Ashwini-Gite
Ashwini-Gite 
सप्तरंग

डिजिटल युगातल्या ‘स्मार्ट उद्योजिका’ (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा

बिझनेस वुमन - अश्‍विनी गिते, संस्थापक, ई-बिझनेस सोल्यूशन
स्मार्ट फोनच्या जमान्यात अश्‍विनी गिते यांनी ’स्मार्ट उद्योजक’ होण्याचा निर्णय घेतला आणि इतर उद्योजकांना याचा कसा फायदा मिळेल, या विचाराने डिजिटल मार्केटिंग हा आव्हानात्मक उद्योग सुरू केला. त्यांच्या व्यवसायाला ‘ई-बिझनेस सोल्यूशन’ या नावाने ओळख मिळाली.

अश्‍विनी म्हणतात, ‘‘डिजिटल मार्केटिंग हे पारंपरिक मार्केटिंगपेक्षा वेगळे नाही; फक्त मार्केटिंगची पद्धत बदलली आहे. अनेक उद्योग सुरू होतात, मात्र ते त्यांच्या एका ठराविक कक्षेपुरतेच मर्यादित राहतात. यामुळेच मी इतर उद्योगांना बळ देणारा उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला. व्यवसाय करणे माझ्यासाठी सोपे नव्हते; कारण मला व्यवसाय कसा करावा, हे अजिबात माहीत नव्हते. आमच्या घरी बाळ येणार असल्यामुळे मी काही दिवस घरूनच काम करण्याचा निर्णय घेतला. एक लॅपटॉप आणि डेटा कार्डच्या मदतीने ‘डिजिटल मार्केटिंग’चा व्यवसाय घरूनच सुरू झाला. अनेक चांगले ग्राहक मला मिळत गेले. त्यातूनच आर्थिक बळासह आत्मविश्‍वास दुणावला. लोक मोबाईल फोन आणि लॅपटॉप अधिक वापरत असल्याने कंपन्यांचा डिजिटल मार्केटिंगवर भर असतो. एकूणच व्यवसाय ‘लोकल टू ग्लोबल’ करण्यासाठी ते महत्त्वाचे आहे. लोकांचे प्रॉडक्‍ट (उत्पादन) किंवा सर्व्हिसेस (सेवा) किंवा ब्रॅंडबद्दल जागरूकता निर्माण करून त्यांची विक्री कशी वाढवता, येईल यासाठी मी प्रयत्न करत गेले.’’

अनेक उद्योजक सुरवातीला स्वतःची वेबसाइट बनवण्यासाठी आग्रही असायचे, पण फक्त वेबसाइट बनवून किंवा व्यवसाय सुरू करून कधीच बिझनेस मिळत नाही. ती वेबसाइट किंवा तुमचा व्यवसाय लोकांपर्यंत पोचायला हवा. हेच अश्‍विनी यांनी प्रत्येक वेबसाइट बनवणऱ्याला सांगितले.

अशा पद्धतीने एक-एक प्रॉडक्‍ट वाढत गेला आणि त्यांची कंपनी आज डिजिटल मार्केटिंगच्या १५ ते २० सर्व्हिसेस देते. डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी वेबसाइट, सोशल मीडिया, सर्च इंजिन, गुगल ॲडव्हाइस, मोबाईल ॲप्स, ई-मेल यांसारख्या विविध इंटरनेटवरील माध्यमांचा वापर केला जातो.

सध्या जगातील एकूण इंटरनेट यूजरपैकी ८० टक्‍क्‍यांहून अधिक लोक स्मार्ट फोनचा वापर करत असल्याने या लोकांपर्यंत पोचण्यासाठी आपल्या कंपनीचे, वस्तू किंवा सेवांची माहिती असलेले मोबाईल ॲप तयार करणे ही आजच्या काळाची गरज आहे. कंपनीच्या मोबाईल ॲप्सद्वारे लोक त्यांना हव्या असलेल्या वस्तू किंवा सेवा विकत घेऊ शकतात. डिजिटल मार्केटिंग ही बदलत्या काळाची गरज आहे. 

अश्‍विनी म्हणतात, ‘‘प्रत्येक व्यवसायात चांगला फायदा मिळविण्यासाठी डिजिटल मार्केटिंगचा आराखडा असणे गरजेचे आहे. त्यामुळे सध्याच्या जगात कसला ’ट्रेंड’ सुरू आहे, हे ओळखून कौशल्य मिळवा आणि कामाला लागा. यश स्वतःहून तुमच्याकडे चालत येईल. मी सुरवातीला एकटीच काम करायचे. तेव्हा वर्षाला पाच ते सहा लाख रुपये मिळायचे. आता कंपनीत कर्मचाऱ्यांची भरती करून व्यवसाय कोटींमध्ये पोचला आहे. मी आतापर्यंत दोनशेहून अधिक लोकांना रोजगार दिला आणि ’डिजिटल मार्केटिंग’चा व्यवसाय कसा सुरू करायचा हे सांगितले आहे. ज्यांनी नुकताच व्यवसाय सुरू केला आहे, त्यांना मी एवढेच सांगेन की, प्रामाणिकपणे काम करा.

ग्राहकांना सांभाळा, तुमची सर्व्हिस चांगली द्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचा. यावरच कोणत्याही व्यवसायाचे यश अवलंबून असते.’’ 
(शब्दांकन - गौरव मुठे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT