Bhavishya 
सप्तरंग

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - २० फेब्रुवारी २०२१

सकाळवृत्तसेवा

पंचांग -
शनिवार : माघ शुद्ध ८, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, चंद्रोदय दुपारी १२.२६, चंद्रास्त रात्री १.५३, सूर्योदय ७.००, सूर्यास्त ६.३६, दुर्गाष्टमी, भारतीय सौर फाल्गुन १ शके १९४२. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८१८ : आष्टी येथे इंग्रज व मराठे यांच्या युद्धात मराठ्यांचे शेवटचे सेनापती बापू गोखले धारातीर्थी पडले.
१८३५ : कलकत्ता मेडिकल कॉलेजचा शुभारंभ. भारतातील आधुनिक वैद्यकाच्या शिक्षणाची सुरवात कलकत्त्यात झाली.
१८६८ : ‘अमृत बझार पत्रिका’ या बंगाली नियतकालिकाचा प्रारंभ.
१९०६ : भारतातील सर्कस उद्योगाचे जनक विष्णुपंत छत्रे यांचे निधन. विष्णुपंत हे घोड्यांचे प्रशिक्षण आणि संगीत यात वाकबगार होते.
१९९२ : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात नृत्यदिग्दर्शक पं. गौरीशंकर यांचे निधन. 
१९९४ : ज्येष्ठ घटनातज्ज्ञ, विचारवंत, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू त्र्यंबक कृष्णाजी टोपे यांचे निधन.
१९९७ : ‘माणूस’ साप्ताहिकाचे संपादक व ज्येष्ठ व्यासंगी पत्रकार श्रीकांत गणेश माजगावकर यांचे निधन.
१९९८ : भारताला १९३६ च्या बर्लिन ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या संघातील अखेरचे हॉकीपटू बाबू नरसप्पा निमल यांचे निधन.
२००१ : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री इंद्रजित गुप्ता यांचे निधन.

दिनमान -
मेष :
व्यवसायात धाडस करायला हरकत नाही. काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे.
वृषभ : प्रवास सुखकर होतील. उत्साह व उमेद वाढेल.
मिथुन : आर्थिक क्षेत्रात धाडस नको. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
कर्क : अनेकांचे सहकार्य लाभेल. संततिसौख्य लाभेल.
सिंह : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. व्यवसायात प्रगती होईल.
कन्या : काहींना गुरूकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
तुळ : प्रवास शक्‍यतो टाळावेत. आरोग्याकडे दुर्लक्ष नको.
वृश्‍चिक : मानसिक प्रसन्नता लाभेल. प्रवास सुखकर होतील.
धनु : आध्यात्मिक प्रगती होईल. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.
मकर : मित्रांचे सहकार्य लाभेल. नवीन स्नेहसंबंध जुळतील.
कुंभ : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. मनोबल वाढेल.
मीन : आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. जिद्द वाढेल.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला कसं संपवलं, ४०० वर्षापूर्वींचं AI LIVE रिपोर्टींग व्हायरल, शिवभक्त असाल तर नक्की पाहा

Jalna News: आता नार्को चाचणी कराच; मनोज जरांगे यांच्या शिष्टमंडळाचे पोलिसांना निवेदन

Latest Marathi Breaking News Live: लातूर नांदेड महामार्गावर सीएनजी वाहतूक करणाऱ्या ट्रंकरला गळती, महामार्गावरील वाहतूक ठप्प

Uddhav Thackeray: शेती, संसार उद्‍ध्वस्त; पण मदतीची दमडीही नाही, ताडबोरगावात शेतकऱ्यांनी मांडली उद्धव ठाकरेंसमोर व्यथा

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध गोलंदाजांमुळेच जिंकलो मालिका, आता T20I World Cup आधी... कर्णधार सूर्यकुमारने केलं स्पष्ट

SCROLL FOR NEXT