Bhavishya
Bhavishya 
सप्तरंग

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : २३ जून

सकाळवृत्तसेवा

पंचांग -
मंगळवार - आषाढ शु. २, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ६.०१, सूर्यास्त ७.१५, चंद्रोदय स. ७.३७, चंद्रास्त रा. ९.२०, भारतीय सौर २, शके १९४२.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९५३ - हिंदू महासभेचे नेते, भारतीय जनसंघाचे पहिले अध्यक्ष आणि पहिल्या केंद्रीय मंत्रिमंडळातील व्यापारमंत्री डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी यांचे निधन.
१९८० - माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे धाकटे चिरंजीव आणि काँग्रेसचे खासदार संजय गांधी यांचे विमान अपघातात निधन.
१९८१ - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स. का. पाटील यांचे निधन. केंद्रीय अन्नमंत्री, रेल्वेमंत्री म्हणून त्यांनी प्रभावी काम केले.
१९८२ - बालगंधर्व आणि मा. कृष्णराव यांना ऑर्गनची साथ करणारे व गंधर्व नाटक मंडळीतील नामवंत कलाकार हरिभाऊ देशपांडे यांचे निधन. 
१९९४ - बालगंधर्वांचे चरित्रकार, नाटककार, साहित्यिक आणि साक्षेपी समीक्षक वसंत शांताराम देसाई यांचे निधन.  ‘बालगंधर्व ः व्यक्ती आणि कला’ हे त्यांचे पुस्तक म्हणजे बालगंधर्वांचे साक्षात भावपूर्ण, रसपूर्ण चित्र होय. 
१९९४ - आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीकडून ‘ऑलिंपिक चळवळ’ शताब्दी महोत्सव पॅरिस येथे साजरा.
१९९६ - बांगलादेशातील दुसऱ्या महिला पंतप्रधान म्हणून अवामी लीगच्या नेत्या शेख हसीना वाजेद यांचा शपथविधी.
१९९८ - दुसऱ्या महायुद्धात जपानच्या शरणागतीची साक्षीदार असलेली अमेरिकेची ‘यूएसएस मिसुरी’ ही युद्धनौका  निवृत्तीनंतर पर्ल हार्बर बंदरात दाखल झाली.
२००० - नामवंत तबलावादक उस्ताद निजामुद्दीन खाँ यांचे निधन.
२००३ - व्यापारवृद्धीच्या सामंजस्य कराराबरोबरच दोन देशांमधील संबंधांची आणि सहकार्याची मार्गदर्शक तत्त्वे निश्‍चित करणारा ऐतिहासिक जाहीरनामा भारत आणि चीन देशांदरम्यान करण्यात आला. तब्बल बारा वर्षांनंतर दोन देशांत करार झाला.

दिनमान -
मेष :
मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभणार आहे. बाहेर पडताना काळजी घ्यावी.
वृषभ : मित्र-मैत्रिणींचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. 
मिथुन : मुला-मुलींबरोबर वादविवाद टाळावा. एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. 
कर्क : गेल्या काही दिवसांपेक्षा आजचा दिवस चांगला जाईल. वादविवाद मिटतील. 
सिंह : ध्यानधारणा यामध्ये मन रमेल. कुटुंबातील व्यक्‍तींबरोबर वेळ घालवू शकाल.
कन्या : आरोग्य चांगले राहील. अतिमहत्त्वाचे काम असेल, तरच घराबाहेर पडावे. 
तुळ : व्यवसायामध्ये उलाढाल होईल. घराबाहेर पडताना काळजी घ्यावी.
वृश्‍चिक : आजचा दिवस चांगला जाईल. खर्चाचे प्रमाण कमी होईल. वादविवाद टळेल.
धनु : प्रवासामध्ये काळजी घ्यावी. महत्त्वाच्या कामांशिवाय बाहेर पडू नये. 
मकर : जोडीदाराबरोबर सुसंवाद साधू शकाल. जिद्द व चिकाटी वाढणार आहे. 
कुंभ : मित्र-मैत्रिणींच्या आश्‍वासनांवर अवलंबून राहू नये. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मीन : मुला-मुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

LSG vs MI IPL 2024 : लखनौनं मुंबईची कडवी झुंज काढली मोडून; गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप

SCROLL FOR NEXT