Horoscope and Astrology Sakal
सप्तरंग

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 2 जुलै 2021

पंचांग - शुक्रवार : ज्येष्ठ कृष्ण ८, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन, चंद्रोदय रात्री १.०९, चंद्रास्त दुपारी १२.५८, सूर्योदय ६.०३, सूर्यास्त ७.१४, भारतीय सौर आषाढ ११ शके १९४३.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

शुक्रवार : ज्येष्ठ कृष्ण ८, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन, चंद्रोदय रात्री १.०९, चंद्रास्त दुपारी १२.५८, सूर्योदय ६.०३, सूर्यास्त ७.१४, भारतीय सौर आषाढ ११ शके १९४३.

दिनविशेष -

१९५० : स्वातंत्र्यपूर्व काळातील समाजवादी चळवळीतील लोकप्रिय युवक नेते आणि मुंबईचे माजी महापौर युसुफ मेहेरअली यांचे निधन.

१९९६ : जबरदस्त आवाजाने संवादफेक करून, प्रेक्षकांना खूष करणारे ज्येष्ठ अभिनेते ‘जानी’ राजकुमार यांचे निधन. ‘दिल अपना और प्रीत पराई’, ‘पाकिजा’, ‘लाल पत्थर’, ‘हीर रांझा’, ‘नीलकमल’, ‘दिल एक मंदिर’, ‘सौदागर’ , ‘मदर इंडिया’, इ. अनेक चित्रपट खूप लोकप्रिय आहेत.

२००० : ‘युरो-२०००’ या युरोपीय फुटबॉल स्पर्धेत विश्वकरंडक विजेत्या फ्रान्सने ‘गोल्डन गोल’द्वारे इटलीचा २-१ असा पराभव करुन विजेतेपद मिळविले.

२००३ : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाला देशपातळीवरील मानाचा ‘सरदार पटेल सर्वोत्कृष्ट कृषी विद्यापीठ पुरस्कार’ जाहीर.

२००१ : बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गाव येथे जगातील सर्वांत मोठा बौद्ध स्तूप सापडला, त्याची उंची १०४ फूट आहे.

दिनमान -

मेष : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

वृषभ : अपेक्षित गाठीभेटी होतील. संततिसौख्य लाभेल.जिद्द व चिकाटी वाढेल.

मिथुन : मनोबल उत्तम राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

सिंह : वादविवाद टाळावेत. वाहने सावकाश चालवावीत. आरोग्य उत्तम राहील.

कन्या : मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील. आरोग्य उत्तम राहील.

तुळ : आध्यात्मकाकडे कल राहील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

वृश्‍चिक : प्रियजनांचा सहवास लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

धनु : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. व्यवसायात चांगली स्थिती राहील.

मकर : नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. मनोबल उत्तम राहील.

कुंभ : कौटुंबिक सौख्य लाभेल. एखादी गुप्त वार्ता समजेल.

मीन : एखादी मनोबल वाढविणारी घटना घडेल. वैवाहिक सौख्य लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj-Uddhav Thackeray : एकत्र आले पण एकत्र राहणार का? राज ठाकरेंच्या आदेशामुळे युतीबाबत संभ्रम

Stock Market Opening: शेअर बाजाराची सपाट सुरुवात; सेन्सेक्स 34 अंकांनी घसरला, बाजारात दबाव का दिसून येत आहे?

Tulsi Water Benefits: सकाळी तुळशीचे पाणी प्यायल्याने पावसाळ्यात 'या' 4 आजारांवर होईल मात

मराठमोळ्या गाण्यावर सोनालीचे इंग्लंडमध्ये ठुमके, कवितेवर केला हटके डान्स, व्हिडिओ व्हायरल

दादरची 'ती' ओळख होणार इतिहासजमा! अनेक दशकांपासून अस्तित्वात असलेल्या कबुतरखान्याचा शेवटचा Video व्हायरल, लोक हळहळले

SCROLL FOR NEXT