sita swayamvar book sakal
संपादकीय

‘सीतास्वयंवर’ पुस्तकरूपात

इसवी सन १८४३ मध्ये ‘सीता स्वयंवर’ या नाटकाचा पहिला प्रयोग सांगलीमध्ये झाला आणि मराठी नागर रंगभूमीची सुरूवात झाली असे मानण्यात येते.

उदय कुलकर्णी

इसवी सन १८४३ मध्ये ‘सीता स्वयंवर’ या नाटकाचा पहिला प्रयोग सांगलीमध्ये झाला आणि मराठी नागर रंगभूमीची सुरूवात झाली असे मानण्यात येते.

इसवी सन १८४३ मध्ये ‘सीता स्वयंवर’ या नाटकाचा पहिला प्रयोग सांगलीमध्ये झाला आणि मराठी नागर रंगभूमीची सुरूवात झाली असे मानण्यात येते. या घटनेचे स्मरण म्हणून दरवर्षी ५ नोव्हेंबर रोजी ‘मराठी रंगभूमी दिन’ साजरा करण्यात येतो. विष्णूदास भावे यांनी सांगलीचे तत्कालीन संस्थानिक चिंतामणराव पटवर्धन यांच्या सांगण्यावरून ‘सीता स्वयंवर’ हे नाटक सादर केले होते; पण या नाटकाचे स्वरूप लिखित नसल्याने आज या नाटकासाठी लिहिलेली पदेच फक्त उपलब्ध आहेत. या पार्श्वभूमीवर त्या काळात विष्णूदास भावेंनी नाटकाचे लेखन व सादरीकरण कसे केले असेल याचा अंदाज बांधून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘ललित कला केंद्रा’ने १९९९ साली पुनर्रचित ‘सीता स्वयंवर’चा प्रयोग सादर केला. आता यावर्षीच्या रंगभूमी दिनी म्हणजे शनिवार दिनांक ५ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रवीण भोळे पुनर्रचित ‘सीता स्वयंवर’ मराठी नाट्यरसिकांसाठी पुस्तकरूपात प्रसिद्ध करण्यात येत आहे. हा कार्यक्रम ‘ललित कला केंद्रा’च्या ‘अंगणमंच’ येथे होत आहे. संयोजक आहेत कोल्हापुरातील ‘रावा प्रकाशन’.

‘सीता स्वयंवर’ची पुनर्रचना आणि त्याचे पुस्तकरूपातील प्रकाशन या अनुषंगाने श्री. भोळे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, ‘१८४३ मध्ये सादर झालेल्या नाटकाच्या काही समूह छायाचित्रांव्यतिरिक्त नाट्यप्रयोगाचे कोणतेही दृकश्राव्य दस्तावेजीकरण उपलब्ध नाही. अशा स्थितीत मराठी नागर रंगभूमीची सुरूवात ज्या नाटकापासून झाली त्या नाटकाचे सादरीकरण कसे झाले असेल व संहिता कशी असेल याविषयी अभ्यासपूर्वक काही गोष्टी करण्याची गरज भासली. विष्णूदास भाव्यांनी कानडी भागवत मेळ्याचे मराठीकरण करून ‘सीता स्वयंवर’ सादर करताना त्यात दशावतारातील घटक वापरले, संगीतात कीर्तन परंपरेतील चाली वापरल्या, पदरचना करताना लोकजीवनातील छंद, ओव्या यांचा उपयोग करून घेतला. तसेच प्रत्यक्ष प्रयोग सादर करताना सण-उत्सवातील सोंगे वापरली. वेगवेगळ्या घटकांचे मिश्रण करून अभिनव नाट्यप्रकार जन्माला घातला असावा, असे अभ्यासात लक्षात आले. याच पार्श्वभूमीवर ‘ललित कला केंद्रा’ने या नाटकाचा प्रयोग करायचे असे ठरवले, तेव्हा त्या नाटकाची रंगावृत्ती तयार करण्याचे आव्हान मी स्वीकारले आणि त्यातून पुनर्रचित ‘सीता स्वयंवर’ आकाराला आले.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story : जळगाव रेल्वे स्टेशनवर सापडलेली माला झाली 'महसूल सहायक', नोकरीच्या पहिल्याच दिवशी मिळणार अनोखी भेट

Nagpur News: महिला पोलिसांच्या चिमुकल्यांना मिळणार ‘चिमणीघर’ची माया; पोलिस आयुक्तांकडून उद्‍घाटन, बंद पडलेले ‘पाळणाघर’ पुन्हा सुरू

धक्कादायक घटना! 'सुरक्षारक्षकाचा पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार'; बेलतरोडीतील सिंगापूर कॉलनीतील घटना, नागपूर जिल्ह्यात खळबळ

Cough Syrup: चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर सरकारला अॅक्शन मोडमध्ये, औषधांच्या गुणवत्तेबद्दल आणि वापरावर मोठा निर्णय घेतला

Latest Marathi News Live Update: कारंजा लाड येथे २३.६० ग्रॅम अमली पदार्थ जप्त,दोघे पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT