Bhavishya
Bhavishya 
सप्तरंग

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - २८ मार्च २०२१

सकाळवृत्तसेवा

पंचांग -
रविवार : फाल्गुन शुद्ध १५, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी कन्या, चंद्रोदय सायं६.३१, चंद्रास्त सकाळी ६.५९, सूर्योदय ६.३३, सूर्यास्त ६.४६, हुताशनी पौर्णिमा (होळी), पौर्णिमा समाप्ती उत्तर रात्रौ १२.१८, होलिका प्रदीपन, कुलधर्म, मन्वादि, अन्वाधान, भारतीय सौर चैत्र ७ शके १९४३.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९९२ - स्थानकवासी जैनांचे सर्वश्रेष्ठ धर्मगुरू आचार्य सम्राट आनंदऋषीजी महाराज यांचे महानिर्वाण.
१९९२ - भारतीय उद्योगाचे अध्वर्यू जे.आर.डी. टाटा यांना ‘भारतरत्न’ हा देशातील सर्वोच्च नागरी सन्मान राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांच्या हस्ते प्रदान.
१९९७ - नामवंत सामाजिक कार्यकर्त्या आणि भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या श्रीमती पुपुल जयकर यांचे निधन.
१९९७ - बंगाली लेखिका श्रीमती महाश्वेतादेवी यांना द. आफ्रिकेचे अध्यक्ष डॉ. नेल्सन मंडेला यांच्या हस्ते ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ प्रदान.
१९९८ - ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग’ (सी-डॅक) या संस्थेने विकसित केलेला स्वदेशी बनावटीचा ‘परम १००००’ महासंगणक देशाला विधिपूर्वक अर्पण.
२००० - नामवंत अर्थतज्ज्ञ व सिद्धहस्त लेखक शांताराम द्वारकानाथ ऊर्फ राम देशमुख यांचे निधन.
२००० - प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री प्रिया राजवंश यांचे निधन.

दिनमान -
मेष :
धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. प्रवास शक्‍यतो टाळावेत.
वृषभ : महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. आरोग्य उत्तम राहील.आत्मविश्‍वास वाढेल.
मिथुन : व्यवसायात उत्तम स्थिती राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.
कर्क : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील. 
सिंह : एखादी भाग्यकारक घटना घडेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
कन्या : वैवाहिक सौख्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील.मानसिक अस्वस्थता जाणवेल. 
तूळ : हितशत्रूंचा त्रास कमी होईल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
वृश्‍चिक : संततिसौख्य लाभेल. प्रियजनांचा सहवास लाभेल.
धनू : आरोग्य उत्तम राहील. मनोबल उत्तम राहील. वैवाहिक सौख्य लाभेल.
मकर : मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. 
कुंभ : वादविवाद शक्‍यतो टाळावेत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
मीन : मनोबल उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.जिद्द व चिकाटी वाढेल.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

'नाष्ट्याला राजकारणी खातो' म्हणणारे TN शेषन काँग्रेसकडून होते निवडणुकीच्या रिंगणात; भाजपच्या दिग्गज नेत्याला दिलं होतं आव्हान

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराज, राणी चन्नम्मांचा अपमान केला, बेळगावात मोदींचा घणाघात

SCROLL FOR NEXT