Shrestha-Bepari 
सप्तरंग

#MokaleVha नकारात्मक संवादापासून दूर रहा

श्रेष्ठा बेपारी

माझ्या मनात खूप नकारात्मक विचार येतात,  त्यावर मला नियंत्रणही ठेवता येत नाही. यातून मार्ग कसा काढू?
आपल्यापैकी काहीजण नकारात्मक विचारांचे असतात. काहीजण आयुष्यातील बऱ्याच गोष्टी नकारात्मक पद्धतीने घेतात. यामुळे अतार्किक भीती, विस्कळीत झोप, राग येणे, आत्मविश्वास गमावणे आणि दुखी होणे असे परिणाम होतात. हे असे होते कारण बऱ्याचवेळा आपल्याला स्वतःमध्ये किंवा इतरांमध्ये दोष काढण्याची सवय असते. जी गोष्ट आपण बदलू शकत नाही, त्याबद्दल सतत तक्रार करत राहण्याने नकारात्मकता येते. त्यामुळे त्याचा मनावर आणि परिणामी शरीरावर परिणाम होऊ शकतो. माझे जीवन व्यर्थ आहे, असाही विचार अनेकांच्या मनात येतो. याची नात्यात मिळालेला धोका, नोकरी सुटणे, प्रमोशन न मिळणे अशी अनेक कारणे असू शकतात.

काहीजण ‘माझ्यासोबतच नेहमी असे घडते’ किंवा ‘मलाच कधीच संधी मिळत नाही’ अशाप्रकारे विचार करून नकारात्मकतेकडे वळतात. या सर्व नकारात्मक संवादापासून तुम्ही स्वतःला लांब ठेवलेत तर नक्कीच तुम्ही यातून मार्ग काढू शकता. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पॅनिक अटॅकसाठी घ्या मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला
पॅनिक अटॅक म्हणजे काय, तो आलेला कसा कळणार? 
पॅनिक अटॅक हा कधीही, कोठेही येऊ शकतो. यामध्ये ह्रदयाची धडधड होणे, श्‍वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे असतात. हा तुम्हाला गर्दीने भरलेल्या बसमध्ये, ट्रेनमध्ये, ऑफिसमध्ये किंवा घरामध्येही येऊ शकतो. तुम्ही लगेच मरणार आहात, असे यावेळी वाटू लागते. पॅनिक अटॅक आल्यास अनेकजण ह्रदयरोगतज्ज्ञांचा सल्ला घेतात. हा अटॅक येण्याचे प्रमाण २० ते २५ वर्षांच्या तरुणांमध्ये जास्त आहे. परीक्षेच्या हॉलमध्ये अनेक तरुणांना पॅनिक अटॅक येतो. पॅनिक अटॅकचे मेडिकल रिपोर्ट नॉर्मल आल्यानंतर तरुण अजूनच गोंधळात पडतात. कारण, त्यांना तेव्हा मृत्यूसारख्या वेदना होत असतात आणि मेडिकली मात्र ते ठीक असतात. पण अशा वेळी त्या तरुणांनी तातडीने मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा. तुमच्यावर आलेल्या ताणतणावांचे नियोजन करणे गरजेचे असते. त्यासाठी मानसोपचारतज्ज्ञ उत्तम प्रकारे तुम्हाला यातून बाहेर काढण्यासाठी मदत करतात. ते तुमच्या तणावाचे कारण शोधून काढतात आणि त्यावर उपचार करतात.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

"आमचं लग्न लोकांना मान्य नव्हतं" श्रुती मराठे- गौरव घाटणेकरचा धक्कादायक खुलासा; "तिची साथ नसती तर.."

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nargis Fakhri : 'तो मृतदेहावरचं मांस खायचा आणि मलाही..' अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'खणलेले मृतदेह काढून तो...'

SCROLL FOR NEXT