सप्तरंग

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - ८ जानेवारी २०२१

सकाळवृत्तसेवा

पंचांग -
शुक्रवार : मार्गशीर्ष कृष्ण १०, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ/वृश्चिक, चंद्रोदय पहाटे ३.०१, चंद्रास्त दुपारी १.५४, सूर्योदय ७.१०, सूर्यास्त ६.१२, भारतीय सौर पौष १८ शके १९४२.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९४२ - विश्‍वनिर्मितीचं गूढ उलगडण्याचा प्रयत्न करणारे प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचा जन्म. सापेक्षतावाद व पूंजयांत्रिकी या सिद्धांतांचा मेळ घालण्यात यश मिळालं, तर विश्‍वाची निर्मिती कशी झाली या मूलभूत प्रश्‍नाचं उत्तर शोधणं सोपं जाईल असा क्रांतिकारक विचार मांडून हॉकिंग यांनी विज्ञान संशोधनाला विसाव्या शतकात दिशा व गती दिली.
१९६६ - चित्रपट दिग्दर्शक व निर्माते बिमल रॉय यांचे निधन.
१९६७ - जागतिक ख्यातीचे संस्कृत पंडित, संशोधक व थोर प्राच्यविद्या पंडित श्रीपाद कृष्ण बेलवलकर यांचे पुणे येथे निधन.
१९७३ - ‘सकाळ’ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक डॉ. ना. भि. तथा नानासाहेब परुळेकर यांचे पुण्यात निधन.
१९८४ - ब्राह्मो समाजातील एक थोर पुरुष, उत्कृष्ट वक्ते आणि विख्यात लोकसेवक केशवचंद्र सेन यांचे निधन.
१९९१ - कर्वे समाज संस्थेचे संस्थापक भास्कर धोंडो कर्वे यांचे निधन.
२००० - स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांची १९९९ साठीच्या आंध्र प्रदेश सरकारच्या एन. टी. रामाराव राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासाठी निवड.

दिनमान -
मेष :
तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. वैवाहिक सौख्य लाभेल.
वृषभ : प्रवासात वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मिथुन : अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत रहाल. आरोग्य चांगले राहील.
कर्क : व्यवसायातील महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. मनोबल वाढेल.
सिंह : काहींना प्रवासाचे योग येतील. उत्साह व उमेद वाढेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
कन्या : थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. व्यक्‍तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील.
तुळ : नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील.जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.
वृश्‍चिक : भागीदारी व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. 
धनु : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल.
मकर : सार्वजनिक व सामाजिक क्षेत्रात सहभागी होण्याची संधी लाभेल. 
कुंभ : अपेक्षित असणाऱ्या क्षेत्रात सुसंधी लाभेल. आरोग्य चांगले राहील.
मीन : काहींना अचानक धनलाभ संभवतो. नोकरीत समाधानकारक स्थिती.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT