संपादकीय

या जगण्यावर.. : कौतुकाची कला आणि किमया

डॉ. अनुराधा पंडितराव

मी  लहान होते, तेव्हा कोणतंही चित्र काढून झालं की ते आईला दाखवायची. तिच्या भरभरून कौतुक करण्याच्या सवयीमुळे अंगावरून मोरपीस फिरत असल्याचा भास व्हायचा. साधं रांगोळीत रंग भरले, तरी म्हणायची, ‘अगं, तुझी रंगसंगतीची जाण माझ्यापेक्षाही जास्त आहे’. तिच्या या प्रोत्साहनपूर्ण शब्दांमुळे माझ्यातला दडलेला चित्रकार जागा झाला. माझ्यातील चित्रकलेच्या उर्मीचं रूपांतर कालांतराने कलादालनातील एका देखण्या चित्रप्रदर्शनात झालं.

मला खूप जण म्हणायचे, ‘छान काढतेस हं तू चित्र’. पण आईची कौतुक करण्याची पद्धत खूप वेगळी होती. तिचं कौतुक थेट हृदयाला स्पर्श करायचं. कौतुक करताना अगदी हळुवारपणे, ‘या पाकळ्या अजून थोड्या गोलाकार असत्या, तर जास्त उठून दिसल्या असत्या’, असा प्रेमळ सल्लाही ती देऊन जायची. तिची ही सवय, कलाकृती नीट पारखून, त्यावर न दुखवता आपलं मत सांगून कौतुक करण्याची पद्धत मला घडवायला कारणीभूत ठरली. कौतुक करायला खरंतर फार काही कष्ट पडतात, असं नाही. त्यासाठी लागतं फक्त विशाल हृदय आणि अहंकाराच्या वलयातून बाहेर येण्याची गरज. आपल्या प्रतिस्पर्ध्यानं चांगली कामगिरी केली, तर त्याचंही कौतुक करण्याएवढं मोठं मन आपल्याकडे असलं पाहिजे. दिवसभर राबून स्वयंपाक केलेल्या गृहिणीला, ‘काय मस्त झालीय भाजी !’, अशी मनापासून दिलेली दाद तिच्या दमलेल्या मनावर चांदणं शिंपडून जाईल. नवनवीन पदार्थ बनविण्यासाठी तिला ऊर्जा मिळेल. मैत्रिणीला तिच्या साडीबद्दल दिलेली ‘कॉम्प्लिमेंट’, तुमच्या सहकाऱ्याचं त्याच्या कामाबद्दल केलेलं कौतुक तुमच्या नात्याची वीण अजून घट्ट बनवू शकते.

मी एकदा एका स्नेह्यांकडे गेले होते. दारावर नावाच्या पाटीखाली लिहिलं होतं,

we are a happy family.

we respect each other.

we do not hesitate to say,

thank you, sorry and

please to each other’.

ही वाक्‍यं मला अंतर्मुख करून गेली. ऑफिसमध्ये बॉसला किती सहजरीत्या आपण ‘थॅंक यू’ म्हणतो. त्याच्या कामाचं कौतुक करतो. पण घरच्यांना मात्र गृहित धरतो. बाहेरून दमून आल्यावर हातात पाण्याचा ग्लास देणाऱ्या व्यक्तीसाठी खरंतर ‘थॅंक्‍यू’ हा शब्द तोंडातून निघायला हवा. एखादं काम आपल्या घरच्यांना सांगताना ‘प्लीज’ हा शब्द उच्चारायला काय हरकत आहे? कधी नवीकोरी साडी नेसून पत्नी समोर उभी राहिली, तर उत्स्फूर्तपणे ‘ब्यूटीफूल !’ अशी दाद देण्यास काहीच हरकत नाही. नोकरी करण्याऱ्या सुनेनं घर सांभाळणाऱ्या सासूला ‘थॅंक्‍यू’ म्हणून पाहा आणि घर, संसार, नोकरी अशी जबाबदारी लीलया पेलणाऱ्या सुनेचं कौतुक करून बघा... जगण्याचं समीकरणच बदलेल. उतारवयाच्या उंबरठ्यावर उभं असताना, ‘अजूनही किती लोभस हसतेस तू !’ किंवा, ‘अजूनही राजबिंडे दिसता हं तुम्ही!’ अशी एकमेकांना दिलेली दाद आयुष्याची संध्याकाळ गोड बनवू शकते. खूप छोट्या आणि सोप्या गोष्टी असतात, पण त्यातून निर्माण होणाऱ्या आनंदलहरी जीवन संगीतमय करण्यासाठी पुरेशा असतात. कौतुक करायला शिकायची गरज आहे का आपल्याला ? कौतुक केल्यानं समोरच्या व्यक्तीला बळ तर मिळतंच, पण त्याला होणाऱ्या आनंदानं आपल्यालाही समाधान मिळतं. सूर्यास्ताच्या वेळी क्षितिजावर रंगांची आतषबाजी करणाऱ्या आकाशाचं कौतुक करून बघा. कोकीळपक्ष्याच्या सुरेल कूंजनाचं कौतुक करा. लालचुटुक गुलमोहराच्या देखणेपणाचं कौतुक करा. तुमचं कौतुक त्यांना ऐकू जाणार नाही, पण कौतुक करताना तुम्हाला झालेला आनंद हृदयावर प्रसन्नतेचा शिडकावा नक्कीच शिंपडेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T Raja Singh Resignation : ‘’आजच्याच दिवशी बरोबर ११ वर्षांपूर्वी मी...’’ ; भाजपने राजीनामा मंजूर करताच टी.राजा भावनिक!

Pune: सूपमध्ये झुरळ सापडले; पण तक्रारीकडे हॉटेल व्यवस्थापनाचे दुर्लक्ष, नंतर महिलेनं...; पुण्यातील खळबळजनक घटना

IND vs ENG 3rd Test: KL Rahul ने झेल सोडला! शुभमन गिल अम्पायरसोबत भांडला; Umpire ने मागे ढकलले अन् म्हणाले, जा...

Hinjewadi Electric Supply : हिंजवडीतील वीजपुरवठा ७२ तासांनी पूर्वपदावर; नागरिकांकडून सुटकेचा निःश्वास

World Record Internet Speed: इंटरनेट स्पीडचा वर्ल्ड रेकॉर्ड! 10,000 पेक्षा जास्त 4K सिनेमे एका क्षणात झाले डाउनलोड, कुठे घडला हा चमत्कार?

SCROLL FOR NEXT