dr avinash tupe writes Affection lost machine-based Treatment should done only after understanding patient complaints  sakal
सप्तरंग

यंत्राधारित उपचारात आपुलकी हरवली

यंत्रे ही डॉक्टर्सना मदत करण्यासाठी आहेत, ती डॉक्टरला किंवा वैद्यक व्यवस्थेला पर्याय नाहीत. नवीन यंत्रे कितीही कार्यक्षम असली तरी ती यंत्रे आहेत.

अवतरण टीम

यंत्रे ही डॉक्टर्सना मदत करण्यासाठी आहेत, ती डॉक्टरला किंवा वैद्यक व्यवस्थेला पर्याय नाहीत. नवीन यंत्रे कितीही कार्यक्षम असली तरी ती यंत्रे आहेत.

- डॉ. अविनाश सुपे

यंत्रे ही डॉक्टर्सना मदत करण्यासाठी आहेत, ती डॉक्टरला किंवा वैद्यक व्यवस्थेला पर्याय नाहीत. नवीन यंत्रे कितीही कार्यक्षम असली तरी ती यंत्रे आहेत. त्यात बिघाड किंवा चूक होऊ शकते. त्यामुळे उपचार यंत्राद्वारे माहिती आणि प्रत्यक्ष रुग्णाकडून त्याच्या तक्रारी समजून घेऊन मगच उपचार केले पाहिजेत; अन्यथा चूक होण्याची शक्यता असते. डॉक्टरांवरील विश्वास आणि रुग्णाशी डॉक्टरांचे असलेले आपुलकीचे नाते यंत्राच्या विश्वात हरवू नये.

का ही दिवसांपूर्वी एक अत्यंत श्रीमंत, स्थूल वजनदार व्यक्ती माझ्याकडे उपचारार्थ आली. त्यांना तपासताना त्यांच्या पोटावर एक यंत्र आणि एक चिप बसविलेली मी पहिली. त्यांना विचारले की, हे यंत्र कशासाठी आहे?

ते म्हणाले, ‘‘डॉक्टर ही एक नवीन प्रकारची चिप आहे, जिच्यामुळे माझ्या रक्तात किती साखर आहे हे मोबाईलवर माझ्या अमेरिकेतील मुलीला कळते आणि ती अशी २४ तास तिथे राहून माझ्यावर देखरेख ठेवते. जर साखर जास्त झाली की तिला धोक्याचा संदेश जातो आणि ती मग मला फोन करून कोणती औषधे घ्यावीत, हे सांगते.

त्यांची तपासणी पूर्ण झाल्यावर मी त्यांना आवश्यक ते उपचार आणि औषधे लिहून दिली. त्यांना मी चहा आणि बिस्किट्स दिली. त्यांनी सांगितले की, मी ही साखरेची बिस्किट्स खाल्ली तर माझ्या मुलीला लगेच कळेल म्हणून मी ही खाऊ शकत नाही. अशा प्रकारे त्यांचा मधुमेह त्यांची मुलगी अमेरिकेमध्ये बसून कार्यक्षमतेने नियंत्रित करीत होती.

आज आपण पाहतो की अशी कित्येक आरोग्य यंत्रे निर्माण केलेली आहेत, जी आपल्या जीवनाचा भाग बनली आहेत. पेस मेकर, रक्तदाब तपासणी यंत्र, ऑक्सिजन व पल्स मॉनिटर इत्यादी आपण मोबाईलद्वारे पाहू आणि नियंत्रित करू शकतो.

काही डॉक्टर्स परदेशी जातात किंवा परिषदांना दूर दूर जातात; पण तेव्हा त्यांच्या महत्त्वाच्या रुग्णांना अशी चिप लावलेली असते की, त्यांच्या प्रकृतीमधील धोक्याची सूचना डॉक्टर जिथे असतील तिथे मिळते. त्यावर लगेच संदेश पाठवून त्यांच्या सहायकाकडून योग्य वेळात उपचार करणे त्यांना शक्य होते.

हे बदल त्यांना रुग्णाकडून काही कळविले जाण्यापूर्वी शरीरातील थोडेही बदल यंत्राद्वारे कळतात आणि त्याप्रमाणे तत्काळ उपचार करणे शक्य होते. ही यंत्रे रुग्णाच्या शरीरावर लावली की ती योग्य सूचना देत राहतात.

कोविडच्या काळात या अशा उपकरणांच्या उपयोगाला मोठी चालना मिळाली. रुग्ण दूर असला, तरी उपचार करणे शक्य झाले. १९९८ मध्ये एव्हरेस्ट बेसच्या ट्रेकला १४ हजार ५०० फुटावर पल्स ऑक्सिमीटरने स्वतःचे ऑक्सिजन तपासताना एक प्रकारचे कुतुहूल होते; पण कोविड काळामध्ये घरोघरी हे ऑक्सिमीटर्स आपण पहिले.

आजची तरुण पिढी दोन काट्याची घड्याळे जवळजवळ वापरतच नाहीत. ही घड्याळे फक्त मध्यमवयीन किंवा वयस्कर मंडळीच वापरतात. नवीन पिढी प्रत्येक गोष्टीसाठी मोबाईलचा वापर करते. ते पैसेही वापरात नाहीत.

सर्व व्यवहार (म्हणजे वडापाव किंवा पाणीपुरी खाणे हेदेखील मोबाईलने पैसे देऊन करतात.) याला जनरेशन गॅप म्हणता येईल. त्यांनी जर घड्याळे वापरलीच, तर ती घड्याळे ऑल इन वन असतात.

ती जिम वॉच असतात- आपण किती चाललो, किती कॅलरीज पोटात गेल्या, किती खर्च झाल्या हे दाखवणारी ॲप त्यात असतात. माझी एक विद्यार्थिनी अर्धे सलाड खाऊन उठली तेव्हा मी विचारले, का ग पूर्ण खाल्ले नाहीस, तर म्हणाली ‘‘माझा आजचा कोटा संपला.’’ अशी ही स्वतःला नियंत्रित ठेवणारी पिढी आहे.

२००८ साली जेम्स बॉण्डचा ‘कॅसिनो रॉयल’ नावाचा चित्रपट आला होता. यात बॉण्डच्या शरीरात एक चिप टाकलेली दाखवली होती. त्या चिपमुळे त्याच्या हेडऑफिसला (म्हणजे लंडनमध्ये) तो जगामध्ये कुठेही आणि कसा आहे याची माहिती मिळायची.

जेव्हा त्याला विषबाधा होते तेव्हा त्याच्या ऑफिसला लगेच कळते. मग बॉण्ड त्याच्या गाडीत जातो जिथे एक जीवसंरक्षक सामुग्री ठेवलेली असते. त्यातील लीड्स तो छातीवर लावतो आणि त्याला रिमोट कंट्रोलने शॉक दिले जातात आणि त्याचा जीव वाचतो.

आता चित्रपटातील अतिरंजित आणि नाट्यमय भाग सोडला तरी आता १०-१२ वर्षानंतर ही आरोग्य यंत्रे अस्तित्वात आलेली आहेत आणि नवनवीन येत राहणार आहेत. रक्त तपासणीसाठी इन्फ्रा रेड लाईटने रक्त वाहिनी शोधणे, रक्त (हिमोग्लोबिन इत्यादी) केवळ यंत्राला हात लावून समजणे, ईसीजी घड्याळावरून काढता येणे अशी अनेक यंत्रे आज उपलब्ध आहेत. गेल्या काही वर्षात त्यामध्ये सुधारणा होऊन त्यांचा दर्जा सुधारत आहे.

आर्टिफिशीअल इंटेलिजन्स - कृत्रिम बुद्धिमत्ता - याने वैद्यक शास्त्रात एक वेगळेच वातावरण निर्माण होते आहे. याबद्दल सविस्तर वेगळ्या लेखात लिहीनच; पण या अनुषंगाने एक नक्कीच सांगू इच्छितो की नवीन यंत्रे कितीही कार्यक्षम असली तरी ती यंत्रे आहेत.

त्यात बिघाड किंवा चूक होऊ शकते. त्यामुळे उपचार यंत्राद्वारे माहिती आणि प्रत्यक्ष रुग्णाकडून त्याच्या तक्रारी समजून घेऊन मगच उपचार केले पाहिजेत; अन्यथा चूक होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर डॉक्टरांवरील विश्वास आणि डॉक्टर आणि रुग्णामधील आपुलकीचे नाते या यंत्राच्या विश्वात हरवू नये.

यंत्रे ही मानवाला, डॉक्टर्सना मदत करण्यासाठी आहेत, ती डॉक्टरला किंवा वैद्यक व्यवस्थेला पर्याय नाहीत, याची जाणीव आणि खबरदारी सर्वानी नक्कीच घेतली पाहिजे. पुढच्या काही काळात ही सर्व आरोग्य यंत्रे फॅशन आहेत की खरंच उपयोगी आहेत, ते आपल्या कळेलच!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing: सेन्सेक्स 52 अंकांच्या वाढीसह बंद; सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये जबरदस्त वाढ

ठरलं! स्टार प्रवाहवरील आणखी एक कार्यक्रम घेणार निरोप; त्याजागी दिसणार 'हा' शो; प्रोमो व्हायरल

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील वाघोली येथील भंगार दुकानाला भीषण आग

Solapur News: मोहोळ तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर, 17 गावांच्या आरक्षणात बदल

Railway Jobs 2025: रेल्वे मध्ये १० वी उत्तीर्णांसाठी मोठी भरती सुरु; प्रशिक्षणादरम्यान मिळेल आकर्षक मासिक वेतन!

SCROLL FOR NEXT