old man sakal
सप्तरंग

सामान्य-असामान्य : असेही ‘साइड इफेक्ट्स!’

कन्हैय्यालाल जैन यांचं मिठाईचं दुकान कोणाला माहीत नाही? पुण्यात मोक्याच्या जागी असलेलं दुकान लोकप्रिय होतं.

सकाळ वृत्तसेवा

कन्हैय्यालाल जैन यांचं मिठाईचं दुकान कोणाला माहीत नाही? पुण्यात मोक्याच्या जागी असलेलं दुकान लोकप्रिय होतं.

- डॉ. संजय वाटवे

कन्हैय्यालाल जैन यांचं मिठाईचं दुकान कोणाला माहीत नाही? पुण्यात मोक्याच्या जागी असलेलं दुकान लोकप्रिय होतं. धंद्याची उलाढालही प्रचंड होती; पण कोरोनापासून दुकानातली गर्दी कमी होत गेली. कोणता अट्टल व्यापारी लॉस सहन करू शकतो? त्यामुळे कन्हैय्याजी सैरभैर झाले होते. त्यातच तिसऱ्या लाटेत कोरोना झाल्यामुळे ॲडमिट करावं लागलं होतं. वयाची पासष्टी ओलांडलेली. हॉस्पिटलच्या तपासण्यांमध्ये डायबेटिस, बीपी. कोलेस्टेरॉल हे त्रिरोग सापडले. त्यामुळे आधीच ‘त्रिफळा चूर्ण’ झालेला. वास्तविक पन्नाशीनंतर वर्षातून एकदा तरी सर्व तपासण्या करून घ्याव्यात, असं सगळे डॉक्टर सांगतात; पण कन्हैय्याजींचा स्वभाव मुळातच हेकट, चिकट. उगाचंच खर्च नको म्हणून तपासण्या कधीच केल्या नाहीत.

डिस्चार्ज मिळाल्यावर घरी आले; पण स्वभाव खूप बदलला होता. हेकटपणाला तुसडेपणा, चिडचिडेपणा यांची जोड मिळाली. सारखा त्रागा करायचे. बायको, मुलांनी व डॉक्टरांनी दिलेला सल्ला धुडकावून दुकानी जाऊन बसायचे. तिथंही फेऱ्या घालायचे, नोकरांवर खेकसायचे.

त्यांच्या पत्नी बदामबाई ओढतच माझ्याकडे घेऊन आल्या. त्यांना आधार देऊनच आत आणावं लागलं. धोतर, निळा कोट, काळी टोपी, असा पेहराव होता. खूप थरथरत, संथ चालीनं आत आले. हातात आधारासाठी काठी होती; पण ती टेकण्यापेक्षा उगारण्यासाठी जास्त वापरली जात होती. अत्यंत त्रासिक, खवचट मुद्रा, डोळ्याला चष्मा. थरथरत उभे असतानाच माझ्याशी संभाषण सुरू केलं.

‘आत्ताच कोरोनामुळे भयंकर खर्च झालाय. आत्ता रिक्षासाठी १६५ रुपये मोजले. त्याच्याकडे सुट्टे ५ रुपये नव्हते. तब्बल १७० रुपये भुर्दंड भरून इथं यावं लागलं. आधी तुमची तपासणी फी द्या, मग तुम्ही औषध लिहून देणार. त्याचा खर्च वेगळा. परत जायला पुन्हा १७० रुपये खर्च. एवढं मला काही झालेलं नाही.’

मी म्हणालो, ‘अहो, आधी बसा. बसून बोला. बसायला फी नाही.’ ‘बसायला फी नाही’ म्हटल्यावर ते बसले; पण तेही अर्धवट. मग मला कोपरापासून हात जोडले, ‘तुमच्या त्या भयंकर गोळ्या मी अजिबात घेणार नाही.’ मी विचारलं, ‘तुमच्या म्हणजे काय? आमच्या बागेत पिकलेल्या का? अहो, या जागतिक दर्जाच्या गोळ्या आहेत. जगभर शेकडो पेशंटवर ट्रायल घेऊनच बाजारात आल्या आहेत. जगात करोडो लोक त्या खातात. आणि ‘भयंकर’ म्हणजे काय? गुणकारीच गोळ्या आहेत या.’

त्यांनी बोलायला सुरुवात केली. स्वर अनुनासिक, तुसडा होता आणि बोलणं खेकसल्यासारखं. ते म्हणाले, ‘तुमच्या गोळ्यांचे भयंकर साईड इफेक्ट्स असतात. आमच्या नात्यातला एक मुलगा तुमच्यासारख्या डॉक्टरांच्या गोळ्या खाऊन काळा पडला होता.’ मी म्हणालो, ‘अहो, माणूस आजारामुळे काळवंडतो- गोळ्यांनी नाही.’ ते म्हणाले, ‘दुसऱ्या एकाची अशा गोळ्यांनी किडनी खराब झाली.’ मी म्हणालो, ‘दाखवा ती केस मला.’ ते क्षणभर थिजले. म्हणाले, ‘तो आता ऑस्ट्रेलियाला असतो.’ मी म्हणालो, ‘परदेशात नोकरी करण्याइतका तो सुदृढ झाला आहे. उगीच सांगोवांगी ऐकलेल्या भाकडकथांवर विश्वास ठेवू नका. तुम्ही डॉक्टरांनाच विचारत जा. वाटल्यास तुमच्या फॅमिली डॉक्टरांना विचारा.’ ते म्हणाले, ‘मी विचारलं त्यांना. ते म्हणाले, ‘बिनधास्त जा. अगदी किरकोळ साईड इफेक्टस्ट असतात. तेही तीन-चार दिवसांकरिता.’ शेवटी तुम्ही डॉक्टर लोक एकमेकांना सामील असता.’

मी त्यांना म्हणालो, ‘फायदा पन्नास आणि तोटा दोन असं गुणोत्तर असतं.’ हा दुकानदारी सौदा त्यांना पटला असावा. जरा शांत झाले, मग म्हणाले, ‘तुमच्या वेड्यांच्या गोळ्या काही अटींवर घेईन.’ मी म्हणालो, ‘आरोग्यात अटी-बिटी नसतात. आजार अटी घालतो आणि आपण त्या पाळायच्या असतात.’ ते म्हणाले, ‘माझा घसा लहान आहे. तुमच्या कॅप्सुल किंवा विषारी कडू गोळ्या मला गिळताच येत नाहीत. त्यातून ॲलोपॅथीने माणसे बिघडतात.’ मी म्हणालो, ‘‘मुद्दाम बिघडवून घ्यायला कोण आमच्याकडे येईल? गुण येतो म्हणूनच येतात.’ शेवटी लिक्विड मेडिसीन आणि माइल्ड अशा तडजोडीला ते तयार झाले. ‘पण लिक्विडला घाणेरडा वास असतो.’ मी म्हणालो, ‘पाण्यात मिसळून घ्या आणि विश्वासानं घ्या.’ ते तणतणत निघून गेले.

रात्री दहा वाजता त्यांचा फोन आला, ‘काय भयानक औषध दिलंत. जीभ जळाली, घसा पेटला. भयंकर आग आग होते.’ तेवढ्यात बदामबाईंनी फोन काढून घेतला आणि म्हणाल्या, ‘सॉरी डॉक्टर. गेले काही महिने आमचा असाच छळ सुरू आहे. ते सांगतात ते संपूर्ण खोटं आहे. मी पाण्याचा ग्लास टेबलवर ठेवला आणि त्यांना हाक मारली. एरवी चहा गार होईपर्यंत हाका मारूनही येत नाहीत. मी औषध आणायला कपाटाकडे गेले. यावेळी लगबगीने येऊन ते फक्त पाणी प्यायले आणि तातडीने तुम्हाला फोन ठोकला. औषधाची सीलबंद बाटली अजून माझ्या हातात आहे...’

...तर असे असतात, ‘आमच्या औषधांचे भयानक साईड इफेक्ट्स.’ - पूर्णपणे काल्पनिक!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT