Dhing Tang Sakal
satirical-news

ढिंग टांग : कहां है डॉन?

डिअरम डिअर होम्मिनिष्टरसाहब कू वांग्या डॉन ऊर्फ मुन्ना लुंगी ऊर्फ सलीम चड्डी ऊर्फ राबर्ट सणकी ऊर्फ लॉइनचा प्यारभरा नमश्कार.

ब्रिटिश नंदी

डिअरम डिअर होम्मिनिष्टरसाहब कू वांग्या डॉन ऊर्फ मुन्ना लुंगी ऊर्फ सलीम चड्डी ऊर्फ राबर्ट सणकी ऊर्फ लॉइनचा प्यारभरा नमश्कार.

डिअरम डिअर होम्मिनिष्टरसाहब कू वांग्या डॉन ऊर्फ मुन्ना लुंगी ऊर्फ सलीम चड्डी ऊर्फ राबर्ट सणकी ऊर्फ लॉइनचा प्यारभरा नमश्कार. आर्जंट लेटर लिहिनेस कारन कां की, बॉम्बेच्या आंडरवर्ल्डमध्ये धमाका झाला असून आमचे अनेक कार्यकर्ते लॉकपमध्ये बंद केले गेले आहेत. एवढे काय झाले? आमचा बॉम्बेतला एक कार्यकर्ता सलीम फ्रूट याचा राइट हँड बंटी ज्यूसवाला याचा फोन आला होता. तो म्हनाला की, डॉनभाई, आपल्या सलीम फ्रूटला एनआयएवाल्यांनी सोलून मिक्सरमधी घालून बाटलीत भरला!’’ मी बोल्लो की, ‘‘कोन एनाये?’’ तर तो बोल्ला की, ‘‘भाई, ये दिल्लीवाले होते है, किधरकू भी जाके धरदबोच लेते है. कुछ करो!’’

साहेब, पोलिटिकल लाइनमध्ये आपली तशी जानपहचान आहे. बऱ्याच लीडरलोकांबरोबर मी फोटो काढून ठेवले आहेत. काही लीडरलोकांशी आपला डायरेक्ट काँटॅक असतो. आंडरवर्ल्डमध्ये माहौल टाइट झाल्यावर मी दोघातिघांना फोन लावले. खोटा कशाला सांगू? आपल्याला पन फोन लावला होता. पन ‘मी वांग्या बोलतो’ असं सांगितल्यावर ‘ये तुझा भरीत करतो’ असे कुनीतरी म्हनाले. मी घाबरुन फोन कट केला. काय च्यामारी टायम आला!! पूर्वीच्या काळी आमचे फोन गेले की बिल्डर लोक किंवा लीडरलोक घाबरुन घामाघूम व्हायचे. आता धमकीचे फोन अंडरवर्ल्डवाल्यांनाच यायाला लागले. याला काही मीनिंग आहे का?

मानसाने जंटलमनसारखा फोन केल्यावर जंटलमनसारखा जबाब देयाला पायजे. पन हल्ली आमचे दिवस फिरले आहेत, असे दिसते. जंटलमनसारखा रिस्पॉन्स सामनेवाल्याकडून न आल्याने आखरीला लेटर लिहन्याचा डिसिजन घेतला. सध्या आपन मलेशियामध्ये आपल्या यॉटवर आहे. माझा लेफ्ट हँड सुरेश ऊर्फ पढालिखा गब्बर लिहून घेत आहे. आक्षरास हसू नये. सुरेश नववी फेल आहे.

साहेब, खुदा की खुदाई एक तरफ आऊर सलीम फ्रूट एक तरफ...त्याच्यासारखा सोशल वर्कर ढुंढूनसुद्धा सापडणार नाही. त्याला का उचलले? बंटी ज्यूसवाला सांगत होता की, बॉम्बेमध्ये परवा सकाळी डी कंपनीच्या २९ अड्ड्यांवर छापे टाकून सर्वांना अंदर केले. खरे आहे का? पोमण्या कुत्ता (छोटा किशन गँगचा राइट हँड) तर सकाळी उठून हातात डबा घेऊन निघाला होता, त्याला एनायेच्या हॉपिसरनी मधल्या मध्ये उचलला, आणि कोर्टात हाजिर केला. पोमण्या डब्यासकट कोर्टात!! अशा परिस्थितीत कोणीही कुठलाही गुन्हा कबूल करेल. खरे की नाही? सलीम फ्रूट वांग्या गँगचा मानूस आहे, डी कंपनीचा नाही. सलीम फ्रूट आपला शार्पशूटर आहे. एका सफरचंदाचे तो दहा फुटावरुन चाकू फेकून चार तुकडे करतो. असला नेमबाज आपन कधी दुनियेत पाहिला नाही. सलीम फ्रूटला बिस्तऱ्यातून ओढून काढत फरपटत नेला. आमचे बिझनेस पार्टनर कराचीचे दाऊदभाई यांना तुम्ही लोक फरपटत नेणार होते, त्याचे काय झाले? फरपटत नेताना हालत बेकार होऊ नये, म्हणून स्वत: दाऊदभाई रोज दोन तास फरपटत चालण्याची प्रॅक्टिस करत होते. पंचवीस वर्षे होत आली, दाऊदभाई अजूनही फरपटत चालतो. आता हॅबिट झाली म्हणतो. जाने दो.

आंडरवर्ल्डमध्ये उचलाउचली करताना आपल्याला एक फोन तरी करत जावा! आम्ही स्वत: इज्जतीत सरंडर होऊ. नाहीतरी या धंद्यात आता काही दम राहिला नाही. लीडरलोकांनी आमचा धंदा चौपट केला. कळावे. आपला. वांग्या डॉन (सध्या मलेशिया)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India T20 World Cup 2026 squad: शुभमन गिलला संघातून का वगळले? अजित आगरकर, सूर्यकुमार यादव एक सूरात म्हणाले, संघहित...

Bangladesh violence : बांगलादेशमध्ये काहीतरी मोठं घडणार? भारताची चिंता वाढली; अमेरिकेनं नागरिकांना दिल्या अलर्ट राहण्याच्या सूचना

India T20 World Cup 2026 Squad Announce : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा; शुभमन गिलचा पत्ता कट, उप कर्णधार बदलला; इशान किशनही परतला

Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला काय करावं अन् काय करू नये, जाणून घ्या सविस्तर माहिती

VIDEO : संतापजनक कृत्य! रस्त्यावर खेळणाऱ्या चिमुकल्याला फुटबॉलसारखी मारली लाथ; व्हिडिओ पाहून येईल चीड, डोळ्याजवळ गंभीर दुखापत

SCROLL FOR NEXT