Horoscope and Astrology Sakal
सप्तरंग

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 7 सप्टेंबर 2021

मंगळवार : भाद्रपद शुद्ध १, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह/कन्या, चंद्रोदय स. ६.५६, चंद्रास्त सायं. ७.१५, अमावास्या समाप्ती सकाळी ६.२२, भारतीय सौर भाद्रपद १६ शके १९४३.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

मंगळवार : भाद्रपद शुद्ध १, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह/कन्या, चंद्रोदय स. ६.५६, चंद्रास्त सायं. ७.१५, अमावास्या समाप्ती सकाळी ६.२२, भारतीय सौर भाद्रपद १६ शके १९४३.

दिनविशेष -

१८८९ : नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे बंधू शरच्चंद्र बोस यांचा जन्म. ते झुंजार पत्रकार, उत्कृष्ट वकील, श्रेष्ठ राजकारणी, सुधारक, समाजसेवक म्हणून प्रसिद्ध होते.

१९०६ : ‘बॅंक ऑफ इंडिया’ची स्थापना. ही भारतात स्थापन झालेली पहिली स्वदेशी व्यापारी बॅंक होय.

१९१७ : महिलांच्या विविध समस्या, त्यांचा विकास आणि कुटुंबनियोजन या क्षेत्रात सलग ६० वर्षे कार्यरत असणाऱ्या डॉ. बानू कोयाजी यांचा जन्म. त्यांना पद्मभूषण व रॅमन मॅगसेसे पुरस्कार, रामेश्वरदास बिर्ला राष्ट्रीय पुरस्कार, पुण्यभूषण पुरस्कार, पुणे विद्यापीठातर्फे १९९५ मध्ये डॉक्‍टर ऑफ लेटर्स या सन्मानांनी गौरविण्यात आले. पुण्याच्या केईएम रुग्णालयाची धुरा त्यांनी सांभाळली. याशिवाय जहांगीर नर्सिंग होम, दैनिक सकाळ, इंडिया फौंडेशन, इंडियन इन्स्टिट्यूशन ऑफ एज्युकेशन या संस्थांशी त्यांचा निकटचा संपर्क होता.

दिनमान -

मेष : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. तुमचे निर्णय योग्य ठरतील.

वृषभ : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. सार्वजनिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

मिथुन : तुमचे निर्णय योग्य ठरतील. थोरामोठ्यांचे परिचय होतील.

कर्क : व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. तुमच्या कर्तृत्वाला संधी लाभेल.

सिंह : शासकीय कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कन्या : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. शासकीय कामे पुढे ढकलावीत.

तूळ : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल.

वृश्‍चिक : सार्वजनिक कामात यश लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

धनू : शत्रुपीडा नाही. तुमच्या कर्तृत्वाला संधी लाभेल.

मकर : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

कुंभ : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. अपेक्षित सहकार्य लाभेल.

मीन : वाहने सावकाश चालवावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

Latest Marathi News Updates: एरंडोल येथे पोलीस स्टेशनच्यावतीने दादासाहेब पाटील महाविद्यालयात गुरु गौरव कार्यक्रमाचे आयोजन

Beed Crime : बीडमध्ये विकृतीचा कळस! निवृत्त पोलिस फौजदाराला खोलीत डांबून बेदम मारहाण; पाणी मागितले असता तोंडावर केली लघुशंका

Russia Ukraine War: रशियाच्या हल्ल्यांत युक्रेनमध्ये दोन ठार

'या' नक्षत्रांमध्ये जन्मलेली मुलं असतात अतिशय भाग्यशाली; सौंदर्य, यश आणि धनसंपत्तीने होतात समृद्ध

SCROLL FOR NEXT