modi
modi  sakal
satirical-news

कर्तव्यपथ…!

सकाळ वृत्तसेवा

(एक चालतेबोलते चिंतन…)

‘‘तू न रुकेगा कभी, तू न झुकेगा कभी, कर शपथ, कर शपथ…कर्तव्यपथ, कर्तव्यपथ, कर्तव्यपथ..आँय!’’ हे

काव्य तुम्ही ऐकले आहे काय? नसेल! (खुलासा : अखेरचा ‘आँय’ मूळ कवितेत नाही, केवळ सोयीसाठी

आम्ही तो स्वत:च्याच तोंडी घातला आहे.) कारण हे नवे काव्य आहे. प्राचीन काळी ‘अग्निपथ’ नामक

चित्रपटात ‘अग्नि यंग मॅन’ मा. बच्चनसाहेब यांनी वरील काव्याशी साधर्म्य असलेल्या काही ओळी पाप्युलर

केल्या होत्या. पण ती ‘अग्निपथ’ नावाची सुंदर कविता नसून फिल्मी डायलॉग असल्याचा गैरसमज

रसिकांचा झाला! ती चूक आम्ही दुरुस्त करीत आहो. ‘अग्निपथ’ काव्याचे पुनर्नामकरण करीत आहो!

नियतीच्या हातात कळसूत्रे असलेला मनुष्यमात्र नामक कचकड्याची बाहुली शेवटी विधिलिखिताप्रमाणेच वाटचाल करते, आणि तीस इच्छा असो वा नसो, अग्निपथावरुन चालावे लागते, असे आम्हाला ‘अग्निपथ’

चित्रपट पाहून वाटू लागले होते. वैराग्य येऊन अखेर आम्ही चालणेच सोडून पलंग धरला, तो आजतागायत.

माणसाने चालताना पायाखाली काय जळते आहे, तेदेखील पाहावे, असा आम्हाला टोमणावजा सल्ला

अनेकांनी आजवर दिला. परंतु आम्ही तो फारसा मनावर घेतला नाही. त्याऐवजी चालणे सोडले!

‘अग्निपथ’ या पूर्वीच्या कवनामध्ये पायाखाली काहीबाही जळते आहे, हे गृहित धरलेले होते. म्हणूनच

कवनाचे शीर्षक ‘अग्निपथ’ ठेवावे लागले. परंतु, ‘राजपथा’चे नामकरण ‘कर्तव्यपथ’ असे करणे हेही एक

प्रकारचे कर्तव्यच होते, हे ओळखून आमचे परम दैवत, मार्गदर्शक आणि तारणहार मा. नमोजी यांनी

कारवाई केली, आणि सांगावयास हर्ष होतो की, आज आपण कर्तव्यपथावरुन चालू लागलो आहो! यापुढे

आपली वाटचाल कर्तव्यपथावर होणार. नव्हे…होणारच!

जसे लोककल्याण मार्गावर राहणाऱ्यांना रात्रंदिन लोकांच्या कल्याणाचाच विचार करण्याची पूर्वअट असते,

त्याचप्रमाणे कर्तव्यपथावर चालण्यापूर्वी जनसामान्यांनी काही पथ्ये पाळणे जरुरी आहे. ती येणेप्रमाणे :

१.कर्तव्यपथ हा काही मॉर्निंग वॉकसाठी तयार केलेला पथ नव्हे, याची नोंद संबंधित वजनदारांनी घ्यावी.

वजन कमी करण्यासाठी चालण्यास जाण्याची एक पद्धत आहे, परंतु, कर्तव्यपथावर चालल्याने वजन कमी

होत नाही, उलट वाढते, हे लक्षात ठेवावे!

२. कर्तव्यपथीं चालण्यापूर्वी पाय स्वच्छ धुवावेत. मगच कर्तव्यजोडे चढवून मगच पथावर पाऊल घालावे.

मोजेही धुतलेले असावेत!!

३. कर्तव्यपथावर कर्तव्यकचोरी, कर्तव्यवडे, कर्तव्यपकोडे आणि कर्तव्य प्रांठे उपलब्ध असतील, असा

भलतासलता गैरसमज बाळगू नये! तेथे कर्तव्य तुलसीरस, कर्तव्य करेलाज्यूस, कर्तव्य कोरफड ज्यूस तेवढे

उपलब्ध राहतील. त्यांचे कर्तव्य म्हणूनच सेवन करावे.

४.कर्तव्यपथावर जाणाऱ्या बससेवेला कर्तव्यसेवा असे म्हटले जाणार आहे. या बसमध्ये बसण्यापूर्वी तिकिट

काढण्याचे कर्तव्य पार पाडावे! विनातिकिट कर्तव्य केल्यास कर्तव्यदक्ष पोलिस त्यांचे कर्तव्य पार पाडतील.

मग दैनंदिन कर्तव्ये पार पाडणेही मुश्किल होईल, याची नोंद घ्यावी.

५.कर्तव्यच्युत लोकांना कर्तव्यपथावर प्रवेश नाही. कर्तव्याचे प्रमाणपत्र दाखवणे अनिवार्य आहे. केंद्र सरकार

लौकरच त्यासाठी कर्तव्य मंत्रालय सुरु करण्याच्या विचारात आहे. कौशल्य मंत्रालय ऑलरेडी सुरु झाले

आहेच.

६. ‘राजपथा’चे नामकरण ‘कर्तव्यपथ’ केल्याने काय साधले? असा सवाल काही नतद्रष्ट (पक्षी : कांग्रेसवाले)

करतात. पण अशा कर्तव्यहीन लोकांकडे लक्ष न देता फळाची आशा न धरता आपले विहित कर्म किंवा

कर्तव्य करीत राहावे.

६. ज्यांना यंदा कर्तव्य नाही, त्यांनी कर्तव्यपथावर पाऊलही टाकू नये!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: पीयूष चावलाच्या फिरकीची जादू चालली, हेडपाठोपाठ क्लासेनलाही केलं क्लिन-बोल्ड; हैदराबादचा निम्मा संघ गारद

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT