cm eknath shinde agriculture farm visit mahabaleshwar Sakal
satirical-news

ढिंग टांग : मातीमध्ये दर्वळणारे हे गाव माझे..!

‘वाऱ्यावर्ती गंध पसर्ला नात्तेऽऽ मनाचे, मातीमध्ये दर्वळणारे हेग्गाव म्माझे…’ ओठांवर समधुर गाण्याच्या ओळी आपसुक आल्या, आनि स्वत:शीच हसत कृषिभूषण भाईसायेबांनी हातातला टिकाव धिला टाकून, आनि ट्रॅक्टरवर बैठक जमिवली. त्यांनी सभोवार पघितलं.

- ब्रिटिश नंदी

‘वाऱ्यावर्ती गंध पसर्ला नात्तेऽऽ मनाचे, मातीमध्ये दर्वळणारे हेग्गाव म्माझे…’ ओठांवर समधुर गाण्याच्या ओळी आपसुक आल्या, आनि स्वत:शीच हसत कृषिभूषण भाईसायेबांनी हातातला टिकाव धिला टाकून, आनि ट्रॅक्टरवर बैठक जमिवली. त्यांनी सभोवार पघितलं. हिरवंगार शिवार जनू इच्यारत व्हतं, ‘‘आलास लेकरा? ये, जिवाला इस्वाटा न्हाई बघ, तुज्या मुंबय-ठान्यात’…

पौषाचा म्हैना. महाबळेश्चराच्या कुशीत वसल्यालं दरे हे इटुकलं गाव थंडीनं गारठल्यालं. परतेकाला गावाची वढ अस्ती. गावाकडं यिऊनशेनी काळ्या मातीत हात घाटलं की समदं बैजवार हुतंय. मुंबय-ठान्याचा गडबडगुंडा नकुसा वाटाया लागतो. काय ती घड्याळ मागं लागल्याली मान्सं!! ह्या:!! राजकारनाचा धबडगा इसरुन एक-दोन रोज गावाकडं यिऊन ऱ्हायलं की समदं इसराया व्हतं.

‘‘च्या बायलीला, त्या मुंबय-ठान्याच्या..,’’ असं म्हनून बसल्याबसल्या भाईसायेबांनी सभोवार नदर टाकली. भाईसायेबांचा जीव मुंबईत रमत न्हाई. दक्षिन मुंबई येकवेळ ठीक, पन बांदरा साईडला जायाचं म्हनलं तर भाईसायेबांच्या कप्पाळाची शीर निस्ती ठना ठना ठना ठना उडाया लागती. ठान्यात किसननगरात जीव रमतो थोडाफार, न्हाई असं न्हाई, पन त्ये त्येवडंच.

महाबळेश्वराच्या कुशीतल्या या दरे तांब गावात आलं की जिवाला जाम गारीगार वाटतं. राजकारनाच्या उस्तवाऱ्या करुन पट्टदिशी हेलिकाप्टर काडावं, आनि दऱ्यात यिऊन येरवाळीच लँड व्हावं. शेतशिवारात राबावं. हाळद काढावी. पर्जेनकाळी भातलावणी करावी. बागंत चिकू, पेरवं लगडल्याली असतील, तर दुरडीभर काडावीत.

वरल्या अंगाला बांबू लावलाय. बांबूची लागवड केली की मायंदाळ पैका भेटतोय, असं भाईसायेब आल्या गेल्या कास्तकाराला बारोमास सांगत असत्यात. बांबूची बनं पार पुरुषभर वाढल्यानी बघून त्यांचा जीव सैलावला.

हिरीशी जाऊन त्यांनी पोहोरा सोडला. पानी शेंदून घेतलं…बैलं असती, तर येकांदं मोटंवरचं गानं मोकळ्या गळ्यानं बोल्लो असतो गा, असं त्यांनी मनाशीच म्हनलं. पन बायलीला येक गानं टायमावर आटवंना झालं!!

शेजारच्या शिवारात गडीमान्सं राबत हुती. ‘’ओऽऽ, किस्नादाऽऽ…’’ ट्रॅक्टरवर बसल्याजागी भाईसायेबांनी प्रेमानं साद घातली. ओणव्यानं तण उपटनाऱ्या किस्नानं ‘‘आलु आलु’ असं उत्तर द्येत धाव घेटली.

‘‘ राम राम! काय करुन ऱ्हायला तिकडं?,’’ ट्रॅक्टरवरच बसूनशेनी भाईसायेबांनी इच्यारलं.

‘‘आवोकडू लावलाय नव्हं, हे अस्सं फळ..अगं बाबौ!’’ किस्नानं शीझन बॉलचा साइज दाखवत आच्चिर्य व्यक्त क्येलं. आवोकडूची लागवड बक्कळ येश देती. फायू ष्टार लोक आवोकडू लई खात्यात, हे जनरल नालेज मागल्या टायमालाच भाईसायेबांनी दिल्तं. किस्नानं पडत्या फळाची आज्ञा मानून आवोकडू लावलं. त्यो औंदा जीप घेनार ही ग्यारंटी!!

तोंडावर पान्याचं हाबकं मारुन त्यांनी उजव्या हातानं दाढी निपटून घेटली. डाव्या अंगाला आमराईकडून मोहोराचा सुगंध आला. जीव थंडावला. पौषाच्या थंडीत आंबा हिरीरीनं मोहरतोय…त्याचं त्ये लडिवाळ रुप न्याहाळावं.

निस्त्या मोहोराच्या बहारावरुन वळखावं की औंदा किती कलमी आंबा आढीला पडतोय. आमराईतला मोहोर बलवत व्हता. भाईसाहेबांनी प्रेमानं आंब्याच्या डेरेदार झाडाकडे पघिटलं. त्यांना दिल्लीची महाशक्ती आटवली. मन आदरानं जड जाहालं! शांताबाई शेळके यांची येक कविता आटवली.

हे एक झाड आहे : त्याचे माझे नाते,

वाऱ्याची एकच झुळूक दोघांवरुनही जाते…

मला आवडतो यांच्या फुलांचा वास

वासांमधून उमटणारे जाणीवओले श्वास…

…त्यांनी तातडीनं फोटोग्राफर बलवला. एक फोटो काढून घेटला, आनि कवितेच्या वळींबरुबरच सोशल मीडियावर टाकून धिला! ‘ये हो गई ना बात,’ असे स्वत:शीच म्हनत खुश होऊन कृषिभूषण भाईसायेबांनी ट्रॅक्टरचा ष्टार्टर दाबला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meenatai Thackeray statue case Update: मोठी बातमी! मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यास २४ तासांच्या आत अटक; गुन्हाही केला कबूल

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

Nagpur Crime : अपघाताच्या विम्याच्या कागदपत्रासाठी मागितले आठ हजार; उपनिरीक्षक, हेडकॉन्स्टेबल एसीबीचा जाळ्यात

Shital Mahajan : स्पेनमध्ये स्कायडायव्हिंग करून शीतल महाजन यांच्या पंतप्रधानांना शुभेच्छा

INDW vs AUSW: टीम इंडियाच्या नारी शक्तीचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाचा वन डे क्रिकेट इतिहासात असा पराभव कुणी केलाच नव्हता...

SCROLL FOR NEXT