eknath 
satirical-news

ढिंग टांग :  कळेल, कळेल!

ब्रिटिश नंदी

राजकारण हा असा एक पत्त्यांचा खेळ आहे की आपल्या छातीजवळील पान बदामचे आहे की इस्पिकचे हेदेखील शेजारच्याला कळू न देता उतारी करावी लागते. किंबहुना आपल्याकडे चौकट गुलाम असेल तर तोच एक्का असल्याचा भाव चेहऱ्यावर राखावा लागतो. स्पर्धकाच्या चेहऱ्यावरील भाव हाच खरा हुकमाचा पत्ता असतो. पण हल्ली मास्कमुळे हा खेळ भलताच अवघड  होऊन बसला आहे. हल्ली चेहऱ्यावरले भाव सोडा, आख्खाच्या आख्खा माणूस ओळखणे कठीण झाले आहे. माणूस ओळखला तरी त्याच्या मनात काय चालले आहे, त्याचा अंदाज लागत नाही. कारण तो शिंचा मास्क!! मास्कच्या आडून एखादे माणूस ‘हो’ म्हणाले की ‘नाही’ हेसुद्धा अनेकदा कळत नाही. अशा परिस्थितीत राजकीय आडाखे कसे बांधावेत आणि आपली उतारी करावी कशी?

रा. नाथाभाऊंना हाच प्रश्न छळत असणार, हे आमच्यातील सजग राजकीय पत्रकाराने ताडले. रा. नाथाभाऊ यांच्याबद्दल आमच्या मनीं पहिल्यापासून कमालीचा जिव्हाळा आहे, हे आधी मान्य करावे लागेल. परवा असेच झाले...

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रा. नाथाभाऊ यांच्या मनात नेमके काय चालले आहे, (पक्षी : छातीशी पत्ते कुठले आहेत?) याची टोटल लागता लागत नव्हती. रा. नाथाभाऊंनी काय ठरवले आहे? जावे की न जावे? उतारी करावी की न करावी? याची उकल होणे, महाराष्ट्रासाठी अतिआवश्‍यक  होते. एरवीचे दिवस असते तर थेट मुक्ताईनगरला जाऊन विचारले असते. सध्या लॉकडाऊनमुळे प्रॉब्लेम झाले आहेत, हे सारे जाणतातच. पण मा. नाथाभाऊ स्वत:च मुंबईत आल्याचे कळले, म्हणून आम्ही त्यांना तेथेच गाठले.

...त्यांच्या तोंडाला मास्क होता, तरीही त्यांना आम्ही वळखले. नाथाभाऊंनी अगदी ‘पीपीई’ किट घातले तरी त्यांना दुरुनही कोणीही ओळखेल!! आम्ही समोर येताक्षणी त्यांनी माश्‍या वारल्यासारखे हात केले. आमचा गैरसमज झाला. आम्ही त्यांना मच्छर मारण्याची रॅकेट नेऊन दिली! त्यांनी ती बाजूला फेकली आणि संतापून ओरडले, ‘बाहेर व्हा! कशाला आले तुम्ही हितं?’ 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘‘शतप्रतिशत प्रणाम!’’ नम्रता हा आमचा विशेष गुण आहे. रा. नाथाभाऊंनी आपल्याला नीट ओळखावे म्हणून आम्ही कानास अडकवलेला मास्कबंद काढून मुखचंद्र दाखविला, आणि पुन्हा बंद कानांस अडकविला.

‘‘तुमचे अडवान्समध्ये अभिनंदन करावयास आलो होतो!’’ आम्ही.

‘काह्याले अभिनंदन करता बा? काय घडून गेलं तं असं?’, त्यांनी आम्हाला अक्षरश: उडवून लावले. छातीजवळ धरलेले अदृश्‍य पत्ते त्यांनी आणखी छपवले.

‘‘तुम्ही कमळाबाईची साथसंगत सोडताय, असं कळलं..!,’’ आम्ही प्रामाणिकपणाने खरे काय ते सांगून टाकले.

‘कळेल, कळेल!’ काही काळ शांतता राखून मग मास्कआडून ते म्हणाले.

‘‘तुम्ही नव्या सरकारात शेतकी मंत्री होणार, असे म्हंटात! खरं का?’’ आम्ही.

‘‘कळेल, कळेल!’’ मास्कआडून (पुन्हा) ते म्हणाले.

‘‘ घटस्थापनेच्या दिवशी तुम्ही सीमोल्लंघन करणार, असं म्हंटात! खरं का?,’’ आम्ही कधीही चिकाटी सोडत नाही. शेवटी पत्रकारिता कशाशी खातात? असो.

‘‘कळेल, कळेल!’’ त्यांनी ताकास तूर लागू दिली नाही. छातीला चिकटवलेला आपला पत्ता उघड करण्यास ते राजी नव्हते, हे उघड होते. 

‘‘ पण मग निर्णय नक्की ना? की आपली नेहमीसारखी हूल?’’,असे आम्ही विचारणार होतो, पण गप्प बसलो. आश्‍चर्य म्हणजे तरीही अचानक ते म्हणाले, ‘‘कळेल... तेही कळेल!’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: ''संतोष देशमुख प्रकरणातल्या आरोपींनी राबवलं ऑपरेशन डी-टू'', उज्वल निकमांनी घेतलं थेट पाकिस्तानचं नाव

Trip Locations : गुगलवर वर्षभरात सर्च झालीत टॉप 5 ठिकाणे, दोन दिवसांची सुट्टी घेऊन प्लॅन करा ट्रीप, खर्चही एकदम कमी

Latest Marathi News Live Update : वर्ध्यात सामान्य रुग्णालयात आग, सुदैवाने कुणालाही इजा नाही

ICC Rankings: वर्ल्ड कप स्टार दीप्ती शर्मा नंबर १! ऑस्ट्रेलियान खेळाडूला धक्का; पण, स्मृती मानधनाने गमावला ताज

नियती इतकी निर्दयी कशी? अपघात आई-वडिलांचं छत्र हरवलं, निरागस लेकरांनी एकमेकांना सावरलं; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT