Dr Sudhir Gaikwad Inamdar writes search for the deaf owl sakal
सप्तरंग

‘बहिरी घुबडा’ची शोधमोहीम

पण लक्षात राहिले ते आम्ही ज्या रिसॉर्टमध्ये थांबलो होतो, तिथे दिसलेले बहिरी घुबड.

अवतरण टीम

अनेकदा दूरचा प्रवास करून जे पाहायला जातो, तेच सापडत नाही. कधीकधी अनपेक्षितपणे असे काही गवसते, की तेच आयुष्यभर आठवणीत राहते. गजलडोबाला आम्ही गेलो होतो पाणथळ पक्षी पाहण्यासाठी. त्यात अनेक पक्ष्यांची छायाचित्रे टिपली; पण लक्षात राहिले ते आम्ही ज्या रिसॉर्टमध्ये थांबलो होतो, तिथे दिसलेले बहिरी घुबड. त्याची ही गोष्ट.

अनेक वर्षांपासून पाणथळ पक्षी, विशेषतः बदके छायाचित्रित करण्यासाठी गजलडोबाला जायची इच्छा होती, तो योग या फेब्रुवारीमध्ये आला. जायचे ठिकाण निश्चित झाल्यावर मुक्कामासाठी रिसॉर्टची शोधाशोध सुरू झाली. अनेकांनी पाटबंधारे खात्याचा बंगला सुचवला; पण त्यात मर्यादित खोल्या असल्यामुळे बुकिंग मिळणे अवघड होते. आम्ही इतर पर्याय शोधले तेव्हा तेथील मार्गदर्शक रतन हलदर यांनी बोरोली रिसॉर्ट सुचवले. गुगलवर पाहून ठरवतो, असे त्यांना सांगितले. इंटरनेटवर बोरोली रिसॉर्ट खूप छान वाटले. एक छोटासा पाणवठा, बगिचा आणि भरपूर झाडे होती. मुख्य म्हणजे वर्दळीच्या रस्त्यापासून जरा आत होते. त्यामुळे खूप शांतता होती. ते लगेच बुक केले.

मुंबई ते बागडोगरा विमान प्रवास करून, बागडोगरा ते गजलडोबातील बोरोली रिसॉर्टला पोहोचायला दीड तास लागला. दुपार झाली होती. त्यामुळे पटकन जेवण उरकून बोट सफारीला निघालो. जेवणाचा हॉल आमच्या खोल्यांपासून २०-२५ मीटर अंतरावर होता. सफारी संपवून परत आल्यावर रात्री नऊ वाजता जेवण करायचे ठरले. सर्व एकत्र जमले. आमच्या ग्रुपमधील नीलेश शिंदे व ज्ञानेश्वर खुटवड नंतर आले तेच मुळी गडबडीत. डॉक्टर बहुतेक आऊल दिसले आम्हाला, असे ते म्हणाले. हे ऐकताच सर्वच उत्साहित झाले व जेवण टाकून उठू लागले. जेवून घ्या; आपण नंतर ते घुबड शोधू, असे सांगताच सर्वांनी पटकन जेवण उरकले. रात्रीच्या छायाचित्रणाची अपेक्षा नसल्यामुळे आम्ही टॉर्च आणला नव्हता. त्याशिवाय ते घुबड शोधणे शक्य नव्हते. चौकशी केल्यावर रिसॉर्टच्या मालकांकडे टॉर्च मिळाला. सर्व जण कॅमेरे घेऊन सज्ज झाले होते. आमच्यापैकी बहुतेकांना रात्रीच्या फोटोग्राफीची सवय होती, तरीही उजळणी म्हणून सर्वांना कॅमेरा सेटिंग सांगितले व घुबडाचा शोध सुरू केला.

ज्या झाडाजवळ नीलेश व खुटवड यांनी ते पाहिले तिथे आता ते नव्हते. त्या बागेतील सर्व मोठी झाडे शोधण्यास सुरुवात केली. अवघ्या पाच मिनिटांत एका झाडावर ते पाठमोरे बसलेले दिसले. सर्व सज्ज होताच आम्ही त्यावर टॉर्चचा लाईट टाकला. सर्वांनी पटापट फोटो टिपले; परंतु पाठमोरे! काही क्षणातच ते तिथून उडाले. कुठे गेले ते दिसेना. सर्व हिरमुसले. एक दुर्मिळ घुबड थोडक्यात हुकले. ते बहिरी घुबड होते (ब्राऊन हॉक आऊल किंवा ब्राऊन बुबुक). पुन्हा थोडा वेळ शोधाशोध केली; परंतु ते दिसले नाही. सर्वांना एका झाडाच्या आडव्या फांदीसमोर उभे केले व एक मिनीटभर बहिरी घुबडाचा रेकॉर्डेड आवाज वाजवला. ते आता आले नाही, तर सर्वांनी झोपायला जायचे, असे ठरले; पण घुबडाने या वेळेस निराश केले नाही. अवघ्या दोन मिनिटांत ते त्या समोरच्या आडव्या फांदीवर येऊन बसले. सर्वांच्या कॅमेऱ्याची शटर्स वाजू लागली. मिनीटभरात ते तिथून उडाले. आम्ही पुन्हा त्याचा आवाज वाजवायचा नाही, असे ठरवले. कारण सर्वांना त्या दुर्मिळ घुबडाची छान छायाचित्रे मिळाली होती. सर्वच खुश होते. त्या घुबडाबाबत चर्चा करता-करताच सर्व आपापल्या खोलीत निघून गेले. सकाळी लवकर उठून बोट सफारीला जायचे होते म्हणून.

- डॉ. सुधीर गायकवाड इनामदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT