Relation
Relation 
सप्तरंग

नाते, माणुसकीचे...!

विनया जोशी

‘मेधाताई, जावयाची लिव्हर बदलायची वेळ आली आहे हो. गेले तीन महिने हॉस्पिटल, तपासण्यांच्या धावपळीने आम्ही अगदी दमून गेलो आहोत. ऑपरेशन लगेचच करायला हवे आहे. लिव्हर दान मिळेना. मग मुलगीच लिव्हर देणार आहे. ऑपरेशनचा खर्च पंचवीस लाख आहे. मी हा असा पेन्शनर कुठून आणू पैसा? शेवटी मुलीने तिचे रहाते घर विकायला काढले आहे. घर विकून हॉस्पिटलचा खर्च भागेल कसाबसा. पुढे संपूर्ण आयुष्य दोन मुलांना घेऊन कुठे राहील ती? जावई यापुढे काम करू शकणार नाहीत. त्यांना खूप जपायला हवे. त्यांचे पथ्यपाणी...? अनेक प्रश्‍न आ वासून उभे आहेत माझ्यापुढे’’, जोगकाका कळकळीने त्यांची व्यथा मांडत होते. 

‘काका जरा शांत व्हा पाहू. तुमच्यापुढचे संकट खरेच मोठे आहे. पैशाचे सोंग आणणे कठीण असते. मला दोन-तीन पर्याय सुचतात. एक म्हणजे मुख्यमंत्री निधीतून काही रक्कम मिळते का, यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. आणखीही काही संस्थांकडून मदत मिळते का ते पाहूया. तिसरा उपाय मला सुचतो तो नातेवाईक. त्यांना तुम्ही मदतीचे आवाहन करू शकता.’’

‘पहिले दोन उपाय ठीक आहेत, पण नातेवाईक? ते देतील मदत? प्रत्येकाला आपापले संसार आहेत! त्यांचे-त्यांचे प्रश्‍न आहेत. आपल्याला कोण करणार मदत? आणि अशी मदत मागणे माझ्या मनालाही पटत नाही.’’ 

‘हे पहा काका. सुखासुखी उगी कोणी कुणाला मदत मागत नाही. आज खरेच तशी वेळ आली म्हणून मागतोय आपण मदत. आपण आवाहन करून पाहू. मिळाली मदत तर ठीकच आहे, नाहीतर आपण वाईट वाटून घ्यायचे नाही. इतर पर्यायांच्या शोधात आहोतच की आपण.’’ 

खूप समजावून सांगितल्यावर अखेर काका तयार झाले. मुलीच्या मदतीने अगदी जवळच्या नात्यातल्या १२-१३ कुटुंबांचा व्हॉटसॲपवर एक गट बनवला. सर्वांना परिस्थितीची कल्पना देत मदतीचे आवाहन केले. एक-दोन दिवसांतच लोकांचे मेसेजेस यायला लागले. कुणाचे पाच हजार, कुणाचे दहा, कुणाचे २० हजार असे एकूण दीड लाख रुपये आठ दिवसांत काकांच्या खात्यावर जमा झाले. निदान ताबडतोब लागणाऱ्या खर्चाची काळजी मिटली. आठ दिवसांनी काका भेटले.

त्यांना अगदी गहिवरून आले होते. म्हणाले, ‘‘मेधाताई, एका हाकेसरशी ही माणसे मदतीला धावून येतील असे वाटले नव्हते हो. ही माझी सर्व माणसे खरोखर माणसासारखी माणुसकीने वागली. कदाचित भूतकाळात त्यांच्याशी वागताना माझ्याकडून कमी-जास्त वागले गेले असेल, त्याचा राग कोणी मनात धरला नाही. जावयाची जीवनशैली, खरेच येतो का इतका खर्च...? वगैरे नसते प्रश्‍न उपस्थित न करता निर्मळ मनाने सर्वांनी पैसे पाठवले. मी या लोकांचा आजन्म ऋणी राहील.’’ 

‘काका, तुमची प्रमाणिक हाक सर्वांच्या मनाला भिडली म्हणून तुम्हाला लगेच मदत मिळाली. चला आता पुढच्या कामाला लागू या...!’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT