urvashi-rautela
urvashi-rautela 
सप्तरंग

मॉडेलिंगकडून अभिनय क्षेत्राकडे..!

सकाळ वृत्तसेवा

सेलिब्रिटी टॉक - ऊर्वशी रौतेला, अभिनेत्री
मी मूळची हरिद्वारची आहे. माझे संपूर्ण शालेय शिक्षण दिल्लीमध्ये झाले. मला लहानपणापासूनच फॅशन आणि अभिनयाची प्रचंड आवड होती. मी शालेय शिक्षण घेत असतानाच विविध स्पर्धांत किंवा कार्यक्रमात आवर्जून भाग घ्यायचे. अभिनय क्षेत्रातच काम करायचे हे मी आधीपासूनच ठरवले होते. वयाच्या पंधराव्या वर्षापासूनच मी मॉडेलिंग क्षेत्राकडे वळले. मॉडेलिंग करता करता मी अभिनयाकडे वळले. अभिनयक्षेत्रात पाऊल टाकताच मला दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची सुवर्णसंधी मिळाली. माझी चित्रपटसृष्टीतली एंट्रीच अभिनेता सनी देवलसारख्या अभिनेत्यासह ‘सिंग साहब द ग्रेट’ या चित्रपटातून झाली. नावाजलेल्या कलाकारांसोबत झालेली एंट्री माझ्यासाठी खूपच लकी ठरली. त्यानंतर मी ‘ग्रेट ग्रॅंड मस्ती’, ‘काबील’, ‘हेट स्टोरी’ यासारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांसमोर आले. बॉलिवूडप्रमाणेच मी साउथ चित्रपटसृष्टीतही बरेच नाव कमावले. त्याचप्रमाणे ‘पोरबाशनी’ या बंगाली चित्रपटातून मी बंगाली चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. माझा बंगाली भाषेतली पहिलाच चित्रपट असल्याने काम करताना मजा आली. बांगला देशातही माझे बरेच चाहते आहेत.

आता पुन्हा एकदा मला मल्टीस्टार अशा चित्रपटात काम करायची संधी मिळाली आहे. अनिस बाझमी दिग्दर्शित ‘पागलपंती’ चित्रपटात मी काम करणार आहे. या चित्रपटात काम करण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजते. या चित्रपटात मी अभिनेता अनिल कपूर, जॉन अब्राहाम यासारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम करणार आहे. मी आणि माझे बाबा अनिलजींचे खूप मोठे चाहते आहोत. माझ्या बाबांनी अनिल सरांचे प्रत्येक चित्रपट कित्येकदा पाहिले आहेत. शिवाय माझा भाऊ परदेशात पायलट आहे, त्याला जेव्हा या चित्रपटाबद्दल कळले आणि मुख्य म्हणजे अनिलजींसोबत काम करतेय हे कळल्यावर त्यालाही फारच आनंद झाला.

‘माझी’ या चित्रपटात असलेली भूमिका काव्या या पात्राची आहे. शिवाय माझ्या या भूमिकेनेच चित्रपटात टर्निंग पॉइंट येतो, त्यामुळे इतर मुख्य कलाकारांप्रमाणेच माझेही काम तितकेच महत्त्वाचे आहे. शिवाय या चित्रपटात श्रीदेवी यांचे ‘चालबाज’ चित्रपटातील गाणे मला रिक्रिएट करण्याची संधी अनिस सरांनी दिली. हा चित्रपट, चित्रपटातील गाणे हे अनिस सरांनी मला दिलेली सर्वांत मोठी संधी आहे. मी श्रीदेवी यांची फार मोठी चाहती आहे, त्यांचेच गाणे मला रिक्रिएट करायला मिळाल्याने मी खूप खूश आहे.
(शब्दांकन - स्नेहा गावकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT