Sharad Pawar Sakal
सप्तरंग

पवारांची ‘सोशल पॉवर’ आणि मुत्सद्देगिरी...

खरं म्हणजे नियोजनपूर्वक प्रचार आणि जाहिराती यात भाजपचा हात कोणीही धरू शकत नाही. तरीसुद्धा एकट्या पवारांनी या निवडणुकीतले अनेक टप्पे आपल्याभोवती फिरत ठेवले.

प्रतिनिधी saptrang@esakal.com

राज्य विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत प्रचाराच्या नवनवीन पद्धती सर्वच राजकीय पक्षांनी वापरल्या. जनमताचा कौल आपल्या बाजूने वळवण्यासाठी संवाद यात्रांपासून समाजमाध्यमांपर्यंत अनेक पद्धतींचा यात समावेश करता येईल. या सर्व पद्धतींमध्ये समाजमाध्यमं प्रभावीपणानं समोर आली. राजकीय यंत्रणांनी आपलं डिजिटल स्थान मजबूत करण्यासोबतच या माध्यमांच्या वापराला सरावलेला सर्वसामान्य नागरिक उघडपणे, मोकळेपणानं व्यक्त होत होता, हे त्यामागचं महत्त्वाचं कारण. नेमकं हेच ‘पावसातला सह्याद्री - शरद पवार’ या पुस्तकातून सुरेखरित्या टिपण्यात आलंय.

खरं म्हणजे नियोजनपूर्वक प्रचार आणि जाहिराती यात भाजपचा हात कोणीही धरू शकत नाही. तरीसुद्धा एकट्या पवारांनी या निवडणुकीतले अनेक टप्पे आपल्याभोवती फिरत ठेवले. यामागे जितकं श्रेय त्यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीचं आहे तितकंच श्रेय सर्वसामान्यांनी त्यांच्याबद्दल व्यक्त केलेल्या भावनांचं आहे. त्या भावभावना पुन्हा एकदा एकत्र वाचतांना निवडणुकीचा आणि त्यावेळचा जनमताचा पटच हे पुस्तक वाचताना डोळ्यासमोर उभा राहतो.

माध्यम अभ्यासक म्हणून बघतांना लक्षात येतं की व्हायरल झालेल्या पोस्ट, विशिष्ट घटना आणि त्याच्याभोवतीचे ''Key Words'' समाजमनात रुळवणारे लेख, #FactCheck अशा वेगवेगळ्या प्रकारातल्या लेख/पोस्टचा यात समावेश आहे. पुस्तक अर्थातच शरद पवार यांच्याभोवती असल्याने त्यांच्याबद्दलच्या लिखाणाचा, चित्र/कॉमिकचा यात समावेश आहे. ही निवड करतांना समाजमाध्यमांवरच्या लोकप्रियतेचे निकषही लक्षात घेण्यात आलेले आहेत.

विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत # शरदपवार नवं माध्यमांवर सर्वाधिक # ट्रेंड मध्ये होते. तसेच या निवडणुकीत तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात साहेबांशी जोडला गेल्याचेही दिसून आले. या सर्व घडामोडींवर कळत नकळत समाजमाध्यमांवरील प्रतिक्रियांचा परिणाम होता, हे समजून घेण्यासाठी पुस्तकातील लेखांचे संकलन वाचायलाच हवे. पुस्तकात आलेले लेख हे तुम्ही कदाचित यापूर्वी सोशल मीडियावर, व्हाट्सअपवर वाचले असतील पण पुस्तकातून एकत्रपणे जेव्हा हे संकलन समोर येत तेव्हा निवडणुकी दरम्यान पडलेल्या अनेक प्रश्नांचा उलगडा होतो.

पुस्तकात अनेक जेष्ठ पत्रकारांचेही लेख आहेत. त्यामुळे कालसुसंगत तुलना, पवार साहेबांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीतले वेगवेगळे अनुभव आणि त्यांच्या राजकारणाची वैशिष्ट्ये अधोरेखित करणारेही लेख यात आहेत. पवार आणि त्यांच्या भोवतीची कथित ''खंजीर''पासून ते आतापर्यंतची कुजबुज सर्वज्ञात आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने पहिल्यांदाच या सर्वांवर प्रकाश टाकणारे लेख छापील स्वरूपात येत आहेत. पुस्तकातले #FactCheck प्रकारातले हे लेख या पुस्तकाचं वेगळेपण ठरतं.

खासदार श्रीनिवास पाटील यांची प्रस्तावना आहे. त्यांची आणि शरद पवार यांची ‘दोस्ती’ या निवडणुकी दरम्यान बरीच व्हायरल झालेली. त्याबद्दल सुमित्र माडगूळकर यांनी सविस्तर लेख लिहिलाय. खासदार सुप्रिया सुळे यांचा ‘बाबा’ हा लेख, शरद पवारांचे सहकारी सतीश राऊत यांचेही अनुभव आहेत.

सोशल मिडियात लिहिलेलं ठरावीक काळानंतर विस्मरणात जातं किंवा अल्गोरिदमच्या गणितांवर अवलंबून राहतं.

त्यामुळं याचं डॉक्युमेंटेशन होणं हा एक वेगळा प्रयोग या पुस्तकाच्या रुपाने हाताळण्यात आला आहे. समाज माध्यमांवरील सामाजिक-राजकीय विचारांचं हे असं महत्वाचं संकलन आहे. समाजमाध्यमं आणि त्यांचा काळजीपूर्वक वापर, हा विषय पुन्हा एकदा यानिमित्ताने अधोरेखित होतोय. त्याशिवाय २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतल्या ‘विचारांची टाइमलाईन’ सांगणारा हा दस्तावेज संग्राह्य आहेच, हे वेगळं सांगणं नको.

पुस्तकाचं नाव : पावसातला सह्याद्री - शरद पवार

संपादक : चन्नवीर भद्रेश्वरमठ

प्रकाशक : सतीश पवार (संपर्क -७२१८७७७७२१)

पृष्ठं : १९२ मूल्य : ४०० रुपये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT