maharashtra politics lok sabha election modi shjsh shinde fadnavis  Sakal
satirical-news

ढिंग टांग : महाशक्तीचे महावाटप...!

वक्तशीर दादासाहेब आधीच येऊन पोचलेले. ते वारंवार घड्याळात पाहाताहेत. हुडी घालून बेमालूम वेषांतर केल्यामुळे आत्मविश्वासानं प्रफुल्लित नानासाहेब हसतमुखाने प्रवेश करतात.

- ब्रिटिश नंदी

स्थळ : वाटाघाटींचे, अज्ञात. वेळ : वाटाघाटींचीच, तीही अज्ञात.

वक्तशीर दादासाहेब आधीच येऊन पोचलेले. ते वारंवार घड्याळात पाहाताहेत. हुडी घालून बेमालूम वेषांतर केल्यामुळे आत्मविश्वासानं प्रफुल्लित नानासाहेब हसतमुखाने प्रवेश करतात. पाठोपाठ पेपरमिंटची गोळी चघळत भाईसाहेबदेखील प्रविष्ट होतात. विषय आहे फायनल वाटाघाटींचा. अब आगे.

नानासाहेब : (दाद देत) काहीही म्हणा भाईसाहेब, तहात जिंकलात!!

भाईसाहेब : (विनयाने) महाशक्तीचा हात पाठीवर असताना कुणीही जिंकेल!

दादासाहेब : मी जाऊ का? मला बारामतीला जायचंय!!

नानासाहेब : (कौतुक करत) अठ्ठेचाळीसपैकी पंधरा जागा पदरात पाडून घेतल्यात! चंगळ आहे तुमची!! पण आता निवडून आणा त्या जागा, म्हंजे झालं!!

भाईसाहेब : (विनयानं) मी शब्द पाळणारा माणूस आहे! महाशक्तीनं प्रसन्न होऊन मला ‘वर माग’ असा सल्ला दिला होता! तुम्ही दहा-बाराच देऊ करत होता, पण मी ‘वर’ मागितल्या, इतकंच! निवडून आणण्यासाठी महाशक्ती आहेच!!

दादासाहेब : (चुळबुळत) मला बारामतीला जायचंय! निघू का?

नानासाहेब : (अघळपघळपणाने) जाल हो, काय घाई आहे? इन मीन चार जागा तुमच्या!!

भाईसाहेब : (शंका काढत) ...आणि सारखं सारखं त्या घड्याळात का पाहता? आम्ही वारंवार घेतो का हातात धनुष्यबाण? हे नानासाहेब फिरतात का कमळ हुंगत?

दादासाहेब : (काकुळतीला येऊन) तुम क्या जानो, इस घड्याळ की किंमत? आमच्या इन मीन चार जागा असल्या तरी संपूर्ण महाराष्ट्राला भारी आहेत!!

नानासाहेब : (एकजुटीची आठवण करुन देत) जागावाटप मनासारखं झालं! आम्हाला २८, भाईसाहेबांना १५ आणि दादासाहेबांना चार!! सगळ्या जागा जिंकल्या पाहिजेत हां! तेवढ्यासाठी आपण एकत्र आलो आहोत!

भाईसाहेब : (काडी घालत) मित्रपक्षांनाही एक दिली की!! बाकीचे मित्र पक्षही ओरडतात, पण महाशक्तीचं नाव सांगितलं की गप्प बसतात!! उन्हाळ्याच्या दिवसात खाव्या शेवग्याच्या शेंगा, कारण महाशक्तीनं दाखवला आम्हाला ठेंगा!!...सहज आठवले, म्हणून सांगितले!!

दादासाहेब : (खचलेल्या सुरात) जाऊ द्या ना आता! विकासासाठी एकत्र आलोय ना आपण?

भाईसाहेब : (बिनधास्तपणे) चालू आहे की आपला विकास!! तो कुठं जातोय! महाशक्तीचे हात आणखी मजबूत करण्यासाठी आपण एकत्र आलोय!!

नानासाहेब : (जळकूपणाने) उठता बसता महाशक्तीचा जप करुन काहीही होणार नाही, भाईसाहेब!! जागा आल्या नाहीत तर महाशक्ती कुठं दिसणार नाही, आसपास!!

दादासाहेब : (इशारा देत) म्हणून मी वाटाघाटी फारश्या केल्याच नाहीत! म्हटलं, द्याल ते आमचं, घ्याल ते तुमचं!! उगाच नाकाला जीभा लावायची लाइन नाही आपली!! एक बारामती मारली की आमचं काम भागतंय बघा!! तुमचं तुम्ही बघा आता भाईसाहेब!!

भाईसाहेब : महाशक्ती पाठीशी आहे, तोवर कश्शाचीही चिंता नाही!!

नानासाहेब : (संशयानं) हल्ली फार होतंय हां, तुमचं महाशक्ती महाशक्ती! आम्हीही आमच्या वरिष्ठांचं नाव घेत नाही, त्यापेक्षा जास्त तुम्ही घेता!!

दादासाहेब : (हातचं राखून) आपलं जेवढ्यास तेवढं आहे बुवा!!

भाईसाहेब : ...आणि म्हणूऽऽन... आपण सर्वांनी महाशक्तीचं महावाटप करुन घेतलं पाहिजे, कारण हा महाराष्ट्र आपल्याला अधिक गतिमान करायचा आहे! इतका विकास करायचा आहे की विकासानंच म्हटलं पाहिजे की, छे बुवा आता दमलो!!

नानासाहेब : (कपाळाला आठ्या घालून) तहात जिंकलात हे खरं, पण आता युद्धात काही पराक्रम दाखवा! आमच्या महाशक्तीचा आशीर्वाद सशर्त असतो, हे विसरु नका! जय महाराष्ट्र!!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Voter Fraud: बापरे! एकाच घरात ४ हजार २७१ मतदार; अधिकाऱ्यांनी केले हात वर, म्हणाले...

Latest Maharashtra News Updates : मुंबईकरांचे म्हाडाच्या लॉटरीतील घराचे स्वप्न लांबणीवर!

Gold Investment : 'पितृपक्षात सोने खरेदी करू नये' हा गैरसमज मोडीत; सराफ व्यावसायिकांचे निरीक्षण

US tariff on India update: अमेरिका लवकरच मोठा निर्णय घेणार! भारतावरील अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ हटवणार?

Neeraj Chopra कडून घोर निराशा! जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक राखण्यात अपयशी, टॉप-६ मध्येही स्थान नाही

SCROLL FOR NEXT