Fits Sakal
सप्तरंग

सामान्य-असामान्य : गुराख्याचं ‘गणित’

एका सेवाभावी संस्थेकडून फिट्सची एक केस रेफर झाली. त्याचबरोबर त्याच वागणंही विक्षिप्त आहे असं कळलं. केसबरोबर संस्थेच्या कौन्सेलर आल्या होत्या.

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. संजय वाटवे

एका सेवाभावी संस्थेकडून फिट्सची एक केस रेफर झाली. त्याचबरोबर त्याच वागणंही विक्षिप्त आहे असं कळलं. केसबरोबर संस्थेच्या कौन्सेलर आल्या होत्या. त्यांच्याकडून केसची माहिती कळाली. पेशंटला वरचेवर फिट्स येतात आणि तो सारखा तंद्रीत असतो. त्याची तपासणी केली असता तो तंद्रीत असल्याचं आढळून आलं. नीटसा बोलतही नव्हता. अशा केसेसमध्ये फीटवर पूर्ण ताबा मिळाल्याशिवाय मानसिक अवस्था नीट समजून येत नाही.

फिट्सचा उपचारही व्यवस्थित झालेला नव्हता. संस्थेनं पुढाकार घेऊन ‘आम्ही गोळ्या नियमित देऊ’ असं सांगितलं. संस्थेनं खरोखरच चांगलं काम करून नियमित गोळ्या दिल्या. काही आठवड्यात फिट्स बंद झाल्या. ग्लानी, गुंगी, बधिरता हे सगळ कमी झालं. त्यामुळे पेशंटशी संवाद साधता येऊ लागला.

नवनाथ खेड शिवापूरजवळच्या खेड्यात मेंढपाळ होता. जंगलात राहणारं, लंगोट घालणारं कुटुंब होतं. घरात शैक्षणिक वातावरण नव्हतंच. तरीसुद्धा गावाजवळच्या शाळेत चौथीपर्यत शिकला. पुढे शिकायची इच्छा होती; पण शक्य नव्हतं.

घरचे सगळेच गुरं राखणं, मेंढ्या चारणं यासाठी डोंगरावर जात. नवनाथही गुरं, मेंढ्या घेऊन डोंगरावर जात असे; पण त्याचं कामात लक्ष नसे. तो आपल्याच विचारात गुरफटलेला असे. त्याला गणिताची अतिशय आवड होती; पण फिट्सचा आजार आणि शिक्षण नाही, त्यामुळे गणिताला दिशा सापडत नव्हती.

फिट्स बंद झाल्यामुळे ब्रेन फॉगिंग बंद झालं. तो मोकळा बोलू लागला. फिट्सच्या पेशंटचा एकतंद्रीपणा, एककल्लीपणा त्यानं गणिताकडे वळवला होता. दिवसभर डोक्यात गणित, गणित, गणित! गणिताचे विविध फॉम्युले डोक्यात असत. कळपाकडे नजर टाकल्यावर गायी किती आहेत हे सांगता आलं पाहिजे. जशी त्याची ओळख होत गेली, तसे वेगवेगळे फॉर्म्युले तो सांगू लागला.

पंख्याकडे पाहिल्यावर पंख्याचा स्पीड सांगता आली पाहिजे असा एक फॉर्म्युला होता. फळवाले फळांची रास रचताना वजा एक, वजा एक, अशा पद्धतीनं रास रचतात. फक्त खालची फळांची रांग मोजून एकूण फळे किती? हे सांगायचा फॉर्म्युला. असे रोजच्या व्यवहारातले अनेक फॉर्म्युले तयार होते.

त्याचे हे विविध फॉर्म्युले खरं खोटं करणं गरजेचं होतं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे गणित विभागाचे प्रमुख माझे परिचित होते. त्यांना फोन केला. ते आश्चर्यचकितच झाले. चौथी पास माणूस गायींच्या कळपाकडे नजर टाकून एकूण संख्या सांगू शकतो, हा कोणता फॉर्म्युला? कसं काय करतो हा माणूस? मी त्यांना गंमतीने म्हणालो, ‘हा गणितात एवढा तरबेज आहे, की एका नजरेत गायींचे पाय मोजून चारने भागत असेल.’ तेही खूप हसले.

नवनाथला त्यांनी व्यवस्थित तपासलं. त्याचे फॉर्म्युले छाननी करून बघितले. त्यांचा मला फोन आला, ‘कसला अजब नमुना पाठवलात? याचे सगळे फॉर्म्युले बरोबर आहेत. आम्ही मनोरुग्णांना कच्चं मडकं समजत होतो; पण हा आशिक्षित गुराखी आमच्यापेक्षा पक्कं मडकं निघाला. आम्ही सगळे गणितज्ञ इथे बसलेलो आहोत; पण आमच्यापैकी कोणाकडेच असे फॉर्म्युले नाहीत.

आम्ही सगळे एकत्र मीटिंग घेऊन त्याची छाननी केली. फॉर्म्युले बरोबर निघाले. सगळे मान खाली घालून बसले आहेत. हा हिरा कुठे लपला होता?’ मी उत्तर दिलं, ‘‘त्यांनी ज्यांना ज्यांना फॉर्म्युले सांगायचा प्रयत्न केला, त्यांनी टिंगलटवाळी केली. तेव्हापासून तो कोणालाच फॉर्म्युले सांगत नसे. म्हणून तो स्वतःच्या तंद्रीतच राहतो.

माझ्यावर विश्वास बसला, म्हणून मला दोन - तीन फॉर्म्युले सांगितले.’ त्यांनी विचारलं, ‘अशिक्षित आणि फिट्सचा पेशंट. त्याचं एवढं डोकं कसं चालतं?’ मी म्हणालो, ‘देव जेव्हा एक खिडकी बंद करतो, तेव्हा तो एक मोठा दरवाजा उघडतो.

फिट्सचे पेशंट, मनोरुग्ण यांच्यात कोणती तरी एक स्पेशल गिफ्ट सापडते. म्हणूनच स्पेशल चाईल्ड किंवा गिफ्टेड चाईल्ड म्हणतात. गरज असते पारख करण्याची, त्यांचं असामान्यत्व शोधण्याची. अशा अनुभवातून माझ्यासारखे सिनिअर अभ्यासू डॉक्टर सामान्य-असामान्य अशी मालिका लिहितात.’

माझे शब्द इतके प्रभावी ठरले, की विभागप्रमुखांनी त्याला विद्यापीठाच्या गणित विभागात peonची नोकरी दिली. पैशांची सोय झाली. आणि विभागातच गणिताच्या प्रशिक्षणाची व्यवस्था केली.

नवनाथ शाळा शिकला नसला, तरी त्याला आयुष्याचं गणित गवसलं होतं.!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday : आज वर्षाचा शेवटचा दिवस! ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीला बँका बंद की सुरू? बँकेत जाण्याआधी हे जाणून घ्या

Kolhapur Political News : घराणेशाहीला विरोध करणाऱ्या महायुतीकडूनच नेत्यांच्या वारसांना प्राधान्य, कोल्हापूरकरांची भूमिका काय?

Latest Marathi News Update : गोरेगाव विधानसभेत शिंदे गटाची बंडखोरी

सख्खे भाऊ, सख्खे व्याही! पाकच्या लष्करप्रमुखांनी लेकीचं लग्न भावाच्या मुलाशी लावून दिलं, लष्कराच्या मुख्यालयात लग्नसोहळा

Gold Silver Price Today : वर्षाच्या शेवटी सोने, चांदीचा दरात घसरण होणार!, चांदी वाढली सोने दरात घट...

SCROLL FOR NEXT