Mathematics Sakal
संपादकीय

शिक्षण-सर्जन : गणिताचा उरूस

‘उरूस म्हणजे सगळी मज्जा धम्माल असते ना? पण गणिताचा उरूस कसा काय शक्य आहे? मला गणिताची इतकी भीती वाटते, गणिताबरोबर खरंच धम्माल करता येईल?'

सकाळ वृत्तसेवा

‘उरूस म्हणजे सगळी मज्जा धम्माल असते ना? पण गणिताचा उरूस कसा काय शक्य आहे? मला गणिताची इतकी भीती वाटते, गणिताबरोबर खरंच धम्माल करता येईल?'

- सूरज उर्मिला सुनिल

‘उरूस म्हणजे सगळी मज्जा धम्माल असते ना? पण गणिताचा उरूस कसा काय शक्य आहे? मला गणिताची इतकी भीती वाटते, गणिताबरोबर खरंच धम्माल करता येईल?" होय! राष्ट्रीय गणित दिनानिमित्त सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर या शहरामध्ये `डायडेक्टिक्स लर्निंग असिस्टंस’ आणि ‘वाळवा तालुका इंजिनिअर्स असोसिएशन’ या संस्थांमार्फत आम्ही ‘गणिताचा उरूस’ हा चार दिवसीय प्रदर्शन होते. तिथं वयाची अट नव्हती. त्यामुळे लहानग्यांपासून आजोबांपर्यंत सगळे इथं भेट देऊन गेले.

आमचा हेतूच हा होता की गणिताची किचकट सूत्रे, प्रमेय हे सोडूनही एक सुंदर बाजू आहे हे दाखवणे आणि गणिताचा आनंद घेणे. गणितात पाठांतरापेक्षा डोकं चालवण्याला जास्त महत्त्व असते, त्यामुळे उरुसात येणाऱ्यांचा डोक्याचा चांगला व्यायाम आम्ही करून घेतला.

या गणिताच्या उरुसाला एखादी व्यक्ती आली की तिला सुरवातीला वेगवेगळे रंगीबेरंगी पोस्टर दिसत. त्यांचा विषय होता ‘गणिती विनोद’. हे विनोद पूर्णपणे शालेय गणितावर आधारित होते. त्यानंतर त्यांना दुसरा पोस्टरचा संच दिसे, ज्याचा विषय होता ‘गणितातील गैरसमज आणि सत्य’. ‘गणिताचा आयुष्यात कधीच उपयोग होत नाही’,‘ज्याला बेरीज, गुणाकार वेगात करता येतात तोच गणितात हुशार’ अशा प्रकारचे गैरसमज दूर करायचा प्रयत्न त्या पोस्टरमधून केला. ते बघून झाले की आम्ही सर्व लोकांना एकत्र करायचो आणि काही गणिती खेळ खेळायचो. त्यानंतर व्हायच्या गणिती घोषणा, आणि गणिताचे गाणे!

एक आहे दोन आहे,

म्हणून हे जग आहे!

तीन आहे चार आहे,

भूमितीची मजा आहे!

गणित विषय माझ्या आवडीचा,

रविवार कोडी सोडवायचा!

आत्तापर्यंत जे काही झालं ते सगळं फक्त उरुसाची सुरुवात होती. गणिताच्या गाण्यामधून कोड्यांचं महत्व सांगितल्यावर सर्वांना आम्ही दुसऱ्या भागात न्यायचो, जिथे गणिती कोड्यांचे प्रदर्शन होते. ही कोडी फक्त बघायची नाही, तर स्वतः सोडवायची होती आणि सोडवल्यावर बक्षीसही मिळवायचे होते. या कोड्यांमध्ये टॉवर ऑफ हानोई, टॅनग्राम सारखी जगप्रसिद्ध कोडी होती. बुद्धिबळ, पत्ते, चक्रव्यूह यांवर आधारित कोडी होती. संख्या, आकृत्या वापरायची कोडी, थ्री-डी कोडी यामध्ये होती. १० मिनिटात गणिताच्या तासाला कंटाळणाऱ्या मुलांना ही कोडी सोडवताना वेळ कसा निघून जात होता हेच कळत नव्हतं.

या गणिताच्या उरुसामधून आम्ही काही विशेष निरीक्षणे केली. इथं भेट द्यायला सधन घरातील सीबीएससी माध्यमाचे विद्यार्थी होते आणि शेजारच्याच गरीब वस्तीमधील विद्यार्थीही होते. पण या सर्वांसाठी कोड्यांची काठिण्यपातळी समान होती! सोबत कोणी शिक्षक नसताना एकाग्रतेने गणित सोडवणाऱ्या मुलांचं दुर्मिळ दृश्य आम्हाला बघायला मिळालं. पहिल्या दिवशी कोडे न सुटलेला एक मुलगा रात्रभर त्या कोड्यावर प्रयत्न करून दुसऱ्या दिवशी आम्हाला उत्तर दाखवायला आला, तेव्हा खूप आनंद झाला. असे हे गणितमय वातावरण आम्ही तरुणांनी गावातील ज्येष्ठांच्या पाठिंब्याने उभारले. गणिताला ‘सुंदर’, ‘आकर्षक’, ‘मनमोहक’ अशी विशेषणे इथे वापरली गेली. ''असले काही उपक्रम आमच्या शाळेत असते तर आम्हालाही गणित आवडलं असतं'' अशी पावती काही पालकांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Price: सोन्याच्या दरात उसळी! तब्बल 'इतक्या' रुपयांची वाढ, भविष्यात दर कसे असतील?

Ranji Trophy 4th Round: मुंबईचे गोलंदाज चमकले, डावानेच जिंकला सामना; विदर्भही विजयाच्या उंबरठ्यावर, मात्र महाराष्ट्र संघ...

Crime: संतापजनक! आधी वाद घातला, नंतर कुऱ्हाडीनं वार अन्... कलियुगी मुलाने वृद्ध पालकांना निर्घृणपणे संपवलं

करण जोहरची घराणेशाही संपुष्टात? नव्या सिनेमातून लाँच करणार दोन नवे चेहरे

Latest Marathi Breaking News: अजित पावरांच्या राजीनामासाठी उपोषण करणार - लक्ष्मण हाके

SCROLL FOR NEXT