Light esakal
सप्तरंग

सकाळ-सायंकाळ दिवा लावण्याचे फायदे अन् नियम

पं.नरेंद्र धारणे (धर्म अभ्यासक)

प्रकाशाची उपासना म्हणजे देवाची उपासना

चातुर्मासात, अधिक महिन्यातील पौर्णिमेला मंदिर किंवा पवित्र नदीच्या काठी दीपदान करण्याचे महत्त्व आहे आणि दीपदान करणारा विष्णुलोकाला प्राप्त होतो अशी आख्यायिका आहे.

कोणतेही शुभ कार्य असो, मग ते सांस्कृतिक उत्सव असो, किंवा सण असो, सर्व शुभकार्याची सुरवात दीपप्रज्वलनाने केली जाते.
धार्मिक शास्त्रानुसार अग्नी हे पृथ्वीवर सूर्याचे बदललेले रूप आहे. अशी आख्यायिका आहे, की अग्निदेवांना साक्ष मानून केलेले प्रत्येक कार्य यशस्वी होते. प्रकाश हे ज्ञानाचे प्रतीक आहे. प्रकाश आणि ज्ञानाच्या स्वरूपात ‘देव’ सर्वत्र व्यापतो. ज्ञानप्राप्तीमुळे अज्ञानरूपी मानसिक विकार दूर होतात. जीवनातील सर्व कष्ट दूर होतात. म्हणून प्रकाशाच्या उपासनेला देवाची उपासना मानले गेले आहे.

पौर्णिमेला दीपदान

अग्निपुराणानुसार जो मनुष्य मंदिरात किंवा ब्राह्मणाच्या घरात किमान एक वर्षापर्यंत दीपदान करतो त्याला सर्व काही मिळते. याच प्रकारे चातुर्मासात किंवा अधिक महिन्यातील पौर्णिमेला मंदिरात किंवा नदीकाठी दीपदान करणारा विष्णुलोकाला प्राप्त होतो. असे मानले जाते, की जोपर्यंत दिवा जळत असतो तोपर्यंत परमेश्वर स्वतः तिथे असतात. म्हणून तिथे मागितलेली सर्व इच्छा पूर्ण होते.
दिवा आपल्याला जीवनातील उंचावर जाण्यासाठी आणि काळोख मिटविण्यासाठी प्रेरित करतो. याव्यतिरिक्त दीपप्रज्वलन केल्याने सर्व पाप नाहीसे होऊन जीवनात सौख्य, भरभराट, आयुष्य, आरोग्य आणि सुख-आनंद वाढतच जातं.
गायीच्या तुपाचा दिवा लावल्याने सभोवतालीच वातावरण शुद्ध आणि जंतमुक्त होते. रोगराई नाहीसे होतात. पूजा, उपासना करतानादेखील दिवा लावण्यामागे हाच हेतू असतो की देव आपल्या मनातील अज्ञानरूपी काळोखाला दूर करून ज्ञानाचा प्रकाश प्रदान करो.

सकारात्मक ऊर्जा देतो दिवा

कोणत्याही पूजा किंवा सणासुदीला तुपाचा आणि तेलाचा दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते. कुटुंबातील सदस्यांना कीर्ती मिळते. वास्तूच्या नियमानुसार अखंड दिवा पूजेच्या आग्नेय कोनात ठेवावा. या दिशेमध्ये दिवा ठेवल्याने शत्रूवर विजय मिळतो आणि घरात सौख्य, समृद्धी भरभराटीचे वास्तव्य होते.

दिव्याच्या ज्योतीसंदर्भात असे मानले जाते, की उत्तर दिशेत ज्योत ठेवल्याने आरोग्य आणि आनंद वाढतो. पूर्व दिशेला ज्योत ठेवल्याने दीर्घायुष्य मिळते. लक्षात ठेवा, की जर का दिवा चिकणमातीचा असल्यास दिवा स्वच्छ आणि संपूर्ण असावा. कोणत्याही पूजेत खंडित किंवा भंगलेला दिवा लावणं अशुभ आणि निषिद्ध मानले गेले आहे.
दिवा लावण्याच्या बद्दल असे म्हणतात, की सम संख्येत दिवे लावल्याने ऊर्जेचे संवहन निष्क्रिय होतात, तर विषम संख्येत दिवे लावल्याने वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्मित होते. याच कारणामुळे धार्मिक कार्यात नेहमी विषम संख्येत दिवे तेवतात.
- पं. नरेंद्र धारणे, (लेखक ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat BJP Ministers Resign : मोदींच्या गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड! मुख्यमंत्री सोडून भाजपच्या सर्व मंत्र्यांनी दिला राजीनामा

Bhoom Crime : चिंचपूरमध्ये गर्भवती महिलेचा जबरदस्तीने गर्भपात, डॉक्टर अटकेत; भूम तालुक्यातील धक्कादायक घटना

Nashik Crime : वर्षभरापासून फरारी असलेल्या एमडी ड्रग्ज प्रकरणातील संशयितांना गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

Numerology 2025: प्रेम, करिअर आणि आरोग्यावर काय होईल परिणाम? १ ते ९ मूलांक असलेल्यांसाठी १७ ऑक्टोबर कसा असेल?

Mokhada Police : घरफोडी टाळण्यासाठी मोखाडा पोलीसांच्या सुचना; नागरीकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT