आहे. धट्ट यांनी ज्या भावनेतून माजी सैनिकांसाठी कार्य केले आहे, ते पाहता ‘पॉइंट्स ऑफ लाइट’ने त्यांचा झालेला गौरव यथोचित आहे. त्यांचा जोष पाहता त्यांनी स्थापन केलेली संघटना हा खऱ्या अर्थाने त्यांचा श्‍वास असल्याचे स्पष्ट होते.

धट्ट यांनी अतिशय नम्रतेने हा पुरस्कार स्वीकारला. अनेकांच्या अथक परिश्रमांचे हे फळ आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. संघटनेत कार्यरत अनेकांची अतूट बांधिलकी आणि निःस्वार्थ सेवेमुळे माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणे शक्य झाले, असे ते नमूद करतात.

धट्ट दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश-भारतीय सैन्यात सामील झाले आणि १९४३ मध्ये हवालदार मेजर (सार्जंट मेजर) म्हणून त्यांची पदोन्नती झाली. त्यानंतर ईशान्य भारतातील कोहिमा येथे लढण्यासाठी आखलेल्या मोहिमेतही त्यांचा सहभाग होता. युद्धात सहभागी दिग्गजांसाठी त्यांच्या संघटनेने अलीकडेच एक ऑनलाइन व्यासपीठ तयार केले आहे.

त्याद्वारे विविध लेख, कथा प्रसिद्ध केल्या जातात, ज्यांचा माजी सैनिकांच्या कुटुंबांना विविध माहिती मिळण्यास फायदा होतो. या वयातही ते विविध उपक्रम राबविण्यात पुढाकार घेतात. ‘‘हा पुरस्कार ही माझ्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटना असून १०२ वा वाढदिवस जवळ आला असताना समाजासाठी अर्थपूर्ण योगदान देत राहण्याची प्रेरणा मला देणार हे नक्की,’’ असे ते सांगतात. या वयातही नवा संकल्प सोडण्याची त्यांची जिद्द भारावून टाकणारी आहे. लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडविण्यासाठी अथक कार्यरत राहाणे, ही निश्चितच प्रेरणा देणारी बाब आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : जुगाराचे उलटे दान

Chh. Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरात गणेश मंडळाच्या मंडप उभारणीच्या वादातून तुफान हाणामारी; तिघा भावांकडून हल्ला, एकाचा मृत्यू

आजचे राशिभविष्य - 23 ऑगस्ट 2025

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २३ ऑगस्ट २०२५ ते २९ ऑगस्ट २०२५ - मराठी राशी भविष्य

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 23 ऑगस्ट 2025

SCROLL FOR NEXT