Skin-Care
Skin-Care 
सप्तरंग

ऋतुमानाप्रमाणे घ्या त्वचेची काळजी

सकाळ वृत्तसेवा

आरोग्यमंत्र  - डॉ. धनश्री भिडे, त्वचारोगतज्ज्ञ
प्रत्येक व्यक्तीच्या त्वचेतील तैलग्रंथीच्या संख्येनुसार त्वचेचा प्रकार ठरतो. काही व्यक्तींची त्वचा तेलकट तर काहींची कोरडी असते. परंतु, ऋतुमानानुसार तैलग्रंथीचे काम कमी-जास्त होत असल्याने वर्षभरात यात फरक होऊ शकतो. एरवी तेलकट वाटणारी त्वचा हिवाळ्यात एकदम कोरडी होऊ शकते. त्यामुळे आपण नेहमी वापरणाऱ्या गोष्टी उदा. साबण, पावडर, मॉइश्‍चराइजर याचा उपयोग हवामानातील बदलानुसार केला पाहिजे. 

थंडीच्या दिवसात आपल्याला घाम कमी येतो व त्वचेचा तेलकटपणा कमी होतो. अशा वेळेस साबणाचा वापर कमी ठेवावा. घामाच्या जागी व शरीराच्या बंद भागांवर रोज साबण वापरावा. परंतु, हातापायाला एक दिवसाआड वापरला तरी चालेल. साबणाला पर्याय म्हणून उटणे, डाळीचे पीठ अथवा शिकेकाईचा वापर कोरड्या त्वचेवर केल्यास जास्त रूक्षपणा येतो. या गोष्टी स्क्रबसारखे काम करतात ,तसेच त्यातील खरखरीतपणामुळे त्वचेचे संरक्षक आवरण निघून जाते व अशा त्वचेला लवकर जंतुसंसर्ग होऊ शकतो. तसेच, उन्हात गेल्याने वरील संरक्षक कवच नसल्याने पटकन त्रास होतो. काही जणांना साबणाऐवजी बॉडीवॉश वापरण्याची सवय असते, तसेच काही जण मऊसर घासणीचा वापर करतात. बॉडीवॉश हा साबणाचाच प्रकार आहे, हे लक्षात घ्यावे. घासणीने त्वचा घासण्याची गरज नसते. दर तीन आठवड्यांनी आपल्या त्वचेचे आवरण निघून नवीन त्वचा येत असते. फक्त हा बदल आपल्या डोळ्याला दिसत नाही व लक्षात येत नाही. त्यामुळे डेड स्कीन काढणे टाळावे. 

थंडीमुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी आंघोळीनंतर अंग टिपून घेऊन तेल अथवा मॉईश्‍चराइजर वापरावे. आंघोळीच्या वेळेस त्वचेत शोषले गेलेले पाणी यामुळे दीर्घकाळ टिकून राहते व त्वचा मऊ होते. आंघोळीआधी तेल लावण्याची प्रथा आहे; पण यामुळे फरशी निसरडी होऊन घसरण्याचा धोका निर्माण होतो व आंघोळीच्या वेळेस हे तेल निघून जाते. काही वेळाने त्वचा पुन्हा कोरडी होते. म्हणून या गोष्टी आंघोळीनंतर लगेच वापराव्यात. योग्य साबण निवडावा. औषधी साबणाने त्वचा जास्त कोरडी होते. त्यामुळे होणारी स्वच्छता इतर साबणांप्रमाणेच होते. म्हणून ग्लिसरीनयुक्त साबण निवडावा. ही प्रसाधने निवडताना जास्त वास अथवा रंग असलेल्या गोष्टी टाळाव्यात. पावडरमुळे घाम शोषला जातो. आपली त्वचा घामट नसल्यास पावडर वापरण्याची गरज नाही. थंडीत आपण गरम कपडे वापरतो. लोकरीचे कपडे टोचतात. ज्यांना आधीचे त्वचा विकार असतात, अशा रुग्णांना खाज येऊन हे विकार वाढतात. त्यामुळे आतून सुती कपडे वापरावेत. लोकरीऐवजी जाड कॉटन अथवा फ्लॅनेलचे कपडे जास्त सुसह्य होतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: कोलकाताला तिसरा धक्का! धोकादायक आंद्रे रसेल स्वस्तात बाद

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

SCROLL FOR NEXT