Dhing Tang
Dhing Tang Sakal
satirical-news

ढिंग टांग : राही, चल चला, चल...!

ब्रिटिश नंदी

बेटा : (नेहमीच्या उत्साहात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण...मम्मा, आयम बॅक!

बेटा : (नेहमीच्या उत्साहात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण...मम्मा, आयम बॅक!

मम्मामॅडम : (आवरत) हं...पाणी तापलंय, आंघोळ करुन घे!

बेटा : कमॉन! मी ऑलरेडी करुन आलोय, पुन्हा करु का?

मम्मामॅडम : (भराभर सूचना देत) बरं बरं! तुझे मॉर्निंग वॉकचे जोडे कुठायत? ते घालून ये!

बेटा : (दुप्पट कंटाळून) हॅ:!! मी वर्क आऊट करतो, मॉर्निंग वॉक कशाला?

मम्मामॅडम : (समजूत घालत) आता काश्मीर ते कन्याकुमारी ‘भारत जोडो’ पदयात्रेला निघायचंय नं...तयारी नको का करायला? पदयात्रेत फिजिकल फिटनेस खूप महत्त्वाचा असतो!!

बेटा : (कपाळाला आठ्या...) ओह, आपल्या पक्षाच्या उदयपूरच्या चिंतन शिबिरातले निर्णय मनावर घेतलेले दिसतायत! मला वाटलं, हे नेहमीसारखंच असणार!!...पण यंदा हे काय पदयात्रेचं नवीन काढलंस?

मम्मामॅडम : (निर्धारानं) नवसंकल्प आहे तो! आपला पक्ष आणि पदयात्रेचा खूप जवळचा संबंध आहे! किंबहुना, पदयात्रा नसती तर आपल्या पक्षाची यात्रा २०१४च्या आधीच आटोपली असती!! आपल्या ‘भारत जोडो’ नवसंकल्प यात्रेत खूप चालावं लागणार आहे! तू जोडे घेऊन ये!!

बेटा : (शांतपणे) काश्मीर ते कन्याकुमारी हे अंतर तीन हजार सहाशे शहात्तर किलोमीटर आहे, मम्मा! आपली पदयात्रा पूर्ण होईपर्यंत मोदीजी केंद्रातून निवृत्त होतील!!

मम्मामॅडम : आय डोण्ट थिंक सो!...आपण काही केल्याशिवाय हे कमळवाले तिथून निखळणार नाहीत! तेव्हा पदयात्रेला इलाजच नाही! चलना तो पडेगाही!! इट इज ए मस्ट!

बेटा : त्या निवडणूक तज्ञ पीकेंची सूचना आहे वाटतं! आपल्या पक्षात डाळ शिजत नाही हे बघून त्यांनीही पदयात्रेचाच मार्ग निवडलाय म्हणे! दुसऱ्याची कॉपी करु नये!!

मम्मामॅडम : (समजूत घालत) पीके ऑर नॉट पीके - वॉक घेतलाच पाहिजे! आपल्या उदयपूरच्या चिंतन शिबिरात मी दोन महत्त्वाचे निर्णय घेतले! एक, पदयात्रा आणि दुसरा, ‘एक परिवार, एक उम्मीदवार!’

बेटा : (संशयानं) हे दोन्ही निर्णय तू वॉक घेताना घेतले असणार!! पदयात्रेत काही लोकांना उघड्या मोटारीतून हारतुरे आणि फुलं फेकत सहभागी होण्याची मुभा असेल तर मी यायला तयार आहे!!

मम्मामॅडम : (विचारात पडत) काही लोकांना ती मुभा द्यावीच लागेल! एवढं कोण चालणार नाहीतर? पण नवसंकल्प यात्रेमध्ये आपल्या पक्षात खूप बदल होणार आहेत! घराणेशाहीचं समूळ उच्चाटन करण्यासाठीच ही पावलं उचलावी लागणार आहेत! उदाहरणार्थ, एकाच कुटुंबातल्या दोघांना किंवा तिघांना यापुढे आपल्या पक्षात तिकिटं मिळणार नाहीत! एकाला कन्फर्म तिकिट मिळालं असेल तर दुसरा आणि तिसरा ‘वेटिंग लिस्ट’ किंवा ‘रिझर्वेशन अगेन्स्ट क्यान्सलेशन’ असेल! कळलं?

बेटा : (खांदे उडवत) सो बी इट! मला काय प्रॉब्लेम असणाराय? वय वर्षे पन्नासच्या आतल्या कार्यकर्त्यांना पन्नास टक्के तिकिटं राखीव असणार आहेत, आपल्या पक्षात!

मम्मामॅडम : (चिंताग्रस्त होत्साती) ती एक गडबड झाली खरी! सलग पाच वर्ष पक्षात सक्रीय असलेल्यांनाच तिकिट द्यायचं ठरलंय!(स्वत:शीच पुटपुटत) - तोही एक प्रॉब्लेम आहेच!! या अटीत निम्मे कार्यकर्ते गारद होणार आहेत!

बेटा : (निरागसपणाने) मीसुद्धा मम्मा?

मम्मामॅडम : (प्रेमभराने) तुझ्यासाठीच तर एवढी पायपीट चालू आहे बेटा! हा नवसंकल्प कार्यकर्त्यांसाठी आहे, तुझ्यासाठी नाही! चल, वॉकला निघायला हवं!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: आम्ही काम करतो, इतरांसारख खोट बोलत नाही, अजित पवारांची सुप्रिया सुळेंवर टीका

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT